कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मुलन प्रकरण 1. ---

Submitted by शशिकांत ओक on 9 February, 2012 - 06:40

मित्र हो,
नुकताच ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे यांचा ब्लॉग तयार झाला. त्यातील काही मजकूर मिपाकरांनी वाचावा.विचार करावा.
खालील अभिप्राय बोलका आहे.
...श्रद्धेचे अस्तित्व मानवी जीवनात अपरिहार्य आहे. हे प्रमेय विज्ञानाच्या आधारेच सिद्ध करण्यासाठी अद्वयानंद यांनी पाश्चात्य शास्त्रज्ञ संशोधकांचा आधार घेऊन केलेला युक्तिवाद खरोखरच स्तिमित करणारा आहे. बुद्धिवादाचा तसेच विज्ञाननिष्ठेचा मक्ता आपल्याकडेच आहे असे मानणाऱ्यांनी या पुस्तकातील युक्तिवाद आपल्या भूमिकेकडे नव्यादृष्टीने पहाण्याची निकड जाणवून देईल. या पुस्तकाचा सखोल अभ्यास प्रत्येक विचारवंत तरुणाने करायला हवा....

....... . दैनिक लोकमत -शंकर सारडा

विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 1. --- कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी
विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन
प्रकरण 1. कडेगावची भानामती आणि आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बुवाबाजी
कराडच्या पुर्वेस 20 किमीवर असलेल्या कडेगाव या गावी भानामतीचा विलक्षण प्रकार सुरू झाल्याची बातमी 15 मार्च 1988 च्या दै. पुढारीत प्रसिद्ध झाली.गावातील मराठी शाळेतील इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या मुलींच्या डोळ्यातून खडे आपोआप निघत असल्याचे व नेत्रतज्ज्ञ व इतर अधिकारी व्यक्तिंनी हा प्रकार प्रत्यक्ष जाऊन पाहून खरा असल्याची खात्री करुन घेतल्याचे व त्यांना हा प्रकार मती गुंग करणारा वाटला असल्याचे पुढे बातमीत म्हटले होते. यासंबंधी खरी परिस्थिती समजाऊन घेण्यासाठी मी ( अद्वयानंद गळतगे) 18 एप्रिलला गेलो. संबंधितांच्या मुलाखतीवर आधारित पुढील माहिती मला आढळून आली....

या प्रकरणातील काही शीर्षके

सुरवात कोठे झाली?
मुलींवर दमबाजी

गावकऱ्यांचा आलेला खुलासा - वस्तुस्थिती नेमकी काय?
<दाभोळकरांनी दिलेले खोटे आश्वासनli>

गावकऱ्यांचा मुख्य प्रश्न
विज्ञान प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांचे अवैज्ञानिक संशोधन

समितीची पोकळ कारणे
अंधश्रद्ध कोण? गावकरी की समितीचे लोक?

कडेगावचा प्रकार भानामतीचाच
गावकरी समितीच्या लोकांवर का रागावले?

संपुर्ण प्रकरण इथे वाचा.

गुलमोहर: 

मित्र हो,
जर व्यवस्थापकांची संमती असेल तर किरण्यके यांनी दिलेल्या http://www.misalpav.com/node/20452 या धाग्याला दिलेले उत्तर सादर करू इच्छितो
म्हणजे त्याला उत्तर दिले गेले नव्हते असा समज होणार नाही.

http://www.misalpav.com/node/20452#comment-367565
http://www.misalpav.com/node/20452#comment-368185
http://www.misalpav.com/node/20452#comment-373361

मि हो.
‘जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे’ यावर आधारित एका अन्य धाग्यातून काहींनी आपल्याला आलेल्या अनाकलनीय अनुभवांना सादर केले. त्याची नोंद करायला व्यवस्थापकांची परवानगी द्यावी.
http://www.misalpav.com/node/20719

मित्र हो,
• कसली डोंबलाची भानामतीफिनामती.
• या मोहिमेमुळे जे लोक चांगले काम करताहेत, त्यांच्याबद्दल अपप्रचार करणा-यांना बळ मिळतंय.
• यात अमानवीय किंवा भानामती किंवा जादूटोणा किंवा चमत्कार असे काहीही नाही.
• दगडच का पडले ? फुकट मिळणार्या वस्तु कशा पडतात ?
• कंपनाशिवाय आवाज ऐकू येतो, मग अणुरेणु नसताना खडा, दगड तयार होणे, याला मात्र विरोध का बरे ? ओकसाहेब, तुमचे बरोबर आहे हो...

