Submitted by अतरंगी on 3 February, 2012 - 22:25
मला घरच्या घरी बनविता येण्यासारखी मॉकटेल्स हवी आहेत....
कालच मी पुदिना, लिंबू, आलं, क्रश्ड आईस आणि स्प्राईट वापरुन एक बनविले होते. एकदा कोठेतरी होटेल मधे प्ययलो होतो म्हणुन घरी करुन पाहिले, छान झाले होते...
अशी अजुन कोणती पेये असतील जी फळांचा रस, शीतपेये आणि ईतर काही पदार्थ वापरुन करता येण्यासारखी असतील तर कृपया ईथे लिहा.
मी आहारशास्त्र आणि पाककृती मधे भरपुर शोधलं पण अशा पेयांबद्दल काही वाचायला नाही मिळालं. मी चूकिच्या जागी शोधत आहे का? तसे असेल तर मला हि माहिती कुठे मिळेल हे कोणी सांगू शकेल का ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नविन मायबोलीवर पेयांच्या
नविन मायबोलीवर पेयांच्या पोस्टी फारशा पाहिल्या नाहीत. जुन्या माबोवर बहुतेक मॉकटेल्स सेक्शन होता.
अभिजीत तुम्ही बनवलेल्या पेयाची रेसिपी नविन धागा उघडुन टाका नी सुरवात करा. हाकानाका
ताज्या शहाळ्याच्या पाण्यात
ताज्या शहाळ्याच्या पाण्यात वॅनिला आईसक्रिम ब्लेंड करून सुंदर पेय तयार होतं.
उन्हाळ्यात काकडीच्या रसात लिंबू, चवीपुरतं काळं मीठ आणि पुदीना घालून मस्त रीफ्रेशिंग ज्यूस तयार करता येतं.
अभिजीत, इथेही पहा - http://www.maayboli.com/node/2548/by_subject/11/261
साधना, मी
साधना,
मी ईथे
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/4949.html?1216171765
आणि इथे
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/59546.html?1161966461
जावून डोकावुन आलो, पण काही विशेष नाही मिळाले. अजुन कुठे शोधू का ?
मी केलेलं
मी केलेलं पेय...
साहित्यः-
पुदिन्याची पाने
लिंबू
आलं
क्रश्ड आईस
स्प्राईट
पुदिन्याचि पाने, लिम्बाचा रस एकत्र करा, मिक्सर मधे किंवा पाटा वरवंटा वगैरे. त्यावर आलं किसुन घाला.सगळं छान एकत्र घोटुन घ्यायचं. हे सगळं एका ग्लासा मधे घेउन त्यात थोडे स्प्राईट टाकावे.
हा रस नंतर दोन, तीन ग्लास मधे हवा तसा घेउन त्यात क्रश्ड आईस टाकावा. नंतर वरुन स्प्राईट टाकुन ग्लास टॉप अप करावा, लिम्बुच्या चकत्या, पुदिन्याची पाने सजावटी साठी.....
मी हे सगळं झाल्यावर परत थोडं आलं आणि लिबू पिळला, मला तरी छान लागलं.....
हे पेय हॉटेल मधे पण मिळतं तिथे कसं करतात ते नाही माहित.....
अभिजीत तुम्ही योग्य जागी
अभिजीत तुम्ही योग्य जागी शोधुन आलात. जेवढे मिळाले तेवढेच आहे बहुतेक. एनी वेज, या धाग्यावर मिळतील अजुन ऑप्शन्स.
इथे लिहिण्याऐवजी "नविन पाककृती" वर क्लिक करा आणि तिथे लिहा. तळाला धागा सार्वजनिक करण्याबद्दल टिक असेल तिथे जाऊन टिक करुन धागा सगळ्यांसाठी बनवा म्हणजे तमाम पब्लिक तुमच्या पेयाचा आस्वाद घेऊ शकेल
हा ही धागा सार्वजनिक
हा ही धागा सार्वजनिक आहे....
