Submitted by नीतु on 20 February, 2012 - 23:29
लिव्ह इन रिलेशनशिप या विषयाला नागपूर मध्ये अरविंद गोडबोले या ज्येष्ठ नागरिकाने वाचा फोडली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी लिव्ह इन रिलेशनशिप असावी असे त्यांना वाटते. यासाठी त्यांना सगळीकडून भरगोस प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या संस्थेचा सभासद होण्यासाठी बरेच जेष्ठ नागरिक उत्सुक आहेत. आपल्या माय बोलीकरांची याबाबत काय मते आहेत? आपण आपल्या आई वडीलांना किंवा घरातील अन्य जेष्ठ नागरिकांना या रिलेशनशिन मध्ये बघू शकाल का? ही केवळ एक चर्चा आहे. माझ्या मते या वयात अशी रिलेशनशिप ठेवण्यापेक्शा त्यांनी रजिस्टर लग्न करावे. काय आहेत आपले विचार जरुर लिहा.
गुलमोहर:
शेअर करा
वस्तुस्थिती बोलून दाखवणे,
वस्तुस्थिती बोलून दाखवणे, कुणाला दिसू देणे हे शक्यच नसते अश्या स्त्रियांना. नाहीतर लगेच घाणेरडी लेबलं चिकटतात, अगदी पोटच्या पोरांकडूनसुद्धा त्यामुळे कमतरता जाणवत नाही, आनंदाने जगू शकतोय हे दाखवावेच लागते. >> +१.
कित्येकदा स्त्रियांची स्वतःशीही आपल्याला जाणवणारे एकटेपण, जोडीदाराची गरज ही मान्य करण्याची तयारी नसते. स्वतःच्याच विचारांची भीती असते. तोही कंडिशनिंगचाच एक परिणाम आहे.
नी, अकु सहमत!
नी, अकु सहमत!
नीरजा आणि अरुंधतीशी अगदी
नीरजा आणि अरुंधतीशी अगदी सहमत!!
फार फार बरं होईल अशा प्रकारचं सहजीवन आपल्या सिनियर सिटिझन्सना मोकळेपणानं जगता आलं तर!
नीधप | 21 February, 2012 -
नीधप | 21 February, 2012 - 21:18 नवीन
आपल्या समाजात तरी होममेकर स्त्रियांची कुटुंबात इतकी मानसिक गुंतवणूक असते, कि जोडीदाराची कमतरता नाही जाणवत. नवरा स्वर्गवासी झाल्यावर पण अशा स्त्रिया, आपले आयुष्य आनंदाने कुटूंबात जगू शकत. <<<
हे एक प्रकारचे माइंड कंडिशनिंगच आहे. वस्तुस्थिती बोलून दाखवणे, कुणाला दिसू देणे हे शक्यच नसते अश्या स्त्रियांना. नाहीतर लगेच घाणेरडी लेबलं चिकटतात, अगदी पोटच्या पोरांकडूनसुद्धा त्यामुळे कमतरता जाणवत नाही, आनंदाने जगू शकतोय हे दाखवावेच लागते.>>
अरुंधती कुलकर्णी | 21 February, 2012 - 21:49
वस्तुस्थिती बोलून दाखवणे, कुणाला दिसू देणे हे शक्यच नसते अश्या स्त्रियांना. नाहीतर लगेच घाणेरडी लेबलं चिकटतात, अगदी पोटच्या पोरांकडूनसुद्धा त्यामुळे कमतरता जाणवत नाही, आनंदाने जगू शकतोय हे दाखवावेच लागते. >> +१.
कित्येकदा स्त्रियांची स्वतःशीही आपल्याला जाणवणारे एकटेपण, जोडीदाराची गरज ही मान्य करण्याची तयारी नसते. स्वतःच्याच विचारांची भीती असते. तोही कंडिशनिंगचाच एक परिणाम आहे.