काही कारणाने आपल्या विविध प्रतिसादांना उत्तर द्यायला सवड मिळाली नव्हती.
वरील काहींच्या मते तसे काही नसते, दगडच का पडतात आदि प्रश्न मला स्वतःला ही पडले होते. लक्षात आले त्याची कॉमनसेन्सने उकल होत नाही किंवा जी दिली जाते ती समाधानकारक वाटत नाही. या पार्श्वभूमीवर गळतगे यांचे लेखन वाचनात आले. जागोंनी कदाचित उपरोधाने का असेना मला बरोबर आहे म्हटले आहे. त्यासाठी त्यांना धन्यवाद. यावर अन्य लोकांचे विचार चुकीचे म्हणण्याऐवजी ते ऐकून त्यावर विचार व्हावा. खऱ्या बुद्धिवाद्यांची ती कसोटी असावी.

मित्रा,
• प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिल्यास मी आपली बिनशर्त माफी मागायला तयार आहे.

आपल्या मागणीतच त्याचे उत्तर लपलेले आहे. समाधान तुमचे होईल किंवा नाही हे आपण ठरवणार आहेत. त्यामुळे ते झालेले नाही, पुढेही होणार नाही असा आपण पवित्रा घेऊन त्यामुळे आता गळतगे यांनी ती मागावी अशी मागणी आपण करणार.
या फोरमवर अशा प्रकरणावर प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनी विविध बाजूंवर प्रकाश टाकला आहे. तो वाचून आपल्यासारख्यांच्या प्रतिक्रिया या साच्याच्या असणार हे स्वाभाविक आहे. लेखन स्वातंत्र्याचा मान राखून ते पुर्व प्रसिद्ध विचार मांडण्याचे काम करत आहे. त्यात आपण माफी मागावी किंवा गळतग्यांना मागायला लावावी अशी शर्त नसावी.

मित्रा,
• परामानस शास्राला मान्यता मिळवून देण्यासाठी ज्या लोकांनी प्रचंड मेहनत घेऊन काही टेस्टस बनवलेल्या आहेत त्यांनीही स्वतःला ज्ञानतपस्वी म्हणवून घेतल्याचे ऐकिवात नाही. त्यांची मेहनत पहाच एकदा. तरीदेखील त्यांना हे विज्ञान आहे हे सिद्ध करता आलेले नाही
प्राचार्य अद्वयानंद गळतगे एक परामानसशास्त्राचे अभ्यासक आहेत. जगभरातील अनेक परामानसतज्ज्ञांचे प्रयत्न त्यांचा उद्देश व धडपड कसेही करून परामानसशास्त्राला विज्ञानाची मान्यता वा दर्जा इतरांनी द्यावा असा असायची गरज नाही. कारण त्यामुळे त्यांच्या शोधकार्याला बाधा येत नाही.

प्रकरण 1 वरील धाग्यांना उत्तर
हे प्रा. गळतगी कोण आहेत, त्यांना ज्ञानतपस्वी ही पदवी कुणी आणि कशाबद्दल दिली, ही पदवी मिळण्याचे निकष काय आहेत आणि देणा-यांचे ज्ञानक्षेत्रातील योगदान काय आहे हे जाणून घेण्याची विशेष उत्सुकता आहे. शक्य असल्यास माहिती देण्यात यावी.
मित्रा किरण्यके,
ते गळतगी नसून त्यांचे आडनाव गळतगे आहे. याची नोंद घ्यावी.
त्यांची ओळख आणि हे पुस्तक लिहिण्यामागील भूमिका काय ते वेगळे सादर करत आहे. ‘ज्ञान तपस्वी‘ ही पदवी नसून ती त्यांच्या लेखनकार्याचा गौरव करणारे दिलेले विशेषण आहे.

