मायबोली.कॉमने प्रथमच आयोजित केलेला 'हा भारत माझा'चा विशेष खेळ राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI) येथे काल रसिकांच्या 'हाउसफुल' प्रतिसादात यशस्वीपणे पार पडला. या प्रतिसादाबद्दल आणि सहकार्याबद्दल उपस्थित सर्व रसिकांचे मन:पूर्वक आभार.
या खेळासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक सुमित्रा भावे/सुनिल सुकथनकर व कलावंत दीपा श्रीराम, उत्तरा बावकर उपस्थित होते. तसेच या खेळासाठी डॉ.श्रीराम लागू, अतुल किर्लोस्कर, आरती किर्लोस्कर, आरती अंकलीकर-टिकेकर, डॉ. अरूणा ढेरे, गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, अमित अभ्यंकर,आनंद आगाशे, प्रवीण मसालेवाले श्री. चोरडिया इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ह्या सर्वांचे आभार.
एवढा मोठा उपक्रम स्वयंसेवकांच्या मदतीशिवाय यशस्वी होणे शक्य नाही. या खेळासाठी चारूदत्त, दक्षिणा, पौर्णिमा, रंगासेठ, कांदापोहे, ऋयाम, अतुल, फारेंड, अवल, मंजिरी सोमण, स्वाती, निलेश (NDA) यांची बहुमोल मदत मिळाली. तसेच रूमाने तातडीने मायबोलीचा बॅनर करून दिला. तुमचा वेळ या उपक्रमासाठी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
सर्वात शेवटी अरभाट आणि चिनूक्स. या दोघांशिवाय हा उपक्रम पार पडूच शकला नसता. मला वाटतं, गेले १०-१५ दिवस हे दोघे हा उपक्रमच जगत असावेत. अरभाट आणि चिनूक्स, तुमच्याबद्दलच्या भावना शब्दांत लिहिता येणार नाहीत. मायबोली.कॉम तुमची ऋणी आहे.
हा एकंदर कार्यक्रम तुम्हांला कसा वाटला, चित्रपट कसा वाटला याबद्दल या धाग्यावर लिहू शकता.
[हा चित्रपट अजून सर्वांसाठी प्रदर्शित झालेला नसल्याने प्रतिसादात कृपया चित्रपटाची कथा/शेवट/महत्त्वाचे प्रसंग याचा उल्लेख करू नये.]
खुप छान झाला कालचा कार्यक्रम.
खुप छान झाला कालचा कार्यक्रम. चित्रपट मी आधी फिल्म फेस्टिव्हलला पाहिला होता. पण तरीही दुसर्यांदा पाहतानाही तेव्हढाच आवडला; जेव्हढा पहिल्यांदा आवडला होता. इतक्या कमी वेळात, कमी खर्चात केलेला फार फार सुरेख चित्रपट. दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ सगळ्यांचेच करावे तितके कौतुक कमीच . लिंबुटिंबू, वरदा, मंजिरी, पौर्णिमा सगळ्यांनी अगदी सगळ्यांच्या मनातलं लिहिलय

मला आपलं वाटत राहिलं, मी तुझा वाटा खाल्ला की काय म्हणून
त्या निमित्ताने ओळख झाली असती गं 

कित्ती छान आयोजन केलत तुम्ही ! कोठे गडबड नाही, गोंधळ नाही, धावाधाव नाही, सगळे कसे आखीव रेखीव ! बरं, काही मदत हवी का हे विचारलं की गोड हसून " सांगतो ना " असं म्हणत एकही काम नाहीच सांगितलत तुम्ही ! असे संयोजक असतील तर मी नेहमी मदतीला तयार बरं का 
