नितळ...

Submitted by के अंजली on 1 February, 2012 - 03:34

सुचतं खूप काही..
अगदी आतून..
मनाच्या तळातून येतं..
जाणीवांचे तरंग
हलकेच उठतात मनाच्या पृष्ठावर..
पण मध्येच मनाचाच एखादा
गरगर भोवरा
ढवळून जातो सारे अंतरंग..
गढूळ झालेला मनाचा चेहेरा मग
नितळ होता होत नाही.....
घिसापिट्या संवादांची
नुसती रेलचेल होते..
मनातल्या मनातच..

दाटून येतच मग..
धुमसत धुमसत..
तड लागली की
कोसंळतच..!

मग सारं कसं...

नितळ......!!

आभार सर्वांचे! Happy

इतरांनी आपल्या कवितेला काकाक म्हणण्यापेक्षा आपणंच म्हंटलेलं बरं नै का मंदार? Happy