याला डायरिया ऑफ थॉट्स म्हणतात.. म्हणजे दर दोन चार मिनिटाला एक थॉट ( अणि एक पोस्ट) मेंदूतून बाहेर पडतो.... Proud

मित्रा,
भानामती पण फारच चावट असते. शिक्षणाचा प्रसार झाला कि ती ते गावच सोडते. बघा ना, पुण्यात कधी अशी घटना ऐकिवात नाही.

पुण्यात एक भानामतीची घटना 2005च्या सुमारास झाली त्यावर अंनिच्या दोन्ही संघटनांनी त्यावर काम केले आणि आपापले निष्कर्ष सांगितले. त्यातून एका घटनेवर त्या दोन्ही संस्थानी कसा प्रकाश टाकला ते पहाणे रंजक आहे. ‘लढा अंधश्रद्धा निर्मुलनाचा’ या द्वैमासिकाच्या 30 मे ते 29 जुलै 2005 वर्ष-पहिले, अंक-पहिला च्या ‘ जिज्ञासा मधे ‘प्रश्न तुमचे उत्तर - श्याम मानवांचे’ या सदरात पान 42 वर ‘डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी पिवळ्या फॉस्फरसने या आगी लागत असाव्यात असे का सांगितले?
यावरील त्यांचे उत्तर मार्मिक आहे. प्रा. शाम मानव म्हणतात, ‘घरात सहज उपलब्ध असणाऱ्या सोर्सेसचा वापर केला जातो. म्हणूनच फॉस्फरसने आगी लागत असाव्यात हे दाभोळकरांचं मत लोकसत्तेत प्रसिद्ध झालं; त्याच दिवशी पुन्हा देशमुखांच्या घरी आगी लागायचे प्रकार घडले. हे प्रकार करणारी व्यक्ती अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांच्या (दाभोळकरही हे काम करतात ना? – कंस मानवांचा) अगाध ज्ञानाबद्दल हसली असेल. आपल्याला कुणीही पकडू शकत नाही हा तिचा आत्मविश्वास वाढला असेल, म्हणून हे प्रकरण थांबवणं पुढे आम्हाला आधिक जड गेलं. तीच हे प्रकार करते आहे हे आम्ही ओळखलं आहे. हे तिला पटवून देणं कठीण गेलं’.

धन्यवाद ओकसर

तुम्ही ब-याच लिंक्स दिल्यात. सावकाश पाहतो.
शेवटचा परिच्छेद दिलाय त्याबद्दल
परामानसशास्राचा आधार घेऊन गळतगे जे काही म्हणू इच्छितात आणि त्या ब्लॉगवर विज्ञानाचा मक्ता आपल्याकडेच आहे वगैरे जी काही विधानं केली गेलेली आहेत ते पाहता या अंधश्रद्धांना विरोध करणे म्हणजे वैज्ञानिक अंधश्रद्धा होय असाच काहीसा मेसेज गळतगे यांच्या मोहीमेतून जातो. म्हणूनच परामानसशास्त्राला कुणी मान्यता मिळवून दिली, आज हे शास्त्र आहे ते कुणामुळे, या शास्त्राच्या मर्यादा काय हे सगळं व्यवस्थित देणं गरजेचं आहे.

परामानसशास्त्रालाच मर्यादा असल्याने त्याचा अभ्यासक असलेल्या कुणीही काय सिद्ध केलं याकडे कसं पहायचं हे ज्याला त्याला ठरवता येऊ शकेल.

या संपूर्‍न मोहीमेत गळतगे ज्या ज्या लोकांना भेटले ते सर्व नाराज लोक होते. आपण घरातल्या मुलींना
घरकाम सांगतो ( अगदी सामान्य बाब आहे ही ) हे एका वर्तमानपत्रात आल्याने आपली बेअब्रू झाली या समजाने ते नाराज झालेले. या संदर्भात ऑर्कूटवर त्याच भागातले एक कार्यकर्ते होते श्री अवधूत खरमाळे. त्यांनी काहीच वर्षापूर्वी या प्रकारावर प्रकाशझोत टाकला होता. त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित झाल्यास त्यांना इथे लिहायचं आमंत्रण देता येईल.

