Submitted by संयोजक on 27 February, 2012 - 11:59
नमस्कार रसिकहो,
हा एक कविवर्य कुसुमाग्रजांच्या कवितांना समर्पित चित्रकोड्यांचा आगळावेगळा गमतीदार खेळ आहे.
१) खाली काही चित्रकोडी दिली आहेत. ती कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या कवितांवर आणि गीतांवर आधारीत आहेत.
२) तुम्ही ती कविता आणि ती ओळ ओळखायची आहे.
३) लिहिताना कोडे क्रमांक, कवितेचे नाव, चित्राशी संबंधीत ओळ एवढेच लिहायचे आहे.
४) कृपया प्रताधिकाराचे भान ठेवून एकच ओळ लिहावी ही आज्ञावजा विनंती आहे
खास आकर्षण: भारतातील वेळेनुसार उद्या सकाळी ह्याच धाग्यावर खुद्द कविवर्य कुसुमाग्रजांच्या आवाजातील त्या कविता आपल्याला ऐकावयास मिळतील.
चला तर मग.. करा सुरवात !
चित्रकोडे क्रमांक ११.
चित्रकोडे क्रमांक १२
चित्रकोडे क्रमांक १३
चित्रकोडे क्रमांक १४
चित्रकोडे क्रमांक १५
प्रकाशचित्रे सौजन्य : आदित्य बेडेकर, जिप्सी, जागू, आशूडी, डॅफोडिल्स
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्र. ११ किनार्यावर
क्र. ११ किनार्यावर
पुढे पसरला अथांग दरिया
सखे किनार्यावरती आपण
क्र. १५ स्वप्नाची समाप्ती
काळ्या मेघखंडास त्या किनारती निळ्या धारा
वेवा क्रमांक ११ चे उत्तर
वेवा

क्रमांक ११ चे उत्तर बरोबर आहे.
कोडं १२ - दूर मनोर्यात -
कोडं १२ - दूर मनोर्यात - उज्ज्वल त्याचा पहा प्रभावळ दूर मनोर्यात
किंवा 'काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी'
..
..
कोडं १५ - सूर्य - लखलखणार्या
कोडं १५ - सूर्य - लखलखणार्या किरीट माझ्या विश्वघराचा
किंवा बायरन - अभ्रांच्या शकलांमधून तळपे, भासे जसा भास्कर
संयोजक, किती सूर्य आणि किती
संयोजक, किती सूर्य आणि किती समुद्र आणि मनोरे घातलेत चित्रांमधून ! एकच ओळ २ चित्रांना चालून जातेय
१२ प्रकाश प्रभू देवाचा कर
१२ प्रकाश प्रभू
देवाचा कर जाता स्पर्शून
मेघखंडही दुभंग होउन
१५ अससि कुठे तू
अससि कुठे तू ? ढगांत दडती मिनार ज्याचे निळे
संयोजक, माझा आयडी 'वावे'
संयोजक, माझा आयडी 'वावे' आहे, 'वेवा' नाही.
संयोजक, जरा उत्तरे तपासणार
संयोजक, जरा उत्तरे तपासणार का?
अजूनही बरोबर उत्तर आलेले
अजूनही बरोबर उत्तर आलेले नाही.
परवलीचे शब्द
१२) कुसुमाग्रजांची सर्वात गाजलेली कविता आणि 'रात्र' हा शब्द ओळीत यायला हवा
१३) प्रेम आणि भातुकली
१४) 'सागर'
१५) 'काळो़ख'
१२ : गर्जा जयजयकार :
१२ : गर्जा जयजयकार : रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
१३ : प्रेम म्हणजे- म्हणुन म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
१२: अगदी बरोबर. "गर्जा
१२: अगदी बरोबर.

"गर्जा जयजयकार या कवितेने दिलेल्या थरारक अनुभवांसंबंधी ना.ग.गोरे, बा.भ.बोरकर, अमर शेख, स. ह.देशपांडे इत्यादींनी निवेदन केले आहे. यापैकी कित्येकांचा तुरुंगवास या कवितेने उजळून टाकला.
तुरुंगातून सुटका होते त्या दिवशी जेलरचे अमर शेखांना बोलावणे येते. तुरुंगवास लांबला तर नाही?
या विचारात अमरशेख जेलरच्या घरी जातात. जेलर विनंती करतो: आजचा तुमचा शेवटचा दिवस. एकदा 'गर्जा जयजयकार' ऐकवाल का? अमर शेख सर्व राजबंद्यांना बोलावून आपल्या खड्या आवाजात जेलराच्या घरी कविता म्हणतात. असे अविस्मरणीय अनुभव या कवितेभोवती जन्मले आहेत. "
- के. रं. शिरवाडकर (तो प्रवास सुंदर होता)
१३. बरोबर
छानच माहिती. माझ्याकडून पण
छानच माहिती.
माझ्याकडून पण थोडासा माहितीकण : गर्जा जयजयकार या कवितेचे मूळ शीर्षक 'डमडमच्या तुरुंगात' असे होते.
कोडे क्रमांक १४ लवकर सोडवा,
कोडे क्रमांक १४ लवकर सोडवा, कॅडबरी मिळवा.
१४- आपल्यापैकी बहुतांश लोकांनी शालेय अभ्यासक्रमात अभ्यासलेली. तोंडपाठ केलेली अजून एक प्रसिद्ध कविता.
अहो संयोजक १२ची कॅडबरी खाल्ली
अहो संयोजक १२ची कॅडबरी खाल्ली की मी काल!
भरत मयेकर, १४,१५ साठी मिळवा
भरत मयेकर,
१४,१५ साठी मिळवा कॅडबरी.
१३चं पण उत्तर बरोबर म्हटलंय
१३चं पण उत्तर बरोबर म्हटलंय वर. कॅडबरी नाही दिलीय ते राहूद्या
१४ आणि १५ची उत्तरे राहिलीत ना अजून?
ही घ्या १३ साठी
ही घ्या १३ साठी
(No subject)
कोडं १४ - स्मृती : हेलावे
कोडं १४ - स्मृती : हेलावे भवती सागर येथ अफाट
किंवा ॠण : अहो उफालळा असे भवती हा महासागर
कोडं १५ - दूर मनोर्यात : काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी
१४. अनंत अमुची ध्येयासक्ती
१४. अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला
(कोलंबसाचे गर्वगीत )
१५. काळ्या मेघखंडास त्या
१५. काळ्या मेघखंडास त्या किनारती निळ्या धारा.
( स्वप्नाची समाप्ती )
*****
ओह, हे उत्तर आधी दिलंय हे विसरुन गेले. परत शोधावे लागेल आता
श्रीनिका, क्रमांक १५ चे उत्तर
श्रीनिका,

क्रमांक १५ चे उत्तर बरोबर आहे.
क्रमांक १४ चे उत्तर आवडतो मज
क्रमांक १४ चे उत्तर
आवडतो मज अफाट सागर, अथांग पाणी निळे
निळ्याजांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे...