माझा यावेळचा भारत दौरा आणि पुढचा न्यू झीलंडचा दौरा खुपच अविस्मरणीय झाला. पहिले कारण
म्हणजे तीन तीन गटग झाली,शिवाय यावेळी न्यू झीलंड मधे जास्त दिवस मुक्काम करता आला आणि लेकीसोबत मनसोक्त भटकता आले.
गेलो त्या दिवशीच, घरी बॅग ठेवली आणि लगेच ठाण्याला जिप्स्याचे प्रचि प्रदर्शन बघायला गेलो. त्याबद्दल त्याने लिहिलेच होते. मामी, मोनालि, इंद्रा पासून थेट पंत, सेनापती असे सगळे भेटले. आणि
माझा जूना मायबोलीकर मित्र, बाँबे व्हायकिंग सहकुटुंब आला होता. निव्वळ त्या गटगची बातमी वाचून तो आला होता. खुप छान वाटले सगळ्यांना भेटून. तिथेच निसर्ग उद्यानातल्या गटगची चर्चा झाली होती.
मग मी व्हीसाच्या मागे लागलो. माझे एमिरेटस चे बुकिंग होते आणि ते विमान फक्त मेलबर्न ला थांबणार होते. आणि तेच विमान पुढे ऑकलंड ला जाणार होते. निव्वळ या टेक्नीकल हॉल्ट साठी मल
ऑस्ट्रेलिया चा व्हीसा लागणार होता. ती सगळी कागदपत्रे थॉमस कुक कडे देऊन मी पूण्याला रवाना झालो.
पुण्याचे गटग पण अविस्मरणीयच झाले. दक्षिणावर सगळ्यांना आमंत्रण द्यायची जबाबदारी टाकली होती. ती तिने व्यवस्थित पार पडलीच, पण माझा आद्य मित्र गिरीराज ने पण आयत्यावेळी फोन करुन
अनेक जून्या मित्रांची भेट घडवली.
मायबोलीवर सर्वात पहिल्यांदा ओळख झालेली सई, जी एस, आरती, कूल, स_सा, अशा पहिल्या पिढीतल्या मायबोलीकरांपासून कूल, बेफी, आशू, मंजो असे सगळेच भेटले. मायबोलीकर मैतर आणि ऋचा यांच्यांशी पण बोलणे झाले. चंपक आणि चंपी पण फोनवर बोलले. शशांक शांकली शेवटपर्यंत माझ्यासोबत होते.
मग माझा आजोळचा दौरा सुरु झाला, मलकापूर, देवरुख, रत्नागिरी, मार्लेश्वर आणि संगमेश्वर असा प्रवास केवळ २ दिवसात आटपला. मार्लेश्वराची जत्रा असूनदेखील माझ्या मामाच्या ओळखीने दर्शनही झाले. त्याच्याच आग्रहावरुन मी संगमेश्वरच्या एका पुरातन देवळात गेलो.
आपल्या संभाजी महाराजांना, इथेच औरंगजेबाने अटक केली होती. देवळात, सहसा आपल्याकडे न दिसणारे कोरीव कम दिसते. मुघलांनी अनेक मूर्ती विद्रुप केल्या आहेत, तरीही तो परीसर अत्यंत रम्य आहे.
या देवळाबद्दल मी इथे वाचल्याचे आठवत नाही, त्या बाजूला गेल्यावर अवश्य भेट द्या या देवळाला. (संगमेश्वरच्या कसबा भागात अगदी आतमधे आहे हे.)
मला न्यू झीलंडचा व्हीसा मिळायला तसा वेळच लागला आणि ऑस्ट्रेलियाचा व्हीसा मिळवण्याएवढा वेळ नव्हता माझ्याकडे. मग थॉमस कूकच्या पायल देसाई, यांनी मला कॅथे पॅसिफिक वर एक सीट मिळवून दिली. त्याबाबत्त मी सुदैवी ठरलो, नाहीतर लेकीला भेटणे मला शक्य झाले नसते.
मग आमचे धारावीचे गटग झाले. प्रमोदकाका, नरेंद असे (मला) सिनीयर लोक तर भेटलेच पण नीधप, मामी, साधना, रीमा, ज्ञानेश पण भेटले. उजू थेट अंबरनाथहून आणि नितीन विरारहून आले होते. जागूची मात्र भेट नाही होऊ शकली.