एक आवर्जून नोंदवावे वाटले. पहिल्यांदा हा चित्रपट एशियन फिल्म फेस्टिव्हलला पाहिला तेव्हा अन मायबोलींकरांबरोबर पाहिला यात खुप फरक जाणवला. विशिष्ठ प्रसंगांना दिली जाणारी उस्फुर्त प्रतिसाद, नर्म विनोदांना मिळणारी दाद, डोळे ओलावणारे प्रसंग आणि आजोबांच्या झाडाची गोष्ट ऐकताना निर्माण झालेली स्तब्धता... सगळे खुप खुप सहसंवेदना देउन गेले. मुख्यत्वे राष्ट्रगीताच्या वेळचा अनुभव खरोखर केवळ मायबोलीच्या प्रेक्षकांमुळेच आला. एशियन फिल्म फेस्टिव्हलला हे नव्हते घडले. मायबोलीचे सदस्य किती संवेदनाशील, भावनाशील , सर्हुदयी, एक काही वेगळीच मानसिकता असलेले आहेत हे खुप खुप प्रकर्षाने पुन्हा एकदा जाणवले
मंजिरी, फुलं देताना मी दोनदा मागे वळून पाहिले, तू कोठे आहेस म्हणून पण मला नाहीच सापडलीस तू
अनेक माबोकर भेटले, अनेकांच्या नुसत्याच स्मित-ओळखी झाल्या. पूनमला नवे नाव देउन झाले :फिदी; सॉरी गं
चिनुक्स, अरभाट तुम्हा दोघांचे किती कौतुक करू
मायबोली, अॅडमिन टीम, संयोजक, सर्वांना मनापासून धन्यवाद अन मनापासून सर्वांचे अभिनंदन !
अरे वा..! सर्व संबंधितांचे
अरे वा..! सर्व संबंधितांचे अभिनंदन! "ब्रँड मायबोली" ची वाटचाल अशीच यशस्वीपणे पुढे चालू राहो ही सदिच्छा!
देशात आलो की हा चित्रपट पहायलाच हवा.. मायबोलीवरूनच या चित्रपटाची अधिकृत डीव्हिडी वगैरे विक्रीस असेल का?
आरती, ओळख झाली असती हे जास्त
आरती, ओळख झाली असती हे जास्त महत्त्वाचं, बेटर लक नेक्स्ट टाइम :)... राष्ट्रगीताबद्दल तू तिथेही बोललीस ना, तेव्हा माझ्या मागेच २ ओळी टाकून तू बसली होतीस पण तेव्हा बोलणं शक्य नव्हतं आणि नंतर तू बाहेर दिसलीच नाहीस.
फुलं देताना मी दोनदा मागे
फुलं देताना मी दोनदा मागे वळून पाहिले>>
मी नेमका दोन मिनीटे बाहेर गेलो होतो त्यामुळे हे क्षण कॅमेर्यात टिपता आले नाहीत.
मी तर अनेक जणांना भेटूया असे ठरवले होते पण कुणाशीच नीट ओळख झाली नाही. काही जुने आयडी मात्र भेटले.
छान झाला कालचा कार्यक्रम.
छान झाला कालचा कार्यक्रम. चिनुक्स, अरभाट दोघांचेही कौतुक...छान आयोजीत झाला होता एकूणच कार्यक्रम.
सुमित्रा भावे/सुनिल सुकथनकर यांचा चित्रपट आणि विक्रम गोखले, उत्तरा बावकर, दीपा श्रीराम यांसारखे कलाकार म्हणल्यावर कुठे तरी माहित असतं की चित्रपट छानचं असेल. त्यामुळे चांगला चित्रपट पाहिल्याचं समाधान.
लिंबू ने सुंदरच लिहिलेय.
लिंबू ने सुंदरच लिहिलेय. यापेक्षा संयमी शब्दात, चित्रपटाची प्रशंसा शक्यच नव्हती.
हे नाही, ते नाही असे म्हणत... काय असेल याबद्दल जबरदस्त कुतूहल निर्माण केलेय.
मायबोलीने या वेगळ्या क्षेत्रात प्रवेश केला, आणि तो यशस्वी करुन दाखवला.. याबद्दलची भावना शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे मला.
