ऊखाणे एक विरंगुळा

Submitted by नीतु on 23 February, 2012 - 01:24

पूर्वी बायका नवयाचं नाव घेत नसत, तेव्हा लग्नसमारंभात नवीन लग्न झालेल्या मुलींना उखाणे घ्यायला सांगायचे,त्या निमित्ताने त्यांना नवयाच नाव घ्यायला मिळायच. परंतु आज ही लग्नात, मंगळागौरीला हे उखाणे घेतले जातात. एक गमंत म्हणून ह्या सगळयाकडे पहायचं असत. मग काही वयस्कर बायका हे उखाणे या मुलींना सांगतात व त्या ते घेतात. मी काही नवीन उखाणे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, नवीन पीढीतल्या मुली असे उखाणे घेतील.

कम्प्युटरमध्ये घातली नवीन डिस्क
------शी लग्न करण्यान मी घेतली आहे मोठी रिस्क

फेसबुकवर फ्रेण्ड्स केले शंभर
-------च नाव घेते मी आहे त्यांची लव्हर

फेसबुक, मोबाईल शिवाय चैन मला पडेना,
-------च नाव घेते झोप मला येईना.

लग्नाच्या आहेरात आई वडिलांनी
दिला मला black berry चा मोबाईल
-----च नाव घेते आता फेसबुकवर update करीन माझा प्रोफाईल.

तुम्हाला देखील काही सुचत असतील तर जरुर लिहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या नवर्‍याने त्याच्या एश्टाइल मध्ये घेतलेला उखाणा.
(खरतर अंदाज आलेला असाच काहितरी उखाणा तो घेणार म्हणुन)
My favorite dish is Kheema
And my wife’s name is Reema
(पक्का नॉनव्हेजीटेरियन आहे).

सावंतवाडिला एका प्रोग्रॅमला एका बाइंनी चक्क मोठ्ठी कवीता म्हटलेली. कस लक्षात रहात?

माझ्या आई चे टिपिकल नाव
पल्लवी[मोठी बहीण] माझी कंठ मणी ,प्रिया-प्रिती[आम्ही दोघे{twins} माझ्या नाग मणी
मी आहे *** रावांची राणी Uhoh
तेव्हा मला एक्दम नाग असल्या सारखे वाटायचे Happy

रैना

हा धागा मायबोलीवर कसा टाकायचा? परत टाईप करावा लागेल का? हा धागा मायबोलीवर पण दिसतोय, मग तो फक्त संयुकता सद्स्यांनास दिसतो का?

प्रीतीला दिलेली माहिती इथे चिकटवतेय.

"
धागा संपादन असं वर लिहिलंय ना, तिकडे जाऊन, पानावर सगळ्यात खाली ग्रूप असा दुवा आणि एक छोटा त्रिकोण आहे. तिथे टिचकी मारून बघ. सध्या संयुक्ता ग्रूप निवडलेला दिसेल. तो बदलून विरंगुळा करायचा. आणि खाली सार्वजनिक लिहिलंय तिकडे एक टिक करायची. की झाले.
"

मदत लागल्यास सांगा..

^^^

आम्च्याकडचे काही फ्याण्टाश्टिक उखाणे:

चांदीच्या ताटात बर्फीचे तुकडे,
चांदीच्या ताटात बर्फीचे तुकडे,
घास भरवते मरतुकड्या,
थोबाड कर इकडे Proud

साखरपुड्यात घ्यायचा उखाणा:

इकडे आहे आफिका, तिकडे आहे अमेरिका
मी आहे कुमारिका, मला नाव घ्यायला सांगू नका! Wink

भिंतीच्या कोनाड्यात ठेवले होते गहू
भिंतीच्या कोनाड्यात ठेवले होते गहू
.......राव गेले बाजारात, आता जरा.....रावांकडे पाहू. Wink

टोकुरीका

गहू वरून अजून एल आठवला.
ताटात ठेवले होते मुठ्भर गहू
सगळेच लाईन मारतात नाव कुणाचं घेऊ.

काढले

मी माझ्या लग्नात घेतलेले नाव [तेव्हा अचानकच सुचले]

चंन्द्राला ईग्रजीत म्हणतात मुन
**रावांचे नाव घेते ** ची सुन Uhoh

माझ्या मित्राने त्याच्या लग्नात घेतलेला उखाणा.

हंड्यावर हंडे सात, त्यावर ठेवली परात
***** उभी दारात, येऊ कसा घरात? Happy

भिंतीच्या कोनाड्यात ठेवले होते गहू
लग्न नाही झालं माझ नाव कसं घेउ?

