वर्तुळ

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

पुन्हा नव्या वाटा, नवी नावं
नवे चेहरे आणि नवी गावं
अव्याहतपणे चाललेलं हे चक्र...

एका वर्तुळातून दुसरं वर्तुळ
नवे व्यास पण केंद्रबिंदू तोच
परीघ मापणारी जुनीच पावलं
फिरून पहिल्याच बिंदूपाशी पोचणारी

नवी शिखरं, नवं आकाश
जुन्याचं काय करायचं सुचत नाही
अजून माझ्या मनाएवढी दुसरी जागा शोधायची आहे...

पुन्हा नवे अर्थ, नवे शोध
नवे शब्द, नवेच बोध
जुन्या वर्तुळात अडकून राहीलेला पाय

कुठवर जात राहणार हे असं?

विषय: 
प्रकार: 

आवडली!! नव्या जुन्याचा नेहमीचा डाव....हे असेच चालत रहाते....ह्यातून कोणी सुटले नाहीत...बोलून दाखवण्याची हिम्मत केल्यबद्दल कौतुक!!

>>अजून माझ्या मनाएवढी दुसरी जागा शोधायची आहे...

जबरा पंच आहे Happy आवडलं. पण अधिक फुलवता आलं असतं असं माझं मत.

धन्यवाद सर्वांना!

निंबुडा: तुझ्या कविता याआधी नव्हत्या वाचल्या. या निमित्ताने वाचायला मिळाल्या. विशेष आभार. छान आहेत.