मला चित्रपटात किंचित
मला चित्रपटात किंचित खटकलेल्या दोन गोष्टी - ( अतिचिकित्सकपणा आहे, पण लिहिल्यावाचून रहावत नाहीये)
१. विक्रम गोखले, उत्तरा बावकर हे माझे अत्यंत आवडते कलाकार आहेत पण ते त्या भूमिकांसाठी जरा म्हातारे वाटत होते. ज्यांची मुलं तिशी आणि विशीच्या आत आहेत असे आई-बाप सहसा ५०-५५ च्या आसपास पाहिजेत ना?
२. उत्तरा बावकरांच्या घरातल्या साड्या आणि ब्लाऊज बर्यापैकी नवे आणि इस्त्रीच्या घडीचे दाखवलेत.एकूण पार्श्वभूमी पहाता ते वास्तव वाटत नाही. कुणाच्या आया/ त्या स्वतः रोज घरी इस्त्रीच्या, रंग न विटलेल्या कॉटनच्या इरकलीटाईप काठाच्या साड्या नेसतात?
आयोजकांचं कौतुक व अभिनंदन!
आयोजकांचं कौतुक व अभिनंदन!
सगळ्यांच्या प्रतिक्रिया
सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या आणि तुम्ही घेतलेला हा अनुभव वाचताना तुमचा हेवा वाटला
अभिनंदन मायबोली व मायबोलीकर !!
मला चित्रपटात किंचित
मला चित्रपटात किंचित खटकलेल्या दोन गोष्टी >> वरदा तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे विशी - तिशी च्या घरातल्या मुलांचे आई वडिल हे साठी उलटलेले पण असू शकतात. माहितीतली काही उदाहरण आहेत कारण तशी .. हा दुसरा मुद्दा पटण्याजोगा आहे.. किंवा म्हणेन तुम्ही तो मांडल्यामुळे माझ त्याकडे जास्त लक्ष गेल
>>१. विक्रम गोखले, उत्तरा
>>१. विक्रम गोखले, उत्तरा बावकर हे माझे अत्यंत आवडते कलाकार आहेत पण ते त्या भूमिकांसाठी जरा म्हातारे वाटत होते. ज्यांची मुलं तिशी आणि विशीच्या आत आहेत असे आई-बाप सहसा ५०-५५ च्या आसपास पाहिजेत ना?
२. उत्तरा बावकरांच्या घरातल्या साड्या आणि ब्लाऊज बर्यापैकी नवे आणि इस्त्रीच्या घडीचे दाखवलेत.एकूण पार्श्वभूमी पहाता ते वास्तव वाटत नाही. कुणाच्या आया/ त्या स्वतः रोज घरी इस्त्रीच्या, रंग न विटलेल्या कॉटनच्या इरकलीटाईप काठाच्या साड्या नेसतात?
>>
वरदा + १
हो गं रुमा, ते साठीचे किंवा
हो गं रुमा, ते साठीचे किंवा त्यापुढचेही असू शकतात, पण विक्रम गोखले अजून नोकरीत दाखवलेत आणि मग ते त्या वयाचे वाटत नाहीत. बाकी काही नाही
प्लीजच मला कुणी अहो-जाहो करू नका.
पण विक्रम गोखले अजून नोकरीत
पण विक्रम गोखले अजून नोकरीत दाखवलेत आणि मग ते त्या वयाचे वाटत नाहीत >> ह्म्म्म बरोबर गं
थोडक्यात चांगली संधी हुकली..
थोडक्यात चांगली संधी हुकली..
मायबोलीने मुंबईमध्ये असा एक खेळ आयोजित करायचे मनावर घ्यावे ही विनंती..
सर्वांच्या प्रतिक्रिया
सर्वांच्या प्रतिक्रिया वाचताना खूप छान वाटतंय
इतक्या सुरेख कार्यक्रमाला येऊ शकले नाही त्याबद्दल खेदही वाटतोय.