धन्यवाद !

भानामती पण फारच चावट असते. शिक्षणाचा प्रसार झाला कि ती ते गावच सोडते. बघा ना, पुण्यात कधी अशी घटना ऐकिवात नाही.

मला खात्री होती याचा शब्दशः अर्थ काढला जाईल.

इंग्लंडमध्ये घर विकताना घरात असलेल्या भुतांची माहिती विक्रीदाराने खरेदीदारास द्यावी अश्या मताचा एक प्राध्यापक लंडनमध्ये आहे. इंग्लंडमधील भुताटकीने झपाटलेल्या घरांवर एक लेख इथे आहे.

तात्पर्य : भुताटकी जगात सर्वत्र आहे.

-गा.पै.

२०११-१२ मधे कुठे कुठे भानामतीचे प्रकार दिसलेत ते पण लिहा.>>>

नंदिनी, आगावा...., ११-१२ त नाही पण दोन वर्षापुर्वी माझ्याबाबतीत पण एक असा प्रकार माबोवर झाला होता. उमेश कोठीकरांच्या कुठल्यातरी एका कवितेवर मी दिलेला प्रतिसाद (एकच प्रतिसाद) किमान ७००+ वेळा प्रकाशित झाला होता. तेव्हा मीही भानामती समजुन घाबरलो होतो. पण नंतर तो मी वापरत असलेल्या प्रॉक्सी सर्वरमधून आलेल्या एका क्षुद्र बुद्धीवादी 'किड्या'चा (बग) प्रताप असल्याचे लक्षात आले. Proud

२००८ मधे भारताने यशस्वी चांद्रयान-१ मोहिम राबवली, दुसर्‍याची जोरांत तयारी सुरु आहे, पुढे मंगळावर जाण्याच्या कल्पना साकारत आहेत. छान गोष्ट आहेत....

आणि येथे... Sad २०१२ मधे भानामती या प्रकाराचे समर्थन होते हा चिंतेचा विषय आहे.

उमेश कोठीकरांच्या कुठल्यातरी एका कवितेवर मी दिलेला प्रतिसाद (एकच प्रतिसाद) किमान ७००+ वेळा प्रकाशित झाला होता
----- त्या उमेशाचे आपल्या एकाच कवितेला ७००+ प्रतिसाद मिळाले आहेत हे बघितल्यावर काय झाले असेल?

उदय, भानामती जरा टोकाची गोष्ट आहे. म्हणुन ती खरी नाही असे अनेकांना पटू शकते व पटते. पण तितक्या टोकाच्या नसलेल्या पण तितक्याच अंध अशा अनेक गोष्टी जरा जास्तच लोकांना (इंजिनीयर, डॉक्टरसकट) पटतात ही तितक्याच (किंवा जास्तच) खेदाची गोष्ट आहे.

कंपनाशिवाय आवाज ऐकू येतो, मग अणुरेणु नसताना खडा, दगड तयार होणे, याला मात्र विरोध का बरे >>>>

कंपनाशिवाय जो आवाज तयार होतो त्या आवाजाने अणुरेणु नसताना तयार झालेले खडे, दगड तुटतात. मग त्याच आवाजाची गिरणी तयार होते, त्या गिरणीत खडे, दगड यांच्या तुकड्यांचे भस्म होतात. मग त्यांची वाफ होते , अंगातल्या उष्णतेने त्या वाफेचे पाणी होते आणी तेच अश्रु म्हणुन डोळ्यातुन बाहेर येते असे भौतिकशास्त्र आहे जामोप्या! Proud

हा धागा जामोप्यांना दिसू नये अशी मी देवाजवळ प्रार्थना करत होतो पण ती त्याने ऐकली नाही.

असला धागा मलाच काय कुणालाच दिसू नये.

>>आयीस यु अयीस यु दगडू धोंडू
>>व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी
आयसीयू मधे भरती झाल्यासारखे वाटत आहे वरचे सगळे प्रतिसाद वाचून Sad

Pages