'शिव' दुर्ग

Submitted by आशुचँप on 20 February, 2012 - 08:43

दुर्ग गणेश (http://www.maayboli.com/node/28677) आणि दुर्गे दुर्घट भारी (http://www.maayboli.com/node/29506) यानंतर त्याच मालिकेतील शिवदुर्ग हा पुढचा भाग सादर करण्यात फार समाधान वाटत आहे. शंकर हा खरा निसर्गातला देव. रानावनात, दर्याखोर्यात, जिथे निरव शांतता आणि घनदाट जंगल असेल अशा ठिकाणी विसावलेला. त्यामुळे दुर्गभटक्यांना अनेक अनघड ठिकाणी या रुद्राचे दर्शन घडत राहतेच.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने या शिवदुर्गांचे प्रचि सादर करत आहे. गेल्यावेळेप्रमाणेच मायबोलीकर त्यांच्याकडील प्रचि टाकतीलच याची खात्री आहे. केवळ प्रचि न टाकत त्या बरोबर काही वेगळी माहीती असेल तर ती सुद्धा टाकल्यास चांगले होईल.

ओम नमं शिवाय

हरिश्चंद्रगडावरील या शिवपिंडीचा फोटो टाकल्याशिवाय या मालिकेला सुरुवातच करता येणार नाही. माझ्या माहीतीनुसार गडावर असलेल्या शिवपिंडींपैकी आकाराने सर्वात मोठी पिंड हीच आहे. कंबरभर गारठणक पाण्यातून या पिंडीला प्रदक्षिणा घालणे हा एक मोठा अद्भुत अनुभव आहे. असे म्हणतात की या गुहेला पूर्वी चार खांब होते. प्रत्येक युगाचा एक असे. त्यापैकी तीन खांब पडून गेले आहेत. कलीयुगाचा खांब शिल्लक आहे. तो पडल्यावर जगप्रलय होणार आहे.

२. सुधागडावरील मंदिराचे प्रवेशद्वार..याच मंदिरात हिस्स प्रकरण घडल्याने तिथल्या पिंडीचा फोटो घेऊ शकलो नाहीये. कुणाकडे असेल त्याने कृपया शेअर करावा.

३. सरसगडावरील केदारेश्वराचे मंदिर

४. कावनई गडावरील उघड्यावर स्थापन केलेले शंभु महादेव

५. कावनई गावाजवळ कपीलधारातीर्थ म्हणून एक देवस्थान आहे. त्यातील एक छायाचित्र

६. कोल्हापूराजवळील गगनगडावरील शिवपिंड

७. कोल्हापूराजवळील रामलिंग आश्रम

८ .मधुमकरंदगडावरील शिवपिंडीजवळील तांब्याचे नाग

गुलमोहर: 

सर्वच प्रचि सुंदर.कर्नाळा,कणकेश्वर,रायगड वगळता कोणतेच गड चढले नसल्याने इतर गडांवरील शिवलिंगांचे दर्शन घरबसल्या करून दिल्याबद्दल सर्व प्रचिकारांना धन्यवाद!

रतनगडच्या पायथ्याशी असलेले सुप्रसिद्ध हेमाडपंती मंदीर 'अमृतेश्वर'

- -
गाभार्‍यातील पाण्यात असलेले मंदीर

- - - -

'हडसर' किल्ल्यावरील महादेव मंदीर

- - -

राजधेर (राजदेहेर) किल्ल्यावरील

- - -

प्रतापगडावरील हे मोठे शिवलिंग

--

-----
इंद्राई किल्ल्यावरील

- -

- ---
सिद्धगडावरील

- - -

सुधागडावरील भोईरेश्वर मंदीर

- -

- - - -

राजगडच्या बालेकिल्ल्यावरील

ॐ त्र्यम्बकं यजामहे
सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान्
मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥

महाशिवरात्री आणि मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेछा!!!
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी

ॐ त्र्यम्बकं यजामहे
सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान्
मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥

महाशिवरात्री आणि मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेछा!!!
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी

Pages