उघड उघड बये

Submitted by कल्पी on 8 February, 2012 - 13:04

उघड उघड बये
आता तरी उघड
माजघराचे दार ..थोडे थोडे उघड

आकाशाच्या कह्यात
सूप टोपले पाखड
चांदण्याच्या नजरेत हळू हळू येशील
नजरेतलं चादणं वळून वळू्न घेशील

अंगणातली तूळशी्पाशी
गूज थोड उकल ,मातीच्या चुलीजवळ
जसा जन्म सफ़ल
जरा जरा धकल,तुकडा पाणी खपल

उघड उघड बये
आता तरी उघड
माजघराचे दार ..थोडे थोडे उघड

कासवाच्या गतीनं रस्ता तूझा दिसल
टाचा ऊंच करुन ,मन कर अचल
एक एक धागा आता तू उकल

शब्दांच्या विहिरीत ,जीव नाही जायचा
एक एक जाणिवाचा तळ मात्र गाठायचा
चक्र तर रोजचेच चुल आणि मुल
तू नको विसरु गं तूझे उगम कूळ

्बर, आता जूळवून घे चैत्यन्याशी सूत
ओलावल्या ओठांसाठी चोळी भरुन अमृत

कल्पी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

शब्दांच्या विहिरीत ,जीव नाही जायचा
एक एक जाणिवाचा तळ मात्र गाठायचा
चक्र तर रोजचेच चुल आणि मुल
तू नको विसरु गं तूझे उगम कूळ>>>हे आवडल कल्पी.

खास वाटली नाही. एका भागाचा दुसर्‍याशी संबंध जुळत नाही. अंगणातील तुळशीपासून थेट माजघरात विनाकारण पोचते.