लग्ना च्या रात्री वराने घेतलेला उखाणा

देतो लाडु, देतो सरबत, हवं तर देतो पेढा
केवढी रात्र झाली आता तरी आम्हाला एकटं सोडा

उंच नवर्‍याच्या बायकोने घेतलेला उखाणा

......... राव एकदा सलुन मध्ये करायला गेले दाढी
न्हाव्याला आणायला लागली फायर ब्रीगेड ची शीडी

टकल्याच्या बायकोने घेतलेला उखाणा

राज्य चालवता चालवता सरकारच्या तोंडाला आला फेस
माझ्याशी लग्न करुन ...... रावांच्या डोक्यावरचे गेले केस

माझ्या नवर्‍याने आमच्या लग्नात घेतलेला उखाणा ( पण तो स्पेसीफिक आहे. सहज गम्मत म्हणुन देते आहे)

जसा भारताचा तेंडुलकर आणि वेस्टइंडीज चा लारा
मोहन च्या आयुष्यात चालत आली मीरा

मी घेतलेला उखाणा
माझं लग्न ठरवताना बाबांना पडला प्रश्ण गहन
पण युगे न युगे भेटत राहाणार मीराला मोहन

माझा नवरा आमच्या नातेवाईकांमध्ये उखाणा स्पेशालिस्ट म्हणुन ओळखला जातो. त्यानेच हे वरिल उखाणे शोधले आहेत. असे अनेक आहेत कधी कोणाच्या व्यवसाया वरुन किंवा नावा वरुन तो नेहेमी उखाणे देतो.
उदा. आमचा एक मित्र कोर्टात वकिल आहे. त्याच्या बायकोला उखाणा दिला होता
कोणाला आवडते चिक्की तर कोणाला आवडतो फज
......... रावांना घाबरतात हायकोर्टातले सगळे जज

एका संक्रांतीला घरी काचेच्या छोट्या बरण्या वाण म्हणून दिल्या होत्या, एका काकूंनी उखाणा घेतला

आज वाण म्हणून दिलीत तुम्ही मोठी शिशी
----रावांची आहे इवलिशी मिशी

हा उखाणा आहेच पण त्यावेळे एक किस्सा घडला तो शेअर करतोय.

मावसभावाच्या लग्नात नवरीने एक उखाणा घेतला.

तो असा होता.

आला आला वाघ, खातोय काय
क्ष्क्ष्क्ष रावांच नाव घ्यायला भितेय काय??

पण ह्यातल पहिलच वाक्य आला आला वाघ झाल्यावर सोबतच्या पोरानी कुठेय कुठेय अस बोल्ल्यावर जो काहि हास्यकल्लोळ झाला होता तो आजहि सगळे प्रत्येक लग्नात आठवतातच. Happy

नवर्यामुलाच्या खडुस भावाने:

---- च्या लग्नाला आलं किती वर्हाड
अन पोळ्या तोडायला लागते कुर्हाड

पोळ्या अगदी वात्तड होत्या :प

सग ळ्यात जास्त घेतल्या जाणारा उखाणा म्हणजे

हिमालयावर बर्फाचे खडे
-- चं नाव घेते तुम्हासर्वांपुढे.

भाजीत भाजी मेथिची
--माझ्या प्रीतिची :प (सहसा मुलांचेच असतात असले उखाणे)

नवरा-बायको दोघेही मायबोलीकर असतील तर...

आमच्या मायबोलीवर निवडक लेख असतात दहाच
----रावांच्या लेखावर काय प्रतिसाद देते तो पहाच Lol

माझ्या बहिणीला एका आजींनी इतका भारी उखाणा सांगितला होता. ‘गड आला-सिंह गेला, मावळे होते हौशी, .......च नाव घेते, ...........च्या दिवशी!’
सिंहगडावरचे तानाजी मालुसरेंचे मावळे हौशी होते, हे त्या आजींना कोणी सांगीतल कोण जाणे!!

लग्नाच्या आहेरात आई वडिलांनी दिला मला black berry चा मोबाईल
-----च नाव घेते आता फेसबुकवर update करीन माझा प्रोफाईल..

हे एकदमच सही आहे.. ............

<< नवीन पीढी कसे उखाणे घेईल ते सांगा >>

जर्मनीत असलेल्या मुलाशी लग्न झाल्यावर -
कुठे तो युरोप, त्यांत आहे म्हणे जर्मनी
तिथून येऊन बसला, *** माझ्या मनीं

अमेरिकेतच स्थायिक होणार्‍या नवर्‍याबद्दल -
कोलंबस शोधतो अमेरिका ,बायकोला कंटाळून
****लाही बसायचंय, अमेरिकेलाच कवटाळून

Pages