>>> पण विक्रम गोखले अजून
>>> पण विक्रम गोखले अजून नोकरीत दाखवलेत आणि मग ते त्या वयाचे वाटत नाहीत >> ह्म्म्म बरोबर गं <<<<
(अन तरी काका/मामाचा जमाना केव्हाच जाऊन "आजोबा" अशा हाकेला उत्तरायची वेळ येऊन ठेपलीये!
)
अगो विक्रमगोखल्यान्च काय घेऊन बसलीस? मी तर "दाखविलोबिखविलो" नाहीये, अजुन खर्रोखर्रच नोकरीतच आहे!
इतक्या सुरेख कार्यक्रमाला येऊ
इतक्या सुरेख कार्यक्रमाला येऊ शकले नाही त्याबद्दल खेदही वाटतोय.
>>>>>>>>>>>>>>>
+ १
मी तर "दाखविलोबिखविलो"
मी तर "दाखविलोबिखविलो" नाहीये, अजुन खर्रोखर्रच नोकरीतच आहे! >> लिंबू तुमची गोष्टच वेगळी बघा
खूप मस्त वाटलं सर्व अनुभव
खूप मस्त वाटलं सर्व अनुभव वाचून.
असे कार्यक्रम मुंबईत कधी आयोजित होणार की नाही ??
की आम्ही मुंबईकरांनी याबाबतीत स्वतःला कर्मदरिद्री म्हणवून घ्यायचं ?
वरदा +१ शिवाय ताईची चिठ्ठी
वरदा +१
भटजीबुवा फारच चांगल्या हॉटेलात घेऊन गेले बायकोला
अर्थात या बाबी फार फार शुल्लक आहेत....


शिवाय ताईची चिठ्ठी सकाळी येऊनही रात्री दिली जाण्याचे कारणही नाही कळले
अन हो काही सीन्स अगदी 'बिट्विन द लाईन्स' वाले आहेत ते फार फार भावले. उदा. ताईचा अन दिपा लागू यांचा निशब्द संवाद. आईच्या आजारपणात आण्णांच्या मोठ्या समजावण्यानंतर बापलेकाचा मूक संवाद ! वा क्या बात है !
आणखीन एक, खरं तर असे, अत्यंत खर्या वास्तवावर आधारित चित्रपट पाहिल्यानंतर मनावर एक नैराश्य सदृश्य भाव तरळत राहतो, पण याला हा चित्रपट एक सन्मान्य अपवाद आहे. बाहेर पडताना एक खुप छान, शुद्ध, खरे, निखळ, आनंदी, सकारात्मक भाव आपल्या मनात दरवळत राहतात
उल्हासजी अन सगळे मुंबईकर टुक टुक
सिनेमा पाहून आता आपण अगदी
सिनेमा पाहून आता आपण अगदी कळ्त -नकळत कुठे भ्रष्टाचार करतो ,याची यादी कराविशी वाट्ते आहे.
पायरेटेस सीडी ,सॉफ्टवेअर्,आयकर वाचवण्यासाठी खोटी मेडीकलची बिले....कटू सत्य आहे.
शिवाय ताईची चिठ्ठी सकाळी
शिवाय ताईची चिठ्ठी सकाळी येऊनही रात्री दिली जाण्याचे कारणही नाही कळले >> अवल मी आपला असा समज करून घेतला की आण्णा बाहेर पडण्याआधी त्यांना चिठ्ठी देऊन संपुर्ण दिवस त्यांनी विचारात घालवण्यापेक्षा आल्यावर सांगावं असा विचार असणार.. म्हणजे आपण पण कधी कधी असा विचार करतो की सकाळी सकाळी वादावादी नको असं...
'हा भारत माझा ' अतिशय सुरेख
'हा भारत माझा ' अतिशय सुरेख असा चित्रपट घेतलाय. कार्यक्रमाचे नियोजन पण छान केले होते. दिग्दर्शकांशी गप्पांमुळे तर एकदम मजा आली .मायबोली, संयोजक आणि स्वयंसेवकांचे आभार . तुम्ही सर्वांनी परिश्रम घेतलेत आणि त्यामुळेच आम्हाला या कार्यक्रमाचा आनंद घेता आला .