स्वाती२ | 21 February, 2012 - 21:55
नी, अकु सहमत!
मृण्मयी | 21 February, 2012 - 22:13
नीरजा आणि अरुंधतीशी अगदी सहमत!!
>>>>>
बायका स्वभावाने इतक्या साध्यासुध्या नसतात व येथे स्त्रीवाद आणि लिव्ह इन यांची मिसळ असू नये असा प्रतिसाद श्री पेशवा यांच्या सुचवणीवरून संपादीत करत आहे.
-'बेफिकीर'!
नीधप, माजघरातले हुंदके कधी
नीधप, माजघरातले हुंदके कधी बाहेर ऐकूच आले नाहीत.
बेफी जरा ऐकुन घ्या लोक काय
बेफी जरा ऐकुन घ्या लोक काय म्हणतायत ... प्रत्येक ठिकाणी मताची पिंक (दुसर्याच्या मतावर) टाकणे गरजेच आहे? संयुक्तामुळे तुम्ही थ्रेटन व्हायचे काही कारण? नसेल तर जरा कीबोर्डाला इश्रांती द्या की... तसाही बायकांवर तुमचा प्रचंड अभ्यास आहेच तेंव्हा अशा अल्पमती बायकांच्या अभिप्रायावर कशाला कीबोर्ड झिजवताय ?
त्यापेक्शा प्रकांड अभ्यासाने केलेले नवीन विभास-प्रकरण लिहायला घ्या बरे.
>> ढुंकून न बघणार्या बायका
>> ढुंकून न बघणार्या बायका आता अस्तित्वात आहेत.
पूर्वीही होत्याच हो. पण त्या समाज काय म्हणेल म्हणून नातेसंबंधाच्या गुंत्यात अडकल्या असतील का?
जीवशास्त्रीय दृष्टीने बघता मनुष्यप्राण्यात वात्सल्यभावना इन्स्टिंक्टिवली येत नाही. संस्कारातूनच येते. (तसेच चिम्पान्झी वगैरेंचे) त्यामुळे पोटच्या पोराबद्दल प्रेम हे गृहित धरू नये.
पेशवा | 22 February, 2012 -
पेशवा | 22 February, 2012 - 00:46 नवीन
बेफी जरा ऐकुन घ्या लोक काय म्हणतायत ... प्रत्येक ठिकाणी मताची पिंक (दुसर्याच्या मतावर) टाकणे गरजेच आहे? संयुक्तामुळे तुम्ही थ्रेटन व्हायचे काही कारण? नसेल तर जरा कीबोर्डाला इश्रांती द्या की... तसाही बायकांवर तुमचा प्रचंड अभ्यास आहेच तेंव्हा अशा अल्पमती बायकांच्या अभिप्रायावर कशाला कीबोर्ड झिजवताय ?
त्यापेक्शा प्रकांड अभ्यासाने केलेले नवीन विभास-प्रकरण लिहायला घ्या बरे(दिवा)
>>
बरं, संपादीत करतो माझा प्रतिसाद, माफ करा, बायका अल्पमती आहेत असे म्हणू नका, कारण आपण त्यांचीच बाजू घेताय पेशवा.
थोडा वेळ थांबा, संपादीत करतो प्रतिसाद.
(अवांतर - तो शब्द बहुधा विबासं असा असावा. तुम्ही जो 'विभास' असा लिहिला आहेत तो शब्द. अर्थात, तुमचे ते विधान अनावश्यक आहे म्हणा, पण मी काही ते दाखवून देणार नाही. माझा बायकांवर किती अभ्यास आहे हेही अनावश्यकच, पण माझा मूळ प्रतिसाद मात्र अनावश्यक नव्हता याबाबत मी ठाम आहे.)
-'बेफिकीर'!
(बाय द वे - कीबोर्ड माझा, प्रतिसाद माझा, तुम्ही काही बाई नाही वा संयुक्तापैकी नाही, तुम्हाला काय झाले?)
