'लिंगनिरपेक्ष मैत्री-ओळख' परिसंवाद विशेषांक - घोषणा २

Submitted by संयोजक_संयुक्ता on 8 February, 2012 - 11:56

'लिंगनिरपेक्ष मैत्री-ओ़ळख(आयडेन्टिटी)-' परिसंवाद विशेषांक

मंडळी, ह्या विषयावर काय लिहायचं ह्या बाबतीत तुमच्या मनात थोडा संभ्रम आहे असं आम्हाला वाटतंय म्हणून हा नवीन घोषणाप्रपंच. 'लिंगनिरपेक्ष ओळख-मैत्री' अर्थात Genderless Identity-Friendship असा हा विषय. 'लिंगनिरपेक्ष' ह्या शब्दाची तुमच्यापुरती असणारी व्याख्या काय ? आपलं स्त्री किंवा पुरुष असणं ही जन्मापासून असणारी अटळ ओळख आणि ह्या ओळखीवर झालेली कामाची विभागणी ( gender roles ) आपण बघतच असतो. असे असताना समाजात वावरताना हा महत्वाचा तपशील कधीकधी बिनमहत्वाचा होऊ शकतो का ? आपण स्त्री / पुरुष आहोत हे विसरुन केवळ एक मनुष्यप्राणी म्हणून वावरता येते का ? जर येत असेल तर असे कुठले प्रसंग तुम्हाला आठवतात ? आणि जर आपण स्त्री आहोत की पुरुष हे पुसताच येत नसेल तर का येत नसावे असे तुम्हाला वाटते ? व्यावसायिक जगात स्री/पुरुष याच्यापलीकडे जाऊन केवळ एक व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीची केवळ ज्ञान, गुणवत्ता यावर आधारित ओळख शक्य असते का? हे झालं स्व-ओळख - identity बद्दल.

एखादा माणूस स्वतःकडे कसा बघतो ( self-identity ) हा मुद्दा तो समोरच्याशी कसा संवाद साधेल ह्यावरही प्रभाव पाडतो.लिंगनिरपेक्ष मैत्री ही दोन मनुष्यप्राण्यांमधे असते. ती दोन माणसे स्त्रिया आहेत वा पुरूष वा स्त्री-पुरूष हा मुद्दाच जिथे बिनमहत्वाचा आहे अशी मैत्री ही लिंगनिरपेक्ष मैत्री. अशी मैत्री असू शकते का? अशी मैत्री होण्यास तुमची सामाजिक, वैचारिक बैठक महत्वाची भूमिका निभावते का ? की मैत्रीमध्ये लैंगिकता आड येऊ शकते ? तुम्हाला याबद्दल काय वाटते ?
एकदा लिंगाधारित ओळखीच्या पलीकडे जायचे असे ठरवले तर मग स्त्रीवाद ह्या शब्दालाच काय अर्थ उरतो ? स्त्रीवादाची खरंच गरज आहे का ? लिंगनिरपेक्षता आणि स्त्रीवाद हे परस्परविरोधी आहेत की लिंगनिरपेक्षतेपर्यंत पोचण्याचा तो एक टप्पा आहे ?

ह्या अनेक प्रश्नांची उकल करायचा प्रयत्न म्हणजेच हा परिसंवाद. हे प्रश्न दिले ते केवळ विचारप्रक्रियेला चालना द्यायला. त्यातल्या एखाद्याच मुद्द्याला धरुन तुम्हाला लिहावेसे वाटेल किंवा तुमचे लिखाण ह्यातल्या अनेक पैलूंना स्पर्श करेल. कदाचित ह्यात न आलेला सर्वस्वी वेगळाच मुद्दा तुम्ही मांडू पाहाल. थोडक्यात 'लिंगनिरपेक्ष ओळख / मैत्री ' खरंच अस्तिवात असू शकते / नसते / कधीकधीच असते ह्याविषयीचं तुमचं मत आम्हाला हवं आहे. तुमचं मत होकारार्थी / नकारार्थी काहीही असलं तरी त्याचं स्वागत आहे फक्त जे लिहाल ते विचारपूर्वक लिहिलेले असावे एवढीच अपेक्षा आहे.