>>>> शिवाय ताईची चिठ्ठी सकाळी
>>>> शिवाय ताईची चिठ्ठी सकाळी येऊनही रात्री दिली जाण्याचे कारणही नाही कळले >>
रुमा म्हणते तस तर आहेच, शिवाय कामावरुन परत येताना शनिमन्दिर वगैरे उरकुन आल्यावर मग दिलीये! बरोबर ना? की मीच विसरतोय काही किन्वा माझच शनिमन्दिरात जाणं आठवतोय?
चित्रपट अतिशय सुंदर आहेच. आणि
चित्रपट अतिशय सुंदर आहेच. आणि त्या बरोबर दिग्दर्शकांकडुन त्या चित्रपटामागची भुमिकाही समजल्यामुळे तो अतिशय भावला. किती कमी खर्चात, कोणतीही कृत्रिम प्रकाशयोजना न वापरता, साधी सरळ वेशभूषा ..... या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम मनाला भिडला. तसेच कुठलेही कृत्रिम सेट्स न वापरता तसे लोकेशन्स शोधुन काढुन तिथे चित्रीकरण केल्याने खरोख आपल्याच घरातील किंवा शेजारच्या घरातील प्रसंग पाहत आहोत असेच वाटत होते.
सुनील सुखथनकर आणि सुमित्रा ताई यांच्याबरोबर विक्रम गोखले, उत्तराताई बावकर, दीपा श्रीराम यांच्या सारखे कलावंत असताना चांगली कलाकृती निर्माण न होणं .... केवळ अशक्यच. त्यामुळे कालची संध्याकाळ छान गेली. तसेच दिग्दर्शक द्वयीने प्रेक्षकांच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
सुमित्राताईंनी सांगितलेली एक आठवण ऐकुन खूप छान वाटले.
"कधी कधी चित्रीकरण करताना कॅमेरामन, कलावंत आणि दिग्दर्शक असे ३-४ च लोक असायचे त्यामुळे गर्दीत चित्रीकरण करताना सुद्धा कुणाचा काही त्रास झाला नाही. कुणाला कळायचे सुद्धा नाही की एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण चालू आहे"
आणि कदाचित यामुळेच गर्दीतले प्रसंग असुनही एकदम लाईव्हली झालेले आहेत.
आलोक राजवाडे पण छान. खूप बोलका चेहरा आहे त्याचा. संवादाबरोबरच नजरेतून आणि हाव-भावातुन सुद्धा त्याने काही प्रसंग उत्तमप्रकारे रंगवले आहेत. पिंपळाच्या झाडाची कथा सांगुन झाल्यावर त्याची नजर सारे काही सांगुन जाते, किल्ली शोधुन ती लगेच लपवुन ठेवतानाचा प्रसंग पण सुंदर.
किशोर कदम आणि जितेंद्र जोशीचा प्रसंग तर अ फा ट !!!
इतकी सुंदर संधी आमच्या साठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल चिनुक्स, अरभाट व मायबोली व्यवस्थापकांचे शतशः आभार !!!
- - - - - - -
मी काही चित्रपट किंवा चित्रीकरणातला तज्ञ नाही. आणि तांत्रिक गोष्टी कळत नसताना त्यातील दोष काढणे चुकीचे आहे. परंतू तरीही चित्रपटात काही गोष्टी जरा खटकल्या !!
एकुणच चित्रपटात खूप क्लोज अप्स वापरले आहेत. मुळात एकाच स्टील कॅमेर्याने चित्रण केलेले असल्याने एकाच अँगलने चेहरा दिसत राहतो, त्यात सतत एकदम जवळून चेहरे दिसत राहील्याने प्रत्येक कॅरॅक्टर अंगावर येते. कधीकधी तर मूव्हमेंट असताना (म्हणजे चालताना, गाडी चालवताना वगैरे) सुद्धा क्लोज अप असल्याने कॅरॅक्टर पुर्ण फ्रेममधे हलल्यासारखे वाटते. आणि त्या क्लोजप चा परिणाम पाहीजे तितका होत नाही. (म्हणजे मी जर डिजीटल कॅमेरा घेऊन चित्रीकरण करायला लागलो तर जसे होईल तसे.)