ते आटपून मी रात्रीचे कॅथे पकडले. कॅथेची सेवा आणि जेवणही मस्त असते (म्हैसूर मसाला डोसा, सांबार, चटणी सकट होता.. ) सकाळी हाँग काँगला पोहोचलो. तिथे आयत्यावेळी व्हीसा मिळत असल्याने, तो घेऊन मी बाहेर पडलो (आणि अशा रितीने माझे पाय १९ व्या देशाला लागले.)
रेल्वेने हाँग काँग शहरात गेलो. हवामान फारच थंड होते, भ्रुरुभुरु पाऊसपण होता.
मग दुपारचे कॅथेचेच ऑकलंडचे विमान पकडले. तोही प्रवास दिवसाचाच होता, ढग नसल्याने पापुआ न्यू गिनीचा गूढरम्य प्रदेश विमानातून छान दिसला. पूर्वेकडे जाताना, रात्र तोकडी होते, ती पार पाडून ११ तासांच्या प्रवासानंतर ऑकलंड ला पोहोचलो.
ही माझी ऑकलंडला चौथी भेट असल्याने विमानतळावर येऊ नकोस असे मैत्रिणीला आधीच सांगितले होते. तिथून शटल करुन (हा टॅक्सीला उत्तम पर्याय आहे तिथे, आपल्यासोबत एखाद दुसरा प्रवासी असतो, पण टॅक्सीपेक्षा निम्मे पैसे पडतात.)
दुसर्या दिवसापासून लेकीसोबत भटकंती सुरु झाली. आधी इडन गार्डन या बागेला भेट दिली. एका बंद पडलेल्या दगडाच्या खाणीत ही बाग वसवलीय. पण यावर विश्वास बसू नये इतकी उत्तम राखलीय ती.
त्या त्या ऋतूप्रमाणे इथे फुले फुलतात. मला ट्यूलिप्स बघायची होती, पण त्यासाठी सप्टेंबर मधे तिथे जायला हवे. खुपच सुंदर बाग आहे ही. इथल्या डोंगरावर चढून, शहारचे सुंदर दर्शन घेता येते.
यावेळी रोटोरुआ या गावी जायचे होते (पुढे लिहितोच.) आम्ही सगळी मित्रमंडळी तिथे निघालो. सोबत ४ मूले (वय वर्षे ११ ते १५ ) त्यामुळे प्रवासत नुसती धमाल चालली होती. ऑकलंड सोडताना एक बाँबे नावाचे गाव लागते, तसेच रामारामा नावाचे पण गाव लागते. केंब्रिज नावाच्या गावात, चहापाण्यासाठी थांबलो.
आम्हाला रोटोरुआ गावात मुक्काम करणे भाग होते. या गावाचे नाव घेतले की जिओ थर्मल असेच शब्द आठवतात, पण तो भाग य गावापासून २८ किमीवर आहे. प्रत्यक्ष रोटोरुआ च्या जवळ काही गार्डन्स आहेत.
तसे ते गावही सुंदर आहेत. गावात अनेक मॉटेल्स आहेत, आणि खाण्यापिण्याच्या उत्तम सोयी आहेत.
तर त्या जिओ थर्मल म्हणजे भूगर्भातील हालचाली जाणवणार्या भागलाही आम्ही भेट दिली. तिथला हा लेडी नॉक्स गिझर. हा रोज सकाळी सव्वा दहाला गरम पाण्याचा फवारा सोडतो.
आणि तिथले मुख्य आकर्षण असणारा हा शँपेन् पूल
रोटोरुआ गावाजवळच एक मोठे सरोवर आहे. तिथल्या एका डोंगरावरुन त्याचे असे विहंगम दर्शन होते.
ऑकलंडचे प्राणीसंग्रहालय देखील प्रेक्षणीय आहे. प्राणी तर सुदृढ आहेतच आणि त्यांची तसेच प्रेक्षकांची सोय पण उत्तम आहे.
बीच म्हंटले की माझ्या मनात एक ठराविक दृष्य येते. पांढरी वाळू, निळा समुद्र आणि गरम हवा. त्यामूळे मित्रांनी बीच वर जायचे सूचवले त्यावेळी मी जरा नाखुषच होतो. पण वेस्ट ऑकलंडच्या बीचची ही भेट, माझ्या मनातले सर्व किल्मीष दूर करुन गेली. मी आजवर कधीही प्रत्यक्ष न बघितलेले एक दृष्य तिथे जवळून बघता आले. ( या फोटो वरून अंदाज करु शकाल ! )
शेवट्च्या दिवशी, लेकीला शाळेत सोडून मी ऑकलंड दर्शन ची टूर घेतली. त्यातल्या काही जागा मी बघितल्या होत्या पण म्यूझियम बघितले नव्हते. उत्तम व्यवस्था असलेले हे वस्तुसंग्रहालय बघण्यासारखे आहेच. तिथल्या कलाकुसरीच्या वस्तू आपल्याला तितक्याश्या आकर्षक वाटणार नाहीत पण तिथला ज्वालामुखी जागृत होण्याचा अनुभव घेण्यासरखा आहे. स्कार्स ऑफ द हार्ट असे समर्पक नाव असणारा, वॉर म्यूझियमचा विभाग मात्र, मन हेलावल्याशिवाय रहात नाही.