हे मुद्दे लेखाच्या स्वरुपात लिहिणे अपेक्षित आहे. प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात नव्हे.

तुम्हाला रोजच्या व्यापातून वेळ काढणे कठीण जात असेल हे लक्षात घेऊन लेख पाठवण्यासाठी मुदतवाढ करीत आहोत. लेख पाठवण्याची अंतिम तारीख आता २० फेब्रुवारी अशी आहे.

शब्दमर्यादा १०००.
तुमचे लिखाण आम्हाला ह्या लिंकवर पाठवा.

अजून एक विशेष सूचना. ही स्पर्धा नाही. हा केवळ परिसंवाद आहे. Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख नाही लिहित आहे , नीधप ह्यांना त्रास होइल ह्या विचाराने.
कारण त्या मनाच्या डॉक्टर आहेत हे आजच कळले; त्यांन दुसर्‍याचे दुखणे कळते पण स्वतःचे नाही ही वेगळी गोष्ट आहे. असो. मुद्द्याकडे वळूया,

तर मुद्दा हा आहे की हा विषय वाचून काय वाटले?

त्याआधी संयुक्ताचे उदाहरण व उल्लेख का केला गेला? हा खुलासा.
प्रथम म्हणजे तो ग्रूप का काढला, कशाला हवा, कोणाला प्रवेशा द्यावा ही चर्चा व प्रश्ण कोणाला नक्कीच पडले न्हवते व विचारलेही न्हवते हेच दिसते. ते तसे विचारणे वा वाटणं हे वाचणर्‍याची समज असु शकेल.
संयुक्ता ग्रूपला रीप्रेसेंट करणार्‍यानी असल्या चर्चा करु नये? ते चुकीचे आहे " असे तर इथे कोणी म्हटले नाही पण आता काहींनी(? Wink ) तसा अर्थ स्वतःहून काढून लिहिले तर तो त्यांचा बु. दो. आहे हे आम्ही समजतो. व त्याला समजावून सांगण्यात अर्थ नाही.

हे संयुक्ताचे उदाहरण फक्त आणि फक्त हे एक प्रातिनिधिक म्हणून घेतले. का तर, माणूस आपले लिंग कसे विसरु शकत नाहीत. कितीही काही झाले तर एक लिमिट असतेच.( ते का व कसे हा चर्चेचा विषय आहे पण आता लेख लिहायची इच्छा नाही) व ते(लिंगनिरपेक्ष वागणे) मर्यादित असल्यानेच संयुक्ता सारखे ग्रूप असतात/गरज भासते हे फक्त सांगण्यासाठी उल्लेख केला गेला.
एका अर्थाने सांगायचे तर, लिंगनिरपेक्ष जगणे असु शकते पण एका मर्यादेपुरतेच व ते कसे तर,
हे पहा इथीलच एक उदाहरण; बस इतकेच आणी इतकेच उदाहरणापुरता त्याचा उल्लेख करायचा होता. आणि एक विरोधाभास असा की, ही चर्चा करण्याचे आवाहन करणारा हाच ग्रूप होता. ते साहजिकच विरोधाभासीक वाटले म्हणून उल्लेख केला. विरोधाभासिक वाटते कारण शेवटी अश्या चर्चेचा नक्की हेतु काय? कुठल्याही उपक्रमाला हेतु हा असतोच, एक गंमत म्हणा, एक शिक्षण म्हणून, एक वैचारीक प्रसार अश्या दृष्टीने मायबोलीचे उपक्रम आजवर समोर आलेत.
मग ह्या चर्चा करून पुढे काय? कारण ह्या चर्चेच उत्तर इथेच दडलेय की लिंगनिरपेक्ष मानणे कसे मर्यादित असते जेव्हा ह्या प्लॅटफॉर्मवरच लिंगभेद चालतो(त्यात चांगले का वाईट हा प्रश्ण नाही ). मग आणखी काय हेतु असेल बरं? ह्या अर्थाने एक निव्वळ प्रश्ण उपस्थित केला. पण बहुधा नीधप संयोजकांना ह्यांना त्रास झालाय दिसते. असो.

बाकी, अर्थातच जाहीराती सुद्धा विषयाला अजिबात पुरक न्हवत्या.