जीवशास्त्रीय दृष्टीने बघता
जीवशास्त्रीय दृष्टीने बघता मनुष्यप्राण्यात वात्सल्यभावना इन्स्टिंक्टिवली येत नाही.>>>
सजीवसृष्टीतील पहिल्या सस्तन आईने आपल्या पिल्लाला दूध पाजणे हे कसे काय संस्कारातून होईल?
मुद्दा हा (असावा) आहे की आज
मुद्दा हा (असावा) आहे की आज ज्येष्ठांनी लिव्ह इन ची अपेक्षा धरल्यास आजच्या पिढीचे मत काय?
त्यात पूर्वी बायका गरीब होत्या ह्याचा कसा काय संबंध येतो?
आणि आजच्या स्त्रियांची तितकीच गुंतवणुक (संसारात - जोडीदार गेल्यानंतरही) असते हे वाक्य जनरलाईझ्ड नाही काय?
(जोडीदार असतानाही संसारात गुंतणूक नसणार्या स्त्रियांची अनेक उदाहर्णे असताना)
बेफिकिर, मी लिहिलेल्या पोस्ट
बेफिकिर,
मी लिहिलेल्या पोस्ट खाली देतेय.
स्वाती२ | 21 February, 2012 - 05:56
साती, पोस्ट आवडली. +१००.
माझे उत्तर हो असे आहे आणि उतार वयात सोबत शोधताना वर्षभर तरी लिव इन केल्याशिवाय लग्न करु नये हे माझे स्पष्ट मत आहे.
स्वाती२ | 21 February, 2012 - 07:46
>>आपल्या नात्यातील व्यक्तीने जर असे घराबाहेर नाते जोपासायचे ठरवले तर
मला वाटते, आपल्याला आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. आपण त्या व्यक्तीला,
मी घरात अडगळ आहे, मी कुणालाच नको आहे, असा विचार करायला भाग पाडतो
आहोत का ? आपल्यातला संवाद खुंटलाय का ? असे स्वतःला विचारणे गरजेचे आहे.>>
हे पट्ले नाही. अवती भवती मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे वगैरे जिव्हाळ्याची माणसे असली तरी जोडीदाराची उणीव ती नाही भरुन काढू शकत. तशी अपेक्षा करणे हे दोन्ही बाजूनी चुकीचे. अपत्याशी/नातवंडाशी असलेल्या नात्याचे रंग वेगळे आणि जोडीदाराशी असलेल्या नात्याचे रंग वेगळे. त्यामूळे आयुष्याची संध्याकाळ आनंदात घालवण्यासाठी नव्याने जोडीदार शोधल्यास इतर नाती त्यांच्या दायित्वात कमी पडली असे मानणे मला तरी पटत नाही. जोडीदार हवाय म्हणून जोडीदार शोधावा. मुलं विचारत नाहीत म्हणून जोडीदार शोधणे हा पर्याय सशक्त नाही वाटत.
स्वाती२ | 21 February, 2012 - 09:58
दिनेशदा, जोडीदाराची गरज भासत नसेल तर प्रश्नच येत नाही. माझ्याही नात्यात जोडीदार गेल्यावर नातवंडात रमून गेलेले स्त्री/पुरुष आहेत. तसेच मुलगा/लेक यांच्याबरोबर न रहाता एकटे रहाणारे, नविन जोडीदार शोधायचा विचार न करणारेही आहेत.
मात्र एखादी व्यक्ती जेव्हा पुन्हा जोडीदाराचा विचार करते तेव्हा 'आम्ही सगळे व्यवस्थित करतो मग ही थेरं कशाला किंवा या वयात लग्न करायची वेळ आणली मुलांनी' असा विचार केला जातो ते पटत नाही.
स्वाती२ | 21 February, 2012 - 21:55
नी, अकु सहमत!
यात एकांगी काय आहे?