दुसर्या एका प्रसंगात गाडीवरुन उतरुन आलोक त्याच्या मित्रापासुन पळून का जातो ते समजत नाही. तिथेच थांबून मित्राला खरे कारण सांगितले असते तर तो प्रसंग जास्त वास्तववादी वाटला असता.
बाकी वरदाने सांगितल्याप्रमाणे विक्रम गोखले आणि उत्तरा बावकर जरा अधिकच वयस्कर वाटतात. पण कदाचित असुही शकतील.
असो, ह्या काही क्षुल्लक बाबी आहेत. किंवा कदाचित असेही असेल की मलाच माझी नजर 'डेव्हलप' किंवा 'ईम्प्रूव्ह' करण्याची गरज असेल.
काही का असेना .... चित्रपट बघण्याचा अनुभव खूपच मस्त होता !! परत एकदा सर्वांचे आभार.
'हा भारत माझा' या
'हा भारत माझा' या चित्रपटासाठी मला स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल चिन्मयचे आभार. या उपक्रमात काम करताना मजा आली. मोठ्या कलावंताना जवळून पाहता आलं.
चित्रपट पाहताना 'गिरिश कुलकर्णी' माझ्या शेजरच्या सीटवर होते. 
या कार्यक्रमाची काही प्रकाशचित्रे खाली देतोय. पिकासाची लिंक आहे. फोटोंचा साइझ मोठा असल्याने तिथूनच टाकलेत.
१) फारेंड व NDA मायबोलीचा फलक लावताना
२)
३)
४) दिग्दर्शक सुनील सुकथनकर माहिती देताना.
५) उपस्थित मायबोलीकर
६)
७)
८) विशेष पाहुणे
९) चित्रपटाची उपस्थित टीम
१०) सत्कार समारंभ
११) दिग्दर्शकांशी गप्पा
१२)
१३)
१४)
येता आलं नाही याचं प्रचंड
येता आलं नाही याचं प्रचंड वाईट वाटते आहे.
चिन्मय, अरभाट आणि स्वयंसेवक, मनःपूर्वक अभिनंदन.
चित्रपट तुम्हा सर्वांसोबत
चित्रपट तुम्हा सर्वांसोबत पाहता न आल्याचं खूप वाईट वाटतंय. इकडे मुंबईत लागला की नक्की बघणार.
वरील सगळ्यांचे चित्रपटाविषयीच्या पोस्ट्स मस्त.
अरभाट आणि चिनूक्स, धन्य आहात
मायबोली आणि संयोजक/स्वयंसेवक
मायबोली आणि संयोजक/स्वयंसेवक मायबोलीकरांचे आभार. एक चांगला सिनेमा पहायला मिळाला हे कालच्या संध्याकाळचे फलित. एकूण अनुभव लक्षात राहण्याजोगा. सिनेमाबद्द्ल बोलणे योग्य होणार नसल्याने सिनेमाच्या जमेच्या तसेच खटकलेल्या बाबींबद्दल सध्या तरी न बोलणेच योग्य. यथावकाश त्याबद्द्ल बोलूच.
या सिनेमाच्या निमित्ताने पडद्यावरील तसेच पडद्यामागील कलाकारांना फार जवळून पाहता आलं तसेच निव्वळ आयडीच्या मागे दडलेले अनेक मायबोलीकर चेहरे सुद्धा समोरासमोर पहाता आले. त्यामुळे पुनश्च मायबोलीचे आभार.
चांगला सिनेमा पहायला
चांगला सिनेमा पहायला मिळाला....
Pages