माणसाने लिंगनिरपेक्ष जगायलाच पाहिजे, तसेच हवे, तसेच असते अथवा तसेच करावे असे काही अर्थ वाटतोय ह्या प्रतिसांदाचा असे कुणी म्हणत असेल तर तोच जाणे का ते. हे कोणी म्हटले असे तरी वाटले नाही.

हा खुलासा फक्त इतरांसाठी आहे, त्रासलेल्यांनी "वाचून" त्रास वाढवू नका. त्यांचे त्रास वाढवून आम्हाला काय मजा व कशाला द्या त्यांना सजा. इती चार-पाच शब्द ह्या विषयावर लिहून संपूर्ण.
आता इतरांना नको का लिहायला व दात विचकायला संधी द्यायला.. काय? किती वेळ रिकामे बसणार... Wink

रायबा,
>>>संभ्रमात पडल्याशिवाय विषयाचा शोध कसा चालू होईल. >>> वा, अपयश लपवावं तर असं.<<<<
एक विषय सुचतो त्यावर सर्व बाजूने चर्चा व्हावी असे काहींना वाटते आणि ते लोक मिळून चर्चा घडवण्यासाठी एका उपक्रमाचे संयोजन करतात यामधे अपयश, हार जीत इत्यादी मुद्द्यांचा संबंध कुठे आला? उपक्रम अजून संपलेला नाही. हा परिसंवाद आहे. उपक्रमासाठी केवळ लिखाण मागवले आहे. ते सगळे एकत्र प्रकाशित करायचे आहे.
तसेच संयोजक या विषयाचे तज्ञ आहेत अशी भूमिका कधीही नव्हती आणि नसेल. हा विषय तसा अवघड आहे पण म्हणूनच त्याचा शोध घ्यायचाय याची संयोजकांना पूर्ण कल्पना आहे.

>>>मलाही या विषयाचा अर्थ आणि अवाका कळलाय पण कदाचित हा परिसंवाद संयुक्ता अंतर्गत न होता संपूर्ण मायबोली अंतर्गत व्हायला हवा होता.<<<<
अर्थ आणि आवाका कळल्याबद्दल अभिनंदन. पहिल्या घोषणेपासून या उपक्रमात सर्व मायबोलीकरांचा सहभाग अपेक्षित आहे हे स्पष्ट करण्यात आले होते. त्याप्रमाणे संयुक्ता सभासद नसलेलेही मायबोलीकर या उपक्रमाच्या संयोजनात आहेत हे तुम्ही यादीत वाचले असेलच.

>>>>स्त्री सदस्यत्वाची विश्वासाहर्ता पडताळून संयुक्ताचं सभासद करून घेतलं जातं पण इथे किती तरी असे सभासद आहे कि जे नात्याने नवरा-बायको आहेत तेव्हा त्या स्त्रीच्या पतीच्या विश्वासअहर्तेबद्दल काय? ती कुठे पडताळून पाहिली जाते? आणि संयुक्ता सभासद तिथली चर्चा आपल्या नवर्‍याशी शेअर करत नाही हे कशावरून? आणि ती शेअर केली तरी हरकत नाही पण त्या नवर्‍याने त्याबद्दल बाहेर कुठेही चर्चा केली नसेल हे हि कशावरून ? <<<
हे सर्व प्रश्न इथे उपस्थित करून आपण नक्की काय साधता आहात? विश्वासार्हतेच्या मुद्द्यावर संयुक्ता सभासद मैत्रिणींच्या मनात संदेह असेल तर त्या ते योग्य ठिकाणी बोलून दाखवतीलच.

>>>जाहिर प्रकटन करून लोकांना तो विषय काय आहे याची ओळख करून दिली जाते पण मुळात त्या सभागृहात काय आणि कोणत्या मुद्यांवर चर्चा होते यावर पडदा टाकला जातो. त्यामुळे इथे सहजासहजी शंका घ्यायला वाव आहे. <<<<
नक्की कसली शंका येतेय तुम्हाला?