उगाच कायच्या कै धूळ उडवणे नको आणि माझे विचार हे माझे विचार आहेत. याचा संयुक्ताशी काय संबंध? संयुक्ताची सदस्य असण्याचा माझ्या ओपन फोरमवरील पोस्टशी काय संबंध? बाकी पोटच्या पोराकडे ढुंकून न बघणारी स्त्री अस्तित्वात आहे आणि पुरुषही. मी कधीच अशा बेजबाबदार वागण्याचे समर्थन केले नाहीये, आणि अशा प्रकारच्या वर्तनाचा उतारवयात जोडीदार शोधण्याशी काय संबंध आहे ते मला तरी समजले नाही.
आजही अकाली जोडीदार गमावलेल्या स्त्रीला उर्वरीत आयुष्य मुलांकडे बघून जगायचा सल्ला दिला जातो तर अकाली जोडीदार गमावलेल्या पुरुषाला वर्षाच्या आत मुलांसाठी तरी पुन्हा विवाह करायचा आग्रह होतो. मात्र एकदा का व्यक्तीची पन्नाशी उलटली की स्त्री/पुरुष दोघांनाही नविन जोडीदार शोधायचा विचार केल्यास खूप विरोध सहन करावा लागतो ही वस्तूस्थिती आहे.
स्वाती २, स्वाती२ | 21
स्वाती २,
स्वाती२ | 21 February, 2012 - 21:55
नी, अकु सहमत!>>
येथपर्यंत आपल्या पोस्टशी पूर्ण सहमत आहे, संयुक्ता हा शब्द मीही संपादीत केलेला आहे पेशव्यांच्या सूचनेनुसार.
मात्र पुढील गोष्टी संयुक्ता ह्या मायबोलीवरील ग्रूपला (नेमकेपणाने) नव्हे तर एकंदरच स्त्रीबाबत असलेल्या (आजच्या) (आणि कदाचित) एकांगी भूमिकेबाबत होत्या. मी धूळ उडवत नाही आहे. मूळ विषयाशी असंबद्ध प्रतिसादांबाबत बोलत आहे.
मात्र आपले एक मत पटले नाही.
<<उतार वयात सोबत शोधताना वर्षभर तरी लिव इन केल्याशिवाय लग्न करु नये हे माझे स्पष्ट मत आहे.>>
ह्याला काही निकष कसा काय असू शकेल? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आयडियली असे असावे ही अपेक्षाही गैरच ठरेल ना?
बेफिकिर, हे माझे स्पष्ट मत
बेफिकिर, हे माझे स्पष्ट मत आहे. इतरांनी काय करावे तो ज्याचा त्याचा प्रश्न! भारतात वेगळे होणे फार कटकटीचे! उगाच आगीतून फुफाट्यात अशी अवस्था होण्यापेक्षा नव्या जोडीदाराबरोबर राहून कसे काय जमतेय ते पहाणे मला तरी शहाणपणाचे वाटते.
अहो तुम्ही ठाम होतात तर
अहो तुम्ही ठाम होतात तर संपादन काय्हून केलेत? असो केलेत ते योग्य केलेत ... असे माझे मत (जे नी च्या मता प्रमाणे चूकही असू शकते पण नी च्या मता प्रमाणे तिचे स्वतःचे मतही चुक असु शक्ते म्हणजे तिच्या बरोबर असलेल्य मता प्रमाणे माझे चुकिचे मत बरोबर असु शकते)
>> अवांतर - तो शब्द बहुधा विबासं असा असावा. तुम्ही जो 'विभास' असा लिहिला आहेत तो शब्द. >>>
बेफी तुम्ही तुफान आहत त्या शब्दाची फोड अशी : विचारी भासणारे सवंग
बाफ-करांनो अवांतर फोडणी बद्दल दिलगीर..
