त्यांना समजून घ्या

Submitted by नीतु on 28 February, 2012 - 04:46

आजकाल सगळीकडे पालकांची तक्रार आहे की मुलं सारखी फेस बुकवर असतात, यावर मी एका मुलीच्या तोंडून जे काही एकल त्यामुळे मी थक्कच झाले, तिने माझे डोळे उघड्ले.ती म्हणाली काकी, आई बाबा दोघ ऑफीसला जातात. आजी आजोबा गावाला असतात. मला कोणी भावंड पण नाही खेळायला, मी शाळेतून घरी येते तेव्हा खूप lonely वाट्तं. घर उघडून आत जायची पण भिती वाटते. मग मला कॉम्प्यूटरचा आधार वाटतो, मी फेस बुक ओपन करते,माझे सगळे मित्र मैत्रिणी त्यावर असतात, मग आम्ही शाळेच्या क्लासच्या गप्पा मारतो, खूप मज्जा येते. नवीन मित्र मैत्रिणी पण मिळ्तात. तू सांग ना आईला.खरच आहे मला तिच म्हणण पटलं. आपण नुसती बोंबाबोब करतो पण त्यामागच कारण जाणून घ्यायचा प्रयत्नच करत नाही. मुलं अशी का वागतात याचा विचारच करत नाही. फेस बुक आजच्या काळाची गरज झाली आहे.फक्त आपण त्यांना फेस बूक बद्द्ल नीट माहिती करून द्यायला पाहिजे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान विषय घेतला आहे आज चर्चेला

युरी गागारीन
----------------------------------------------

नळी फुंकिली सोनारे
इकडून तिकडे गेले वारे