रायबा अन झंपी तुम्हाला विषय कळला नसेल तर तसे सांगा की. प्रॉब्लेम काय आहे? संयुक्ताचे उदाहरण देण्याचे प्रयोजनच कळले नाही! घोषणा वाचली का नीट? का फक्त लिंगनिरपेक्ष आणि संयुक्ता हे दोनच शब्द वाचून पोस्टी टाकत सुटलायत ?!
घोषणेत असे म्हटलेय का की "सर्वांनी लिंगनिरपेक्ष असलेच पाहिजे" किंवा लिंगनिरपेक्षतेचा पूर्णपणे पुरस्कार करणार्यांसाठीच हा उपक्रम आहे?
"थोडक्यात 'लिंगनिरपेक्ष ओळख / मैत्री ' खरंच अस्तिवात असू शकते / नसते / कधीकधीच असते ह्याविषयीचं तुमचं मत आम्हाला हवं आहे. तुमचं मत होकारार्थी / नकारार्थी काहीही असलं तरी त्याचं स्वागत आहे "
यात हे स्पष्ट आहे की लिंगनिरपेक्ष अस्तित्व / ओळख कोण कुठवर जपते जपू शकते यावर विचारमंथन (सर्व बाजूने, लिहू इच्छिणार्‍या कोणत्याही माबोकराच्या दृष्टिकोनातून ) अपेक्षित आहे मग संयुक्ताने आयोजन करन्यात विरोधाभासाचा प्रश्न आला कुठे?

पुढचा प्रश्न यात प्रयोजन काय ? विचारमंथन , आपले विचार आपण पडताळून बघणे, इतरांचे ऐकणे हे पुरेसे प्रयोजन नाही का?

  • तस्मात संयुक्ताने आयोजन करण्यात विरोधाभास आहे हा मुद्दा पूर्णपणे गैरलागू
  • हा उपक्रम संयुक्ताअंतर्गत ऐवजी पूर्ण मायबोलीवर व्हायला हवा होता या मुद्द्याला काही अर्थच नाही (त्या वाक्यावरून असे मानायला वाव आहे की घोषणा न वाचता पोस्टी धोपटून फुका लक्ष वेधून घेण्याचा हा निगेटिव्ह पब्लिसिटीचा हा प्रयत्न असू शकतो)
  • आणि "मी खरे तर प्रामाणिक पणे लेख लिहायचे ठरवले होते पण आता संयोजकांबद्दलच संशय असल्याने नाहीच्च लिहित जा" हे वाक्यही असाच क्लासिक प्रकार! एखाद्या कार्यक्रमात हुल्लडबाजी करायला काय लागते? स्टेजवर गाणार्‍याला अंडी फेकून मारायला कसले कौशल्य अथवा हिंमत नाही लागत . स्टेज वर स्वत; जाऊन २ वाक्ये बोलायला हिंमत लागते! तसेच इथे आहे उगीच निरर्थक वादाच्या पोस्टी ताकायला काय लागतेय? पण आपलेच विचार तपासून लेख सादर करणे याला खरोखर प्रामाणिक हेतू लागतो.

असो. पुढे सरकू या आता. Happy

मैत्रेयी +३
झंपीने लिहिल्यायेत त्या प्रकारच्या निरर्थक /विषयाला धरून नसलेल्या/ मुद्दाम वाद घालायला लिहिलेल्या रटाळ पोस्ट्स मॉडरेटर्स डिलिट करु शकले असते तर बरं वाटलं असतं.

वा छान. एखाद्या विषयावर दुसर्‍याची मतं विरोधी वाटले की किंवा प्रश्ण असले की हुल्लडबाजी असे नाव द्यायचे.

मैत्रीयी, तुम्ही तरी दुसर्‍याची पोस्टस नीट वाचत जा ना...
बाकी इतरांचे चालू द्या.

>>>>स्टेज वर स्वत; जाऊन २ वाक्ये बोलायला हिंमत लागते! तसेच इथे आहे उगीच निरर्थक वादाच्या पोस्टी ताकायला काय लागतेय? पण आपलेच विचार तपासून लेख सादर करणे याला खरोखर प्रामाणिक हेतू लागत>>>><<

:हिहि:

तुम्ही कुठली हिंमत दाखवत आहात? तुमचा हेतु काय?

मैत्रेयी, वेल सेड!!

तुम्ही कुठली हिंमत दाखवत आहात? तुमचा हेतु काय? >> तिचा हेतु फक्त तुमचा गैरसमज / शंका-कुशंका दुर करायचा होता..

Pages