>>सजीवसृष्टीतील पहिल्या सस्तन
>>सजीवसृष्टीतील पहिल्या सस्तन आईने आपल्या पिल्लाला दूध पाजणे हे कसे काय संस्कारातून होईल?
मनुष्य हा काही सजीव सृष्टीतील पहिला सस्तन प्राणी नाही.
पहिल्या आणि बहुतेक सर्व सस्तन प्राण्यांत पिल्लाला दूध पाजणे नि सांभाळणे आंतरिक भावनेने येते. माणसे नि सामाजिक रचनेत राहणारे इतर प्रायमेट, तसेच इतरही काही गटांनी राहणार्या (नि तुलनेने बुद्धीमान) सस्तन प्राण्यांत वात्सल्य संस्कारांनी येते.
असो. जास्त विषयांतर नको.
मागे एकदा सोलमेट विषयावर मी
मागे एकदा सोलमेट विषयावर मी हेच उदाहरण दिले होते.
परत इथे पोस्ट करत आहे.
माझ्या लांबच्या नात्यातील एका आजी ने नवरा गेल्यावर साताठ वर्षं एकटेपण भोगलं . मुलांची शिक्षणं ,लग्न,मुलं होऊन ती आपापल्या संसारात रमली होती. एक मुलगा अमेरिकेला स्थायिक झाला होता. दुसरा ,गावात असून आठवड्यातून एखाद वेळा एकटा किंवा सपत्निक आईची विचारपूस करायला येई.
आजी चं घर मोठं असून सांपत्तिक स्थिती बळकट होती.
रोज सकाळी फिरायला जाताना ,अनेकवर्षं शेजारी राहणारे एक आजोबा भेटू लागले. त्यांचीही बायको गेल्यामुळे एकटेपणा जाणवू नये म्हणून स्वतःचा भरपूर पैसा असूनही निव्वळ सोबत,विरंगुळा म्हणून मुलाबरोबर राहायला आले. त्यांचा मुलगा,सून नोकरी करणारे होते. हळूहळू घरातील बारीक कामांबरोबर मुलांना शाळेच्या बसस्टॉप वर सोडणे,दूध,भाजी आणणे,घरी कामवाल्याबाईकडून कामं करून घेणे,मुलांचा अभ्यास घेणे इ.कामे त्यांच्या मागे लागली.शेवटी त्यांना आपल्या आवडीचा कार्यक्रम पाहायला टीवी ही मिळेना, ती वेळ मुलांच्या टीवी पाहाण्याची असे किंवा सुनेची सीरिअल पाहण्याची. दुसरा टीवी,विजेचा खर्च वाढेल या सबबीवर मुलगा घ्यायला तयार होईना..
शेवटी मुलाबरोबर राहणे म्हंजे फक्त आजोबांनी अॅडजस्ट करून राहणे अपेक्षित झाले.
घरी बोलून न दाखवता येणारे सल,आजी आणी ते आजोबा(वय वर्षं ६५-६६) आपसात शेअर करू लागले. कधी दुपारी एकमेकांकडे बसून निवांत चहा घेऊ लागले. गप्पा मारताना त्यांना कळले कि त्यांच्या खाण्यापिण्याच्या,वाचनाच्या आणी इतर काही बारीकसारीक आवडी सारख्याच आहेत.
शेवटी दोघांनी आपापल्या मुलांच्या विरोधाची अजिबात पर्वा न करता एकत्र राहायला सुरुवात केली. शेवटपर्यन्त लग्न न करता एकत्रच राहिले. दोघं आपापला खर्च उचलायचे पण त्यातही एक सामंजस्य नव्हते.
या रिलेशनशिप ला मुलांचा विरोध तर होताच्,पण शेजार्यांनाही गॉसिप करण्याकरता नवीन विषय मिळाला होता.
समाजाकडे दुर्लक्ष करून ,हिमतीने त्या दोघांनी आपला निर्णय कायम ठेवला. पुढे काही कालांतरानंतर मुलं ,शेजारी नॉर्मल वागू लागले त्यांच्याशी..
