सस्नेह निमंत्रण - मुशाफिरी - उदघाटनाचा मुशायरा

Submitted by विजय दिनकर पाटील on 14 February, 2012 - 06:14
ठिकाण/पत्ता: 
हॉटेल रामा हेरीटेज, कालिका मंदीराशेजारी, महामार्ग बस स्थानकाजवळ, जुना आग्रा रोड, नाशिक.(कार्यक्रमाचे ठिकाण महामार्ग, सी.बी.एस. आणि द्वारका ह्या ठिकाणांवरून सहज सापडेल असे आहे व कालिका मंदीर हे नाशिकच्या ग्रामदेवतेचे मंदीर असल्याने सर्वांना ज्ञात आहे.) ============================================================================

=========================================================================
मुशाफिरी ह्या संकल्पनेचा उदय, त्यामागची प्रेरणा आणि मार्गक्रमणाची दिशा ह्याचा अंदाज येण्यासाठी हे जरूर वाचावेत मुशाफिरी-प्रवास गझलेच्या अंतरंगाकडे

सप्रेम नमस्कार,

मूल चालण्यासाठी पहिले पाऊल टाकते तेव्हा आईला किती आनंद होत असावा?

पहिल्यांदाच प्रवासाला निघताना पहिले पाऊल टाकताना होणारा आनंद तितकाच अवर्णनीय असतो ह्याचा प्रत्यय आज मला हा लेख लिहीताना येतो आहे.

ह्या आनंदाची तुलना आई-मुलाच्या नात्याशी करण्याचे धाडस करताना मला यत्किंचीतही बिचकल्यासारखे वाटत नाही ह्याचे कारण म्हणजे हा गझल सापडण्यासाठी सुरू केलेला प्रवास आहे. ह्यात गंतव्यस्थान काय असणार आहे ह्याचे आडाखे नाहीत, आहे ती फ़क्त सहप्रवाशांच्या हातात हात घालून, ह्यावरच्या विविध वळणांचा मनमुराद आस्वाद घेत गझलेच्या आधिकाधिक जवळ जाण्याचा हा प्रयास धुंद करण्याची एक प्रबळ आंतरीक इच्छा!

तर मित्रहो, ह्या लेखाद्वारे आपणां सर्वांना आमंत्रित करताना प्रचंड आनंद होत आहे की, श्री. भूषण कटककर ’बेफ़िकीर’, डॉ. कैलास गायकवाड आणि मी अशा तिघांनी करायच्या ठरवलेल्या मुशाफ़िरीचा अधिकृत प्रारंभ शुक्रवार दि. २४.०२.२०१२ रोजी सायंकाळी साडेसहाला नाशिक इथून सुरू होत आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा :

०६.३० ते ०७.०० - शायरांचे आगमन आणि ’मुशाफ़िरी’चे उदघाटन.

०७.०० ते ०७.१५ - ’शेरास सव्वाशेर’ - ह्यात तिन्ही शायरांच्या एकाच जमीनीतील तीन ’तरही’ गझलांतील शेरांचे एका पाठोपाठ एक शेर असे वाचन होईल(म्हणजे एका शायराचा एक शेर झाल्यानंतर लगेच दुस-या शायराचा शेर लगेच तिस-या शायराचा शेर पुन्हा पहिल्या शायराचा दुसरा शेर असे.... ह्यातून एकाच जमिनीत विविध शायरांचे खयाल किती विविधरीत्या येतात हे दाखवण्याचा प्रयत्न)

०७.१५ ते ०८.४५ - भूषण कटककर ’बेफ़िकीर’, डॉ. कैलास गायकवाड आणि विजय दिनकर पाटील ह्यांच्या स्वरचित मराठी गझलांचा मुशायरा.

०८.४५ ते ०९.०० - शेरास सव्वाशेर ची दुसरी फ़ेरी.

०९.०० ते ०९.१५ - कार्यक्रमाचा समारोप.

मायबोलीवरच आम्ही तिघे शायर एकत्र आलो असल्याने ’मुशाफ़िरी’च्या निर्मितीत मायबोलीचे योगदान आहेच त्याबद्दल मायबोली प्रशासनाचे आभार.

तसेच नवीन उपक्रमांना भरभरून प्रतिसाद देऊन कौतुक करण्याच्या सर्व सन्माननीय मायबोलीकरांच्या नेहमीच्या प्रघाताला अनुसरून मायबोलीकर प्रचंड संख्येने आमच्या ह्या पहिल्यावहिल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमात रंगत आणतील ह्याबद्दल आमच्या मनात तीळमात्र शंका नाही.

धन्यवाद!

विजय दिनकर पाटील.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, February 24, 2012 - 08:00 to 11:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! अभिनंदन आणि पुढील कार्यकरमास शुभेच्छा. १९५० मंगेशकरव मित्रमंडळाने जसा कवितेचा कार्यक्रम सुरु केला व उदंड यश मिळविले, तसेच तुम्हा तिघांना मिळो.

पुण्यात आयोजित केल्यास नक्की येणार.

रविवार शिवाय नाही शक्य होत. खुप हळह्ळ वाटते पण नाईलाज आहे
मुशाय-याला मनापासुन शुभेच्च्छा.

सर्व सहृदय शुभचिंतक मित्रमंडळींचे 'मुशाफिरी' तर्फे खूप खूप आभार.

कार्यक्रमाची बातमी आजच्या सकाळला(नाशिक आवृत्ती) दहाव्या पानावर 'संक्षिप्त' या सदरात छापली गेली आहे.