Submitted by नीतु on 20 February, 2012 - 23:29
लिव्ह इन रिलेशनशिप या विषयाला नागपूर मध्ये अरविंद गोडबोले या ज्येष्ठ नागरिकाने वाचा फोडली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी लिव्ह इन रिलेशनशिप असावी असे त्यांना वाटते. यासाठी त्यांना सगळीकडून भरगोस प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या संस्थेचा सभासद होण्यासाठी बरेच जेष्ठ नागरिक उत्सुक आहेत. आपल्या माय बोलीकरांची याबाबत काय मते आहेत? आपण आपल्या आई वडीलांना किंवा घरातील अन्य जेष्ठ नागरिकांना या रिलेशनशिन मध्ये बघू शकाल का? ही केवळ एक चर्चा आहे. माझ्या मते या वयात अशी रिलेशनशिप ठेवण्यापेक्शा त्यांनी रजिस्टर लग्न करावे. काय आहेत आपले विचार जरुर लिहा.
गुलमोहर:
शेअर करा
त्यासाठी वैचारिक प्रगल्भता
त्यासाठी वैचारिक प्रगल्भता मात्र हवी. हा पर्याय सर्वा पेक्षा काहींसाठी जास्त सुयोग्य ठरू शकेल. मात्र संबंधित दोन्ही व्यक्तींचे हित लिव्ह-इन ठरण्या पूर्वीच जपले गेले पाहिजेत. विशेषतः त्यातील स्त्रीचे. ती नंतर कधीही एकटी पडणार नाही, हे पाहिले गेले पाहिजे. म्हणजेच लिव्ह-इनला समाज मान्यता मिळाली पाहिजे. असे झाले तर ज्येष्ठांसाठी तो सुदिन ठरेल.
अगदी पूर्णतः सहमत. माझ्या 'आदिबंध' कादंबरीत 'लिव्ह-इन रिलेशनशिप' हा विषय आला आहे. अर्थत त्यातली पात्रं तरुण आहेत. पुरुषाच्या प्रेयसीने लग्नापूर्वीच आत्महत्या केलीय तर स्त्रीचा घटस्फोट झालाय. लेखक म्हणून मी कोणताही पक्ष घेण्याचं [किंवा value judgement देण्याचं] मुद्दाम टाळलं होतं. त्या कादंबरीवर अपेक्षेप्रमणेच संमिश्र प्रतिक्रिया आल्या. परन्तु बहुसंख्य 'लिव्ह-इन' च्या पक्षाच्या होत्या हे विशेष! उतरवयीन व्यक्तिंच्या बाबतीत तर मला वाटतं की हे स्वीकारणं जास्त सोपं जावं. आपल्या उतारवयीन आई किंवा वडिलांनी हा पर्याय स्वीकारला तर त्यांच्या मुलांनी / सूनांनी/ नतवंडांनी अस्वस्थ होण्याची गरज नाही. हा काही त्यांचेवरील 'अविश्वासाचा ठराव' नाही.
राहता राहिली समाज-मान्यता. तुम्ही आपल्या आयुष्यात दु:ख्खी-कष्टी असाल किंवा एकटे पडले असाल तर काही समाज काही त्याची फार मोठी पर्वा करतो अशातला भाग नाही. ते एकाकीपण आपलं आपल्यालाच भोगावं लागतं. समाज ही काही एकसंध आणि सर्वव्यापी कल्याणकारी संस्था नसते. आधी आपापलं हित सांभाळत आणि त्यानंतर सामूहीक सोयींचा / हिताचा विचार करत जगणार्या व्यक्तिंचा तो एक समूह असतो. प्रत्येक नव्या विचाराला [एव्हढंच काय, पेहेरावाला देखील] समाज विरोधच करत आलाय. स्त्रीयांनी 'सकच्छ' नेसावं का 'विकच्छ' यासारख्या विषयावर पुरुषांनी लंब्याचौड्या चर्चा करण्याचे आणि वाद घालण्याचे प्रकार घडतातच. अशा वाद-विवादांना अवास्तव महत्व देण्यात अर्थ नसतो.
शेवटी लग्न काय किंवा 'लिव्ह-इन रिलेशनशिप' काय, प्रेम आणि विश्वास यावर सगळं काही [यशापयश] अवलंबून असतं. आधी एखादं वर्ष एकत्र राहून पहावं आणि नंतर 'रीतसर' [?] लग्न करावं हा सल्ला म्हणजे 'धड ना इकडे धड ना तिकडे' असा प्रकार झाला.
