मुंज करावी का?

Submitted by chaukas on 28 January, 2012 - 10:28

मुंज, मौंजीबंधन, व्रतबंध अथवा तत्सम नावांनी ओळखला जाणारा विधी करावा का? आणि का करावा?

'आपण' ('आपल्यात' हे करतात) आणि 'ते' ('त्यांच्यात' हे करत नाहीत; इथे एक विशिष्ट जात सोडून बाकी सर्व जाती आणि धर्म एकत्र 'त्यांच्या'त ढकलले जातात) असा फरक त्या कळत्या-नकळत्या वयातच मनावर बिंबवण्याखेरीज त्या विधीतून काय साध्य होते?

दुर्गा भागवतांनी एका लेखात म्हटले आहे की त्यांना मावळातील शेतकरी पीक कापणीला येण्याच्या काळात शेतात मध्यभागी एक काटकी पुरताना दिसले. दुर्गाबाईंनी त्या प्रथेचा शोध घेतला तेव्हा असे कळले की फार पूर्वी त्या हंगामात पिकांवर येणाऱ्या पाखरांना हाकलण्यासाठी शेतात एक मोठा खांब पुरत आणि त्यावर त्यावर एक कावळा (अथवा तत्सम पक्षी) मारून टांगत असत, ज्यायोगे इतर पक्षांना दहशत बसावी. कालांतराने त्या खांबाची काटकी झाली.

तसेच या विधीचेही झालेले आहे असे वाटत नाही काय?

ज्याला ह्या विधीतून जावे लागते ते रत्न बहुतेक वेळेला ('बहुतेक' हा एक सर्वसाधारण शब्द आहे; नक्की किती टक्के ही आकडेवारी मजपाशी नाही) कुठल्यातरी ख्रिश्चन 'संता'च्या (या ख्रिश्चन संतांचे मूळ पाहिले तर वेगळीच मजा येईल; 'संत' झेवियर यांचे कर्तृत्व काय तर त्यांनी गोव्यावर 'हिंदू' चालून आले असता त्यांना पळवून लावले आणि ख्रिश्चन 'धर्मगुरूंचे' बाटवाबाटवीचे उद्योग निर्विघ्न चालू ठेवण्यास मदत केली) नावे चालवलेल्या शाळेत विद्या ग्रहण करत असतो. त्यांना संस्कृतचा 'स' अथवा परंपरेचा 'प' देखिल माहीत नसतो. अशा वेळेला त्यांच्या एका विशिष्ट जातीत जन्मलेल्या आई-बापांच्या मनातील कुठलातरी गंड शमवण्याकरता हा विधी करावा का? हा विधी करून कुणी खरेच 'गुरुकुलात' गेल्याचे एक तरी उदाहरण आपल्याला आजच्या २०१२ साली दिसेल काय? ज्याची मुंज झाली आहे तो मुलगा लग्न होईपर्यंत 'ब्रह्मचर्याश्रम' पाळेल याची खात्री कोणी देईल काय?

हे सर्व आक्षेप लहान ठरतील असा मोठा आक्षेप - थोडक्यात म्हणजे स्त्रिया आणि इतर जातींतील लोक यांनी विद्याग्रहण करू नये असेच गृहीतक या विधीतून ठसवण्याचा निंदनीय प्रयत्न या विधीतून बिनबोभाट होत नाही काय? बाकीच्यांचे सोडा, पण या समारंभात ज्या नथी आणि शालू घालून मिरवतात अशा स्त्रियांना हे खटकत नाही काय?

हा 'हिंदू धर्मावर' हल्ला आहे असा गळा काढणाऱ्यांनी आधीच थांबावे. हा केवळ एका जातीतल्या एका लिंगाच्या जुनाट कर्मकांडाविरुद्धचा आक्षेप आहे. आणि 'आम्ही आमच्या घरी काय वाटेल ते करू' म्हणू इच्छिणाऱ्यांनी आपण जे करतो आहोत त्यामुळे समाजात दुहीचा संदेश जात नाही ना याचा विचार करायला नको का? आणि हे कुणाच्या 'घरी', इतरांना नकळत होत नसून चारचौघात सर्वांना कळेल अशा थाटात होते.

समाज सुरळीत चालू रहावा यासाठी काही विधी आवश्यक असतात. लग्न हा त्यातीलच एक. त्यामुळे हे आक्षेप लग्नाला घेता येत नाहीत. कारण लग्न सर्वांचे (करू इच्छीणारांचे) होते. जन्म सर्वांचाच होतो आणि मृत्यूही सर्वांचाच होतो. त्यामुळे ते विधी या चर्चेत आणत नाही. अन्यथा या चर्चेचा पट फारच विस्तारेल आणि हा प्रश्न अलगद नगण्य होऊन जाईल. कृपया प्रतिसाद देताना ते टाळावे.

'आमचा पैसा आम्ही कसा खर्च करू हे इतरांनी सांगू नये' हे खुसपट मान्य. ते मी सांगूही इच्छीत नाही. फक्त तो अशा विकृत मार्गांनी खर्च करू नये असे वाटते.

शेवटी, आम्ही मुलींचीही मुंज करायला तयार आहोत असा खुळचट प्रतिसाद देण्याआधी मानवजातीतल्या सर्वांची मुंज करायला (स्व-खर्चाने नव्हे) तुमची तयारी आहे का? आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे आजच्या काळात ह्या विधीला काही अर्थ आहे काय? या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.

