पाककृती..

Submitted by Kiran.. on 11 February, 2012 - 00:25

अपरंपरागत पाककृतीसाठी या बाफचा उपयोग करावा.

साखरेचा पाक

एक/दोन तारी पाक

२ वाट्या साखर १ वाटी पाणी घ्यावे. पाणी पिऊन टाकावे. वरून साखर खावी. नंतर गॅसवर बसून पाक करायला ठेवावा. उकळी आली की गॅस मंद करावा. २ मिनिटे चांगले उकळल्यावर, दोन बोटाच्या चिमटीत एक तार धरून पहावी. ही तार पाच अ‍ॅम्पिअरच्या सॉकेटमधून आलेली असावी. एकच तार बोटात धरून बटण चालू करायला सांगावे. अशा पद्धतीने एकतारी पाक तयार होतो.

हा पाक रवाबेसन लाडू,मोतीचूर लाडू,राघवदास लाडू, जिलेबी (एकतारी) साठी छान असतो.

गॅसवर बसलेले असताना दोन तारा दोन हाताच्या बोटांच्या चिमटीत पकडाव्यात. यातली एक तार निगेटीव्ह आणि एक पॉझिटीव्ह असावी. इतर प्रोसेस सारखीच. या पद्धतीने दोन तारी पाक तयार होतो.
पाकातल्या पुर्‍यांसाठी हा अतिउत्तम. याला पक्का पाक सुद्धा म्हणतात याचा साखरभात करताना सुद्धा उपयोग होतो.

३.गोळीबंद (पक्का) पाक म्हणजे ३ वाट्या साखर आणि १ वाटी पाणी गिळणे. दुस-या एका वाटीत थंड पाणी घेऊन त्यात शुगरफ्री गोळी टाकणे . हे मिश्रण खाऊन गॅसवर बसणे. चांगली उकळी येऊ द्यावी. मग गॅस बंद करणे. हा पाक डायबेटीसला चालत असून याचा उपयोग पाकातले चिरोटे, शंकरपाळ्या करण्यासाठी होतो.

नेहमीपेक्षा वेगळ्या पाककृतींसाठीच हा बाफ आहे. चला तर मग आपापली भर टाकूयात.

गुलमोहर: 

खरंचच.. या सर्व सुह्रुदांचे आभार. ते यासाठी कि जेव्हां मनाजोगतं लिखाण घडलं तेव्हांही तुम्हीच मनापासून उचलून धरलं आणि असा दंगा घातला तेव्हांही मनापासून एण्जॉय केलात :). आणि जेव्हां टुकार लिहीलं तेव्हां हक्काने कानही उपटलेत Proud

मनापासून आभार मित्रमैत्रिणींनो (लहानापासून थोरापर्यंत सर्वच)

Pages