तूं माझ्या हृदयी गे

Submitted by SuhasPhanse on 4 February, 2012 - 12:02

मराठी प्रेम गीत.


व्हिडिओ फक्त चाल समजण्यासाठी पहा.
गाणं आपल्याला गायचं आहे.

तूं माझ्या हृदयी गे
तूं माझ्या हृदयी गे
वसली गे वसली गे
माझ्या श्वासांनागे
तूं सांगे तूं सांगे
आलिंगनी येउनी तूं
स्वप्नी तूं हरखुनी घे
तूं माझ्या हृदयी गे,
वसली गे वसली गे ॥धृ॥
पागल झालो मी बघ गे
प्रेमज्वराने पिडलो गे
हळूच जवळ तूं आली गे
न कळत हृदया कळले गे
नाही कुणाची भीती गे
जीवन मरणी साथी गे
तूं माझ्या हृदयी गे,
वसली गे वसली गे ॥१॥
जग नाकारे मजला गे
तूच जवळी मज केले गे
हृदयाला किती चैन मिळे
सारे जग मज किती छळे
माझे हे स्वप्न असे
माझी तूं माझीच असे
तूं माझ्या हृदयी गे,
वसली गे वसली गे ॥२॥

गुलमोहर: 

लयीत आहे, छान आहे

अवांतर :
तूं माझ्या हृदयी गे
तूं माझ्या हृदयी गे
वसली गे वसली गे

इथे.. वसला गे वसला गे असे बदल हवेत का ?