कविवर्य कुसुमाग्रजांना समर्पित चित्रहार -४

Submitted by संयोजक on 27 February, 2012 - 22:38

नमस्कार रसिकहो,

हा एक कविवर्य कुसुमाग्रजांच्या कवितांना समर्पित चित्रकोड्यांचा आगळावेगळा गमतीदार खेळ आहे.
१) खाली काही चित्रकोडी दिली आहेत. ती कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या कवितांवर आणि गीतांवर आधारीत आहेत.
२) तुम्ही ती कविता आणि ती ओळ ओळखायची आहे.
३) लिहिताना कोडे क्रमांक, कवितेचे नाव, चित्राशी संबंधीत ओळ एवढेच लिहायचे आहे.
४) कृपया प्रताधिकाराचे भान ठेवून एकच ओळ लिहावी ही आज्ञावजा विनंती आहे

खास आकर्षण: भारतातील वेळेनुसार उद्या सकाळी ह्याच धाग्यावर खुद्द कविवर्य कुसुमाग्रजांच्या आवाजातील त्या कविता आपल्याला ऐकावयास मिळतील.

चला तर मग.. करा सुरवात !
चित्रकोडे क्रमांक १६

chiha14.jpg

चित्रकोडे क्रमांक १७

IMG_0223 copy.jpg

चित्रकोडे क्रमांक १८
Bedekar%201.jpg

चित्रकोडे क्रमांक १९
chiha10.jpg

चित्रकोडे क्रमांक २०
IMG_9733_copy.jpg

प्रकाशचित्रे सौजन्य : आदित्य बेडेकर, जिप्सी, डॅफोडिल्स, बी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१६. गर्जा जयजयकार क्रांतिचा
१७. अहिनकुल - मधुनीच उभारी फणा, करी फुत्कार
१८. कोलंबसाचे गर्वगीत - नक्षत्रापरि असीम नीलामध्ये संचरावे
१९. आश्वासन - फुलरास फुलो वा फुलो निखारा चरणी
किंवा
कुतुहल - लवले होते फुलुन ताटवे नव्या वसंतात
२०. मूर्तीभंजक - पाहून परंतु मोकळा गाभारा

प्रत्येक कविता/गीत एकदाच घेतले आहे. तेव्हा 'म्यानातून उसळे' बाद- चित्रहार १ मधील चित्रकोडे ३ चे उत्तर होते ते. Happy

अश्विनी,
थोडा अजून प्रयत्न करा गाभार्‍याच्या दिशेने.

२० : गोदाकाठचा संधिकाल - देऊळ ते अन् भग्न
किंवा
ध्यास - जुन्या देवळात उजळते वात (त्या गाभार्‍यात एक बारीकसा ठिपका दिसतो आहे ती समई असावी).

२० : गाभारा : गाभारा सलामत तो देव पचास

(२७ तारखेला मुंबई आकाशवाणीवरून ही कविता विक्रम गोखलेंच्या आवाजात ऐकली)

२०) उत्तर अगदी बरोबर आहे भरत मयेकर
cadburry.jpg

'गाभारा' कविता सौमित्र यांनी मराठीत सादर करताना आणि गुलजार यांनी हिंदी अनुवाद सादर करतानाचे ध्वनिचित्रमुद्रण युट्युबवर आहे. नक्की पहा !

१६ चार होत्या पक्षिणी त्या -
तोडुनी आंधी तुफाने चालल्या ती चालली.

१८ गर्जा जयजयकार क्रांतिचा-
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल

निलीमा, क्रमांक १६ अचूक Happy
cadburry_0.jpg

१८ साठी प्रचि मध्ये एक चिन्ह आहे त्याचा काही संबंध जुळवता येतोय का ते बघा Happy

१८ सर्वात्मका सर्वेश्वरा -
आदित्य या तिमिरात व्हा.

किंवा
१८ सर्वात्मका शिवसुंदरा
तिमिरातुन तेजाकडे प्रभु आमुच्या ने जीवना

पसायदान आहे नक्की!

कोड १९ : उमर खय्याम : देख चाहूल लगता फुलतसे वाटेतला ताटवा
किंवा - शेवटचे पान : जाणारच का - सुखात जा तर, बाग मोहरो तव वाटेवर

शूम्पी | 2 March, 2012 - 12:21 नवीन
ते शांती चे दूत असं काही आहे का? आठवत नाहीये अजिबात

>> world peace म्हणजे पसायदान असा आपला मी अर्थ लावला.