विवाह-संस्था आणि संपत्ती-विषयक संबंध नेहमीच एकमेकात गुंतलेले असतात. कदाचित त्यामुळेच समाजाने बहुमताच्या आधारे आणि परंपरेच्या आधारे विवाहाला 'पावित्र्य', 'मांगल्य' वगैरे चिकटवून टाकलं असावं. लग्नामुळे वारस-हक्कांना कायदेशीर संरक्षण मिळतं हे खरं पण अलीकडे आपल्या न्यायालयांनी सुद्धा 'लिव्ह-इन' रिलेशनशिप' ला ही सुविधा मिळवून दिली आहे. पाश्चिमात्य देशात तर तसे स्पष्ट कायदेच झाले आहेत. उद्या आपल्याकडेही होतील.
सहजीवनाचा आनंद हा स्त्री-पुरुष संबधांतला सर्वात महत्वाचा भाग मानला तर इतर घटक दुय्यम ठरतात.
अगदी रीतसर केलेल्या लग्नातही असा आनंद दुरापास्त झाला तर ती जन्मठेपेची शिक्षा ठरू शकते. म्हणूनच तर घटस्फोटाचे कायदे करावे लागले ना ? त्याच विचारधारेचं पुढचं पाऊल म्हणजे 'लिव्ह-इन रिलेशनशिप'
असं मानण्यात अडचण काय असावी?
-प्रभाकर [बापू] करंदीकर
मला यावर फार काहि लिहावे असे
मला यावर फार काहि लिहावे असे वाटत नाहि. ज्येष्ठ नागरिक असोत किंवा कनिष्ट नागरिक असोत, जर त्यांना लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचे असेल तर जरुर रहावे. लग्न करायचे असेल तर जरुन करावे. समाजाचा यात काहिहि संबंध नाहि.
मला वाटते एक समाजमन म्हणून 'वुई शूड ग्रो अप नाऊ'. >>> +१
माझे मत थोडे नाही, तर फारच
माझे मत थोडे नाही, तर फारच वेगळे आहे या मुद्द्यावर................
खरे तर वृद्धांना समाजापुढे आपल्या समस्या अशा तर्हेने मांडाव्या लागणंच माझ्यासाठी फार कष्टदायी आहे......... आपण कोण त्यांना परवानगी किंवा सहमती देणार? ते असा किंवा कसाही निर्णय घेण्यास खरेतर सक्षम आहेत.............कदाचित समाजातील टोळभैरव व हुल्लडबाज प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून श्री. अरविंद गोडबोले (किंवा इतर वृद्ध व्यक्ती) यांना मानसिक त्रास होईल याची भीती वाटत असावी म्हणून त्यांनी असा विषय समाजापुढे मांडला असावा........मला नाही वाटंत आज समाजातील सुविचारी माणसे स्त्री-पुरुष नातेसंबंधातील कोणत्याही प्रकाराबद्दल (जसे लग्न, विवाहबाह्य संबंध, लिव-इन रिलेशनशिप, समलिंगी संबंध इत्यादी) अशा तर्हेने समाजाची परवानगी / मते / विचार मागत असतील म्हणून.............................
मला असे म्हणायचे आहे की श्री. गोडबोले या व्यक्तीवर अशी कोणती वेळ आली आहे की त्यांना स्वतःच्या मुलांना सोडून समाजाकडे दाद मागण्याची गरज पडली? अशा तर्हेने व्यक्तीगत प्रश्न चव्हाट्यावर आणून आपण काय मिळवत आहोत?
मला आनंद होईल जर समाजातील वृद्ध व्यक्तींना अशा तर्हेने त्यांच्या पेक्षा वयाने व अनुभवाने लहान असलेल्या आपल्यासारख्या व्यक्तीकडून सल्ला / ना हरकत घेण्याची गरज पडणार नाही. अहो आजच्या प्रगत समाजात अशी चर्चा होणे हे तो प्रगत नसल्याची खूण आहे. मोठ्या व्यक्तींना आपण सल्ला द्यायचा. ज्यांनी आपल्या एवढ्याच वयाच्या त्यांच्या मुलांना वाढ्वून हे आयुष्य दिलं? त्यांना स्वतःला आज मुक्तपणे जगायला हवे.