म्यूझियममधे अपूर्या प्रकाशामूळे फोटो नीट घेता येत नव्हते. त्यामूळे मी तिथे जास वेळ न घेता, तिथे बाजूलाच असणार्या विंटर गार्डन मधे गेलो, ती वास्तू मला कधीची खुणावत होती.
आणि व्हायचे तेच झाले, मी त्या ठिकाणी इतका गुंतलो की शेवटच्या बसची वेळ कधी झाली ते कळलेच नाही. (का गुंतलो असेन बरं ?)
मग ती रात्र मी ऑकलंड एअरओर्ट वरच काढायचे ठरवले (लेकीकडे जायला वेळ लागला असता.) इतर कुठल्याही विमानतळावर न बघितलेली एक सोय तिथे बघितली. प्रत्यक्ष विमान बोर्ड होत असताना, बघण्याची सोय तिथे केलेली आहे, पाहुण्यांना सोडायला आलेल्या मंडळींना तिथे बसून सर्व बघता येते. तिथेच मी झोप काढली. शॉवरची पण सुविधा आहे. ते सगळे आटपून बोर्ड बघितला तर माझे विमान लेट झाल्याचे दिसत होते. माझा हाँग काँगचा हॉल्ट फक्त १ तासाचा होता, त्यामूळे मला चान्स घ्यायचा नव्हता आधीच्या विमानात सुदैवाने एक सीट होती, तिथल्या स्टाफच्या सहकार्याने ती मिळवली, हाँग काँगला मस्त टाईमपास झाला (मायबोलीवर !!) अगदी शेवटी कळले की ते विमान बँग्कॉक ला उतरणार आहे. तिथे उतरल्यावर असे दिसले कि विमानात आम्ही फत ८ जण थेट प्रवासी होतो. आता असेच रिकामे उडणार असे वाटतानाच, एक यात्रा कंपनीची मराठी मंडळी विमानात चढली. मायबोलीकर काय करतील, असा कल्ला त्यांनी सुरु केला. हवाई सुंदर्यांना चक्क खांदे धरुन त्यांना बसवावे लागले. बायकांच्या गप्पा आणि पुरुष मंडळींचा "आनंद" सुरुच होता,
मग मुंबईत एका दिवसाचा मुक्काम करुन मी दुबईमार्गे नैरोबीला पोहोचलो. वाटेत आमच्या माऊंट केनया (आफ्रिका खंडातील दुसर्या क्रमांकाचे ऊतुंग शिखर ) चे असे दर्शन झाले.
तर एकंदर दौरा असा अगदी मनात आठवत राहण्याजोगा. म्हणजे दिन जो पखेरु होते,,, वगैरे वगैरे असा.
आता म्हणाल, कि हा लेख मी अगदी गुंडाळलाच.. तर मंडळी हि केवळ रिक्षा आहे. यातल्या एकेक ठिकाणाची भरपूर प्रकाशचित्रे घेऊन, भेटीला येतोच आहे..
झलक मस्तच आहे पुढच्या भरपूर
झलक मस्तच आहे
पुढच्या भरपूर फोटोंच्या प्रतिक्षेत.>>>>+१
दिनेशदा, मस्त फोटो. मी
दिनेशदा, मस्त फोटो.

मी म्हणणारच होते, की या वेळी हे थोडके वर्णन का बरे? पण सविस्तर लेख येणार आहे हे वाचून आनंद झाला. आणि प्रतिक्षा सुरू झाली.
ह्म्म.. काश ..दिल जो पखेरु
ह्म्म.. काश ..दिल जो पखेरु होता !!!
फार छान प्रचि आणी वर्णन.
दिनेशदा मस्तच वाघाला झोपायला
दिनेशदा मस्तच
वाघाला झोपायला चटई मजा आहे त्याची.
दिनेशदा, केवळ ऑसम !! -- प्रचि
दिनेशदा, केवळ ऑसम !! -- प्रचि आणि लेख
फारच छान दिनेशदा... एकंदर
फारच छान दिनेशदा...