विशेष म्हणजे ही गोष्ट घडली पुण्यात,१९६०,६५ साल असेल.. लहानपणी जे आम्हाला कुजबुजीतून समजलं होतं ते आम्ही मोठे झाल्यावर नीट कळालं आणी आम्ही त्या आजीकडे आदरायुक्त नजरेने पाहू लागलो.
<<आपण आपल्या आई वडीलांना
<<आपण आपल्या आई वडीलांना किंवा घरातील अन्य जेष्ठ नागरिकांना या रिलेशनशिन मध्ये बघू शकाल का? ही केवळ एक चर्चा आहे. माझ्या मते या वयात अशी रिलेशनशिप ठेवण्यापेक्शा त्यांनी रजिस्टर लग्न करावे. >>
आई वडीलांना नाही बघू शकणार. पण इतरांना बघू शकेन त्यात काही वाटणार नाही. लिव्ह इन काय किन्वा लग्न काय , दोन्हीतही बायकांच्या वाट्याला आर्थिक,सामाजिक , मानसिक समस्याच जास्त येण्याचीशक्यता वाटते.
मलातरी लिव्ह इन किन्वा लग्नाएवेजी सगळ्यात उत्तम पर्याय म्हण्जे वृद्ध 'सहनिवास' होईल असे वाटते. जिथे सगळ्या व्रुद्धांना स्वतंत्रपणे रहाता येईल. आवडत्या व्यक्तिंबरोबर हवा तेव्हढा वेळ घालवता येईल. पण कोणाचीही कोणावरही 'जबाबदारी' नसेल, अधिकार नसेल. नात्यामुळे येणारी नकोशी बंधने नसतील. एखाद्याबरोबर नाही जमले, आपला निर्णय चुकला असे वाटले तर मनाप्रमाणे दुसरा साथीदार शोधता येईल. मनमोकळेपणाने रहाता येईल.
दुखल्या खुपल्याला पगारी केअरटेकर असतील. वृद्धांची आजारपणात शारीरिक सेवा करण्यासाठी , बाकी व्यवस्था बघणयासाठी पगारी माणसे असतील.
छान चालू आहे चर्चा. व्यक्ती
छान चालू आहे चर्चा. व्यक्ती तितक्या प्रकृती!
मलाही वृध्द सहनिवास हा पर्याय योग्य वाटतो. त्यात एकमेकांशी ओळख होऊन एखादं नातं फुललं तर ते पुढे जरूर न्यावं. पण उगाचच खटाटोप करून लिव्हइन करता प्रयत्न करण्याची गरज नाही असं वाटतं.
मलाही वृध्द सहनिवास हा पर्याय
मलाही वृध्द सहनिवास हा पर्याय योग्य वाटतो. त्यात एकमेकांशी ओळख होऊन एखादं नातं फुललं तर ते पुढे जरूर न्यावं. पण उगाचच खटाटोप करून लिव्हइन करता प्रयत्न करण्याची गरज नाही असं वाटतं.<<<
हा पर्याय जास्त आवडला.
उतारवयात २४ तास नवीन माणसाशी अॅडजस्ट करणं सोपं नसणार.
विचारी भासणारे सवंग>>>
विचारी भासणारे सवंग>>>
पेशवे, अफलातून फोड आहे
डेलिया आणि मामी, तुम्ही
डेलिया आणि मामी, तुम्ही ज्याला सहनिवास म्हणता तो वानप्रस्थाश्रमासारखा वाटतो.
नीधप, नव्या माणसासोबत २४ तास घालवायची गरज नाही. जमेल तितके क्षण आनंदाने व्यतीत करायला मिळावेत हा हेतू आहे.
आ.न.,
-गा.पै.
२४ तास म्हणजे एकत्र एका घरात
२४ तास म्हणजे एकत्र एका घरात रहाणं या अर्थी घ्या.