इथेच लिहावे म्हणलं, म्हणजे सगळी पेये एका जागी राहतील.....
मंजूडी....
हा प्रकार कधि नाही पाहिला किंवा ट्राय नाही केला... आजच घरी जाउन करावा म्हणतो...
माझा फूड प्रोसेसर सध्या बिघडला आहे.... ब्लेन्ड करायचा म्हणजे नक्की काय करायचं हाताने फेटून घेतलं आणि वरुन क्रश्ड आईस टाकला तर >?
हँड ब्लेंडर आहे का अभिजीत?
हँड ब्लेंडर आहे का अभिजीत? नसेल तर रवीने जोरात घुसळा, कारण ते पेय फेसाळ होणं अपेक्षित आहे, शिवाय ताज्या मलईचे छोटे तुकडेही घाला त्यात.
अभिजीत छान पेय वाटयत तुम्ही
अभिजीत छान पेय वाटयत तुम्ही बनवलेल. अजुन शोधायला हवीत अशी पेये.
हँड ब्लेंडर पण नाही
हँड ब्लेंडर पण नाही सध्या....
रविने घुसळून बघतॉ......
मी मागे एकदा कुठे तरी Guava delight का असंच काहितरी नाव असलेलं पेरुच्या रसा मधे चटणी आणि मीठ टाकलेलं मॉकटेल प्यायलॉ होतो... इतकं खास नव्हतं पण वेगळं काही तरी ट्राय करायचं असेल तर छान होतं
छान आहे धागा. कॉकटेल्सचाही
छान आहे धागा.
कॉकटेल्सचाही पाहिजे.
गारेगार करणारी पेये १.
गारेगार करणारी पेये
१. शहाळ्याचे पाणी + सब्जा / तुळशीचे भिजवलेले बी (जास्त नको) + गावठी गुलाबाच्या कातरलेल्या पाकळ्या + रोझ इसेन्स वापरून कधी काळी घरीच पेय बनवायचे. रोझ इसेन्स नको असेल तर पुदिन्याची ताजी पाने वापरता येतात.
२. मिन्ट ज्युलेप/ युलेप : ताज्या पुदिना पानांचा रस + साखर + मीठ + बर्फाचा चुरा + लिंबाचा रस.
३. आईस्ड टी : अतिशय कमी चहापूड घालून बनवलेल्या चहाला गार करून आवडीप्रमाणे साखर, बर्फाचा चुरा, लिंबाचा रस, पुदिना पाने घालून उंच ग्लासात ओतून आस्वाद घेणे. यात आवडीप्रमाणे संत्रा रस / कोरी कॉफी किंवा अन्य शीत पेये मिसळून मजेशीर चवीचे पेय बनवता येते.
४. जांभळाच्या, सफरचंदाच्या, संत्र्याच्या रसात कोणतेही फिझी शीतपेय घालून मस्त लागते.
५. नारळाचे / शहाळ्याचे पाणी, पुदिना पाने, लिंबाचा रस हे कॉम्बोही मस्त.
आज दुपारी ऑरेंज ज्युस मधे
आज दुपारी ऑरेंज ज्युस मधे व्हॅनीला आईसक्रिम + साखर रविने घुसळून घेतलं त्यावर मस्त पैकी परत आईसक्रिमचा एक स्कूप टाकला.... मस्त झालं होतं.... ज्युस ची आंबट चव + व्हॅनिलाची गोड चव... छान लागत होतं....