एकंदर मस्त झाली तुमची "Around the world" trip.
छान
छान
व्वा मस्तच
व्वा मस्तच
सगळे फोटो एकसे एक.. इडन
सगळे फोटो एकसे एक..
इडन गार्डनचा फोटो बघून मला श्री.चितमपल्लींच्या वर्णनाची आठवण झाली..............................
'पाचू वर्णाचे नेचे पाण्याभोवती फुललेले होते आणि सगळीकडे हिरवा प्रकाश भरून राहिला होता.'
हे वर्णन फोटोत बघायला मिळालं........
पापुआ न्यू गिनीचा फोटो खरंच गूढरम्य वाटतोय.
वाघोबा खासच! रुबाबदार या शब्दाचं मूर्तिमंत रूप म्हणजे वाघ असं मला वाटतं.
सविस्तर फोटो आणि वर्णन लवकर इथे द्या..
वा, मस्त झाली की सफर! फोटो
वा, मस्त झाली की सफर! फोटो कसले झक्कास आहेत. २ तारखेला तुम्हाला फोन करेन म्हणलं पण राहूनच गेलं, दिनेशदा.
>>>तिथल्या कलाकुसरीच्या वस्तू आपल्याला तितक्याश्या आकर्षक वाटणार नाहीत पण तिथला ज्वालामुखी जागृत होण्याचा अनुभव घेण्यासरखा आह>>>>>> म्हणजे काय? इंटरेस्टिंग वाटतय.
फोटो आणि निवेदन दोन्ही सुंदर.
फोटो आणि निवेदन दोन्ही सुंदर.
फोटो आणि निवेदन दोन्ही सुंदर.
फोटो आणि निवेदन दोन्ही सुंदर. >> +१
दिनेशदा, मी नाहि बनवत आहे
दिनेशदा, मी नाहि बनवत आहे लोणच, गीतू आज लोणच बनवणार आहेत, मी फक्त त्यांच्यासाठी सुलतान बाजारातून शनिवारी ह्ळ्द घेऊन आली आणि ह्ळ्द माझ्याकडून घेण्यासाठी रविवार गटगच नक्की ठरल.
मी शुक्रवारी आईकडे जाणार आहे, त्यामूळे ready to eat लोणच मिळेल.
मस्त प्रचि आणि वर्णन दिनेशदा.
मस्त प्रचि आणि वर्णन दिनेशदा. मी यावेळी श्रेयसला नाही येवू शकले काही कारणाने. पण तुमची भेट चुकल्याची रुख रुख कायम राहील.
मामी, तिथले स्थानिक रहिवासी
मामी,
तिथले स्थानिक रहिवासी जरा आडदांडच असतात. हा उल्लेख ठिक नाही पण सत्य आहे, तिथे झोपेत असणार्या आईच्या अंगाखाली चिरडून लहान बालके दगावण्याच्या अनेक घटना घडतात. त्यांच्या कलाकृती तशाच रांगड्या.
तो देश पूर्णतः ज्वालामुखींचाच बनलेला आहे. समजा त्यापैकी एखादा जागा झाला तर काय होईल, याचा अनुभव तिथे घेता येतो. (मग लिहितोच.)
समर्पक शिर्षक दा ! अप्रतीम
समर्पक शिर्षक दा ! अप्रतीम प्र.ची. अन छान छान महिती यांचा प्रेमळ खजीना आमच्या साठी आणल्याबद्दल मनःपुर्वक आभार, अन हो >> पाय १९ व्या देशाला लागले>> यात भरपडत राहो
फोटो आणि प्रवासवर्णन अप्रतिम.
फोटो आणि प्रवासवर्णन अप्रतिम.
दिनेशदा, जो पहिला फोटो दिला
दिनेशदा, जो पहिला फोटो दिला आहे. तो कर्णेश्वराच्या मंदिराचा आहे ना? स्थानिक लोक हे मंदिर पांडवकालीन आहे असे सांगतात.
संभाजी राजाना या मंदिरात नव्हे तर शिर्क्याच्या वाड्याजवळ अटक झाली होती. (माझा इतिहास बराच कच्चा आहे.)
संगमेश्वरजवळ संभाजी राजाना जिथे पकडले तिथे एक स्मारक बांधलेले आहे. त्या स्मारकाची अवस्था पाहिल्यावर आपल्याला फक्त लाज वाटते. इतकी त्याची दुरावस्था आहे.
पुढील लेखाच्या प्रतिक्षेमधे.
छान.
छान.
Pages