माझ्याच बाबतीत का?

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

हे सगळं असच फक्त
माझ्याच बाबतीत का घडतं?

चुक कोणाचीही असली तरी
बॉसच्या नजरेत मीच येतो
अगदी रजेवर नसून सुद्धा
कामचुकारीचा शिक्का बसतो

घाईघाईत घरून निघताना
नेमकी बायकोला आठवण येते
सावकाशीने करायच्या कामांची
यादी तत्परतेने सादर होते

बस मध्ये चढल्या चढल्या
बसायला चक्क जागा मिळते
शेजारची सीट रिकामी असूनही
"ती" मात्र दुसरीकडेच बसते

ग्रहतार्‍यांवर विश्वास नसून सुद्धा
भविष्य वाचणे काही चुकत नाही
असल्या नशिबाचा विचार करणे
मान्य नसूनही टळत नाही

विषय: 

या सगळ्यान्चे कारण एकच आहे... मर्फीज लॉ...... Happy

अरूणराव,
हे असं का होत?? थो ड्या फार फरकान सगळ्यांना असच वाटत रे बाबा!!
बाकी बसच म्हणशील तर... तीलाही माहित असेल की तुझं लग्न झालय Biggrin
दीप
"The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
Professor Richard L. Gregory.

वय अ. आ. वय .. वयाचा दोष आहे सगळा. तुमची काही चुक नाही. Proud
~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

अरूण,
कविता एकदम मस्त. मला खूप आवडली. साधी, सोपी सरळ. Happy
उगिच क्लिष्ट भाषा नाही.