अरे वाह... भन्नाट आहे धागा
अरे वाह... भन्नाट आहे धागा
२शाहाळी:- पाणी व मलई ऑरेंज
२शाहाळी:- पाणी व मलई
ऑरेंज ज्युस..:- १/२ लीटर
व्हॅनीला आइसक्रिमः- २ स्कुप
नारळाचे दुधः- २०० ते ३०० मिली
साखर
वरिल सगळे पदार्थ अर्ध्या अर्ध्या प्रमाणात मिक्सर मधे फिरवुन घ्यावी. नंतर चवी प्रमाणे आपल्याला पहिजे तसे एक एक पदार्थ वाढावावे. काहि लोकांना नारळाचे दुध जास्त टाकलेले आवडते तर काही लोकांना ऑरेंज ज्युस.... प्रमाण आपल्याला पहिजे तसे कमी जास्त करता येते....
स्त्रोतः- internet वरुन
तळटिपः- जेवायला दिड ते दोन तास लागनार असतील तरच हे आधी घ्यावे. नारळाचे पाणी, मलई, दुध या सर्वामुळे भुकमोड होते....
मस्त आहे हा धागा!
मस्त आहे हा धागा!
सावंतवाडी बाजारात बाळकृष्ण
सावंतवाडी बाजारात बाळकृष्ण कोल्ड्रिंकमध्ये कॉकटेल नावाचे पेय मिळते. तिथे खुपच फेमस आहे.
एक छोटी वाटी कापलेली फळे (आंबा/सफरचंद्/पपई इ.)
एक छोटी वाटी बारीक कापलेली जेली (हव्या त्या स्वादाची)
एक वाटी दुध
हव्या त्या स्वादाच्या आईसक्रिमचे तिन स्कुप,
सजावटीसाठी ड्रायफृट्स, पाकवलेली चेरी आणि एक वॅफल बिस्कीट.
उंच ग्लासात जेली आणि कापलेली फळे घाला.
ब्लेंडरमध्ये दुध आणि एक आईसक्रिमचे स्कुप घालुन फक्त मिक्स होईल इतके फिरवा आणि ते ग्लासात ओता.
वर दोन स्कुप आईसक्रिम घाला.
स्कुप्सवर ड्रायफृट्स, चेरी घाला, बाजुने वॅफल बिस्कीट खोचा आणि द्या खायला.
इतके सुरेख लागते की सावंतवाडीला गेल्यावर हे प्यायल्याशिवाय परतावेसे वाटत नाही.
(फक्त त्यांची जेली जरा चिवट असते)
कोकम सिरप + सोडा + आवडत
कोकम सिरप + सोडा + आवडत असल्यास वरून जलजीराचा मसाला / भाजक्या जिर्यांची पूड.
कच्ची कैरी किसून अशी किसलेली कैरी + पुदिना + कोथिंबीर + शेंदेलोण पादेलोण मीठ + भाजक्या जिर्यांची पूड + साखर घालून मिक्सरमधून काढणे. पाणी + बर्फ घालून सर्व्ह करणे. काहीजण ह्यात हिरवी मिरचीही घालतात.
काकडीच्या रसात गार पाणी, लिंबाचा रस, साखर, पुदिना पाने घालून गार करून.
खजुरः- १०० ते १५० ग्रॅम दुधः-
खजुरः- १०० ते १५० ग्रॅम
दुधः- १/२ लीटर
व्हॅनीला आईसक्रिमः- १/२ ली
साखर
चॉकलेट सिरप
खजुर आणि दुध मिक्सर मधुन नीट मिक्स करुन घ्यायचे....यातच वाटल्यास आईसक्रिम पण टाकावे....
नंतर चवीप्रमाणे साखर.....
Serve करताना चॉकलेट सिरप ने ग्लास सजवून घ्यायचा. आधी पेय टाकून त्यावर आईसक्रिंम टाकावे त्यावर परत चॉकलेट सिरप ने सजावट.....
छान लागते... दुध आणि खजुर असल्याने मस्त आरोग्यदायी, आणि जेवताना कोणाला जेवण न आवडल्यास, जेवण कमी पडल्यास पोटभर......
लहान मुले ज्याना खजुर किंवा दुध आवडत नाही त्यांच्या साठी योग्य पर्याय. यात, बदाम, काजू, मध वगैरे पण टाकता येते.....