निव्वळ सोबत असावी, गप्पा
निव्वळ सोबत असावी, गप्पा मारायला कुणीतरी असावं, दुखलंखुपलं तर विचारपूस
करायला कुणीतरी असावं.. या बाबी आता मुख्य असतील असे मला वाटते.
पुर्वी आर्थिक कारणासाठी असा पर्याय निवडल्याची उदाहरणे माझ्या बघण्यात आहेत.
पण मग ती तडजोडच ठरली.
डेलिया +१
डेलिया +१
आपण आपल्या आई वडीलांना किंवा
आपण आपल्या आई वडीलांना किंवा घरातील अन्य जेष्ठ नागरिकांना या रिलेशनशिन मध्ये बघू शकाल का? >>>
काय हरकत आहे? नक्कीच चालू शकेल. एकटेपणा वाईट. त्यातून उतारवयातला तर जरा जास्तच. कोणी असा जीवनसाथी त्यांना लाभला, आणि त्यांचं जीवन सुखावह होणार असेल, तर नक्कीच मी कोणालाही अशा रिलेशनमध्ये बघू शकेन. फक्त आपल्या समाजात इतरांच्या आयुष्यात नाकं खुपसणारे आणि कुजबुजणारे लोक फार आहेत. त्यामुळे त्या जेष्ठ नागरिकांना मानसिक त्रास होऊ नये, हे महत्त्वाचं. नाहीतर एकटेपणा परवडला, अशी त्यांची गत व्हायची! आधीच ते जुन्या पिढीतले. त्यामुळे स्वतःला नीट डिफेन्डही नाही करु शकणार. त्यांनाच आपण काहीतरी वाईट करतोय अशी अपराधी भावना नको निर्माण व्हायला. हे शक्य असेल, तर हा विचार अतिशय चांगला आहे.
>>विशेष म्हणजे ही गोष्ट घडली
>>विशेष म्हणजे ही गोष्ट घडली पुण्यात,१९६०,६५ साल असेल..
वर्षू, साल चुकलं बहुतेक. ६०-६५ मधे पुण्यात टीव्ही कुठे होता?
मला अजून एक पर्याय सुचला आहे
मला अजून एक पर्याय सुचला आहे तो म्हणजे डे केअर सेंटर्स, या वयातली मुख्य समस्या म्हणजे वेळ घालवणे दिवसभर बोलायला कोणी मिळाले तर एकटेपणा वाटणार नाही. सकाळी १० ते संघ्याकाळी ७ पर्यंत जर ही सेंटर्स चालू ठेवली तर बय्राच समस्या सुटू शकतील. मला वाटते पुण्यात अशी सेंटर्स चालू झाली आहेत. मला जर संधी मिळाली तर मला यासाठी काम करायला खूप आवडेल.
माझ्या ओळखीतील एका ख्यातनाम
माझ्या ओळखीतील एका ख्यातनाम विचारवंत असलेल्या प्राध्यापकांचे मत.ते ७७ वर्षांचे व त्यांच्या पत्नी ७५ वर्षांच्या आहेत. मी त्यांच्या मताशी सहमत आहे.