लिव्ह इन रिलेशन्शिप असो वा इतर नाती, व्यक्तिगत प्रश्न असतो हे कधीही विसरले जाऊ नये. आपण ज्या गोष्टीची चर्चा करतो आहोत, ती करण्याचा अधिकार त्या व्यक्तीला / व्यक्तींना आहे की ज्यांच्याशी असा नातेसंबंध करण्याचे प्रयोजन आहे. आपल्यासारख्या समजातील इतर व्यक्तींना हा अधिकार कोणी दिला? त्या त्या व्यक्ती तसे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेतच की!
अरे! मी पृष्ठ १ वरुन प्रतिसाद
अरे! मी पृष्ठ १ वरुन प्रतिसाद वर क्लिक केल्याने एकदम "नवीन प्रतिसाद द्या" विंडो मध्ये आलो नि टाईप करत गेलों ......... नंतर कळले की चाणक्य यांचेही असेच मत आहे............ धन्यवाद चाणक्यजी... सुजाण माणसं समाजात आहेत तर ....!!
बरोबर आहे दिपकजी.
बरोबर आहे दिपकजी.
जोपर्यंत चर्चा विवाह
जोपर्यंत चर्चा विवाह संस्थेकडे वळत नहती तोपर्यंत प्रॉब्लेम नाही. संस्कृती विकसित होत असताना एका टप्प्यावर लग्नसंस्था अस्तित्वात आली. त्याआधी लिव्ह इन रिलेशनशिपच अस्तित्वात होती. त्याही आधी मातॄसत्ताक पद्धती अस्तित्वात होती. यात पुरूषाचा उपयोग प्रजननासाठी आणि जंगलातून फळ आणणे, शिकार करणे, सुरक्षा इथपर्यंतच मर्यादीत होता. भारतातल्या काही आदिवासी जमातीत अगदी पंधरा वीस वर्षापूर्वीपर्यंत ही पद्धत अस्तित्वात होती.
विवाहसंस्थेत तोटे निश्चित असतील. त्याचबरोबर फायदेही असतील. लिव्ह इन रिलेशनशिप हा व्यक्तिगत चॉईस आज तरी आहे. ज्यांना ते पटते त्यांनी जरूर त्या व्यवस्थेचा अंगिकार करावा. पण विवाहसंस्थेवर एकांगी मते टाळलेली बरी.. फायदे तोटे प्रत्येक ठिकाणी असतात.
इथे काही जणांच्या पोष्टमधे
इथे काही जणांच्या पोष्टमधे म्हातारपणीचा एकटेपणा घालवणे एव्ह्डाच purpose आहे,लैंगिक सबंध नसणारच हे ग्रुहीत धरलय्.हे ,आपण हळुच आपल्या अपेक्षा त्यांच्यावर लादतोय असे नाही का वाटत?...
बाकी आर्थिकद्रुष्ट्या स्वावलंबी असलेल्या व्यक्तींनीच हे निर्णय घ्यावे.पुर्णपणे परक्या माणसाची जबाबदारी आपल्या मुलांनी घ्यावी अशी अपेक्षा करु नये.
लिव्ह इन ला समाजाने अगदी
लिव्ह इन ला समाजाने अगदी मोकळेपणे मान्यता दिली तरी कीती जणांना सुयोग्य जोडीदार मिळणार आहे ????? इथे अनेक तरूण सुयोग्य मुले मुली ३०-३५ शीला आली तरी त्यांची लग्ने ठरत नाहीय्ते, हजार प्रश्न असतात. तिथे किती म्हातार्यांना हे भाग्य लाभणार ?? बरे या लिव्ह इन मधेही सगळे नियम पारंपारिकच रहाणार का?
बाईनेच पुरुषाकडे रहायला जायचे? घराची जबाबदारी, स्वयंपाक पाणी ई सगळे बघायचे?
बाईनेच त्याच्या बरोबर 'तडजोड' करून रहायचे ?
जात , धर्म या गोष्टी पण बघितल्या जाणार का?
सध्याचा जोडीदार आवडेनासा झाला आणि दुसरा\ दुसरी आवडायला लागली तर?
दोघांचे आर्थिक हितसंबंध कसे जपणार?
दोघांपैकी एखादा अंथरूणाला खिळला तर??
आपल्याकडे कोणात्याही वयातले स्त्री- पुरुष एकत्र आले की लगेच ' नाते जोडायचे' आणि नात्यच्या बंधनात अडकायचे का इतके जरूरीचे वाटते कळत नाही. मैत्रि करा, जे कोण आवडत असेल त्याच्या बरोबर वेळ घालवा , पण स्वतंत्र रहा ना. 'लिव्ह इन' / लग्न अशी 'नावे' द्यायची गरजच काय???
Pages