"ज्येष्ठांचे 'लिव-इन-रीलेशनशिप' या विषयावरील स्नेहा दामलेंचा लेख विचार करायला लावणारा आहे. नागपूरच्या ८१ वर्षीय अरविंद गोडबोले यांनी त्यावर चर्चासत्र घडवून आणले यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत. पारंपारिकतेला घट्ट चिकटून राहिलेल्या आपल्या समाजाची डोळे उघडून जगाकडे आणि मानवी प्रश्नांकडे वास्तववादी दृष्टीकोनातून पाहण्याची तयारीच नाही. एकूणच, लिव-इन ला विरोध करणारी आपली मंडळी आपणच कुटुंब व्यवस्था आणि विवाहसंस्था यांचे पाईक नि समर्थक आहोत, असा पोकळ दावा सतत करताना दिसतात. वास्तविक मानव निर्मित या दोन्ही संस्था इतक्या खोलवर रुजलेल्या आहेत कि त्यांना संपविणे नजीकच्या काळात तरी कोणालाही शक्य होणार नाही. वृद्धांच्या बाबतीत आपला एकमेव आधार कायमचा तुटल्यावर निर्माण होणारी मानसिक पोकळी वृद्धत्वाचे शारीरिक प्रश्न यावर आजच्या बदललेल्या सामाजिक परिस्थितीत तोडगाच दिसत नाहीय. या बाबतीत सारे ज्येष्ठ नागरिक कायमच काही जात्यातले तर काही सुपातले असतात. आपणापैकी एकजण एकटा पडणार, हे सत्य कायम मनात जागे ठेवून जगणारया ज्येष्ठांस ते केव्हा हेच फक्त ठावूक नसते इतकेच. लिव्ह-इन त्यावर एक पर्याय देवू शकेल, कारण वृद्धाने लग्न करणे हा त्यावरील उपाय ठरू शकत नाही. त्यामुळे आर्थिक प्रश्न, मालमत्तेवरील हक्क यांचे कुटुंबावरील नको असे परिणाम निर्माण होवून माणसे तुटली जातील. म्हणूनच विवाहासाठी लिव्ह-इन हा पर्याय ठरू शकतो. लैंगिकता जन्मभर अंगावर वागविल्या नंतर तिचे जोखड निदान म्हातारपणात तरी माणसाने मनावरून फेकून द्यायला हवे. दोन व्यक्तीं शारीरिकता सोडून जमेल तितका काळ एकत्र राहून एकमेकांना आधार आणि आनंद देवू शकत असतील, आणि तेही इतरांना त्रास न देता, तर वृद्धांसाठी लिव्ह-इन चा पर्याय का नको? खरे तर, तरुणान पेक्षा ज्येष्ठा साठीच ती एक योग्य व्यवस्था ठरू शकेल. शारीरतेपेक्षा मानसिक जोपासना लिव्ह-इन जास्त प्रभावी पणे करू शकेल. वृद्धापकाळात माणसाच्या हाती मरणाचे स्वातंत्र्यहि नसते. निदान चांगले जगण्यासाठी तरी त्याने का प्रयत्न करू नयेत? त्यासाठी इतरांसाठी त्याग आणि स्वतःची आत्मवंचना मात्र सोडायला हवी. 'लोक काय म्हणतील' या पेक्षा, हे आयुष्य माझे आहे आणि ते आनंदाने जगण्याचा अधिकार फक्त मला आहे, असे खरेखुरे व्यक्तिस्वातंत्र्य मात्र आपण मनापासून अंगीकारायला हवे. पृथ्वीवर एकटाच उरलेला ज्येष्ठ काही अंशी तरी येथे स्वर्ग निर्माण करू शकेल, असे म्हणावेसे वाटते. त्यासाठी वैचारिक प्रगल्भता मात्र हवी. हा पर्याय सर्वा पेक्षा काहींसाठी जास्त सुयोग्य ठरू शकेल. मात्र संबंधित दोन्ही व्यक्तींचे हित लिव्ह-इन ठरण्या पूर्वीच जपले गेले पाहिजेत. विशेषतः त्यातील स्त्रीचे. ती नंतर कधीही एकटी पडणार नाही, हे पाहिले गेले पाहिजे. म्हणजेच लिव्ह-इनला समाज मान्यता मिळाली पाहिजे. असे झाले तर ज्येष्ठांसाठी तो सुदिन ठरेल.
हो, जरूर असावे. मामीला पुर्ण
हो, जरूर असावे.
मामीला पुर्ण अनुमोदन!!!!!!!!!!!!!!!!
(No subject)
Pages