तळटीप: माझा धर्म आणि जात वरील लिखाण वाचताना गौणच नव्हे तर निरर्थक मानावी. तसेच हे लिखाण कोणाही व्यक्तीला नजरेसमोर ठेवून केलेले नाही याची खात्री बाळगावी.
मतभेद असू शकतील, नव्हे असतीलच. मतभेद असणे हेच तर 'जिवंतपणाचे' लक्षण. त्यातून विचारशक्तीचा पट विस्तारावा एवढ्याच हेतूने हे लिखाण झाले.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

Happy

रामभाऊ,

ते विशिष्ट वर्गाचं सोडा हो! त्याला बोटभर तरी पुरावा आहे का? मुर्शिदाबादसारख्या टीचभर नगरात लंडनपेक्षा जास्त सुबत्ता होती असं रॉबर्ट क्लाईव्ह म्हणून गेलाय. हा कोणी सटरफटर माणूस नाहीये. याने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया घातला.

जर ब्राह्मणांनी शोषण केलं असतं तर भारताची एव्हढी भरभराट होऊ शकली असती का?

आ.न.,
-गा.पै.

टीप : या संदेशाचा विषय धाग्याला पूरक नसल्याने हा माझा या विषयावरचा पहिला आणि शेवटचा संदेश.

मामी, सुन्दर पोस्ट, या दिशेने देखिल (माता/भगिनी इत्यादिक स्त्रीनातेवाईक) विचार व्हावा. अनुमोदन
अरुन्धती, छान माहितीपूर्ण उदाहरण, धन्यवाद.

>>>> त्यापेक्षा लग्नापूर्वी, कण्डोम न वापरता कुठे शरिरसंबंध अस्तील तर जीवघेणा "एड्स" होऊ शकतो हे समजवा त्याला फिदीफिदी म्हणावे सरकारी इस्पितळातुन फुक्कट वाटतात कण्डोम्स! असं नेम़क नॉलेज द्याव, नैतर काय ते तुमचा भिक्कार धर्म अन पाप अन पुण्य? )>>>>> तुझे वरदा नि तुझ्यापेक्षा वेगळा विचार करणार्‍यांना टोमणे मारणे वगैरे ठिक आहे, पण तुझ्या वरच्या वाक्यातला aids च्या भागाबद्दल दात काढण्यासारखे काय आहे नक्की ? <<<<<<<
अरे बाबा अति झालं अन हसू आलं, अशागत आहे ते. ते हास्य एड्स करता नसुन एड्स्चे निमित्ताने सुरक्षित "शरिरसंबंधा"करता कंडोम वापरा हे सांगणारे, मूळात, परंपरेनुसार, धर्मशास्त्रानुसार सुरक्षित संबंधाकरता "विवाह" करुन एकपत्नीव्रत कसोशीने पाळा हे पूर्वापार चालत आलेले तत्व/परम्परा/रुढी/नियम मात्र "चूकूनही" सान्गत नाहीत, अगदी सरकारी पातळीवरही, त्यामुळे आहे.
अन विरोधाभास बघ, बाहेर शेण खाऊन एड्स जडवुन घेतलेले, आपल्या घरात देखिल तोच एड्स रुजविणारे, त्यान्चा कळवळा येऊन उठसुठ रस्त्यारस्त्यावर जिथे तिथे सुरक्षित संभोगाकरता एड्स वापराच्या जाहिराती नुकत्याच वाचू लागलेल्या बालकासमोर देखिल ठेवणारे हेच सरकारी विचारवन्त महाभाग, दारूच्या दु:ष्परिणामाबाबत मात्र "मुग गिळून" बसतात. आता सन्ख्यात्मक विचार करायचाच झाला तर, एड्स चे दु:ष्परिणामाने खपणार्‍यान्च्या संख्येपुढे दारुमुळे वाताहत होणार्‍यान्ची संख्या कित्येक पटिन्नी जास्त आहे. पण दारू महसुल देते जो महसुल अन्य मार्गाने खाता येतो ना? मग फिकिर कुणाला अन कशाची? शिवाय पब्लिकचे लक्ष दुसरीकडे वेधायला हे असे "मुन्जीबद्दलचे ब्रिगेडी विचार" आहेतच की!
एड्स् बद्दलच्या जाहिरातबाजीमुळे जे काय सामाजिक परिणाम होताहेत, ते दिसुन यायला अजुन थोडा काळ जायला लागेल, पण त्याबद्दलही या महाभागान्ना सोयरसुतक नसतेच. अन ती पोस्ट लिहीताना या दोन्ही गोष्टी माझे नजरेसमोर होत्या म्हणून अति झाले अन हसू आले. मुन्जीला (त्यातुन विशिष्ट वर्गच करतो म्हणे, अन ते ही प्रचण्ड खर्च करीत म्हणे!) विरोध करणार्‍यान्ना, विकृत ठरविणार्‍यान्ना, हे दारु/एड्स चे कसे चालते?
प्रत्यक्षात, आम्ही अनेक मुन्जी (अन एकुणात सगळीकडे असन्ख्य) घरातल्या घरात लावलेल्या आहेत, लावत असतो, काही निवडक श्रीमन्तच कार्यालय वगैरे खर्च करु शकतात, पण तो नियम्/परम्परा/रुढी नाही. असो. मुद्दामहून विचारलेस त्याबद्दल धन्यवाद.
बाकी मी टोमणे मारत नाही, व्यक्तिला/आयडीला उद्देशुन तर नक्कीच नाही, मात्र एखादा अवसानघातकी विचार प्रसुत होत असेल, तर त्या त्या "विचाराला" त्यातिल निरर्थकता सिद्ध करणेसाठी प्रतिवाद मात्र पावलापावलावर करीत रहातो. कदाचित तुम्हास ते "टोमण्यासारखे" भासत असेल. पण बरेचदा, ती माझेच मनात चाललेया वैचारिक द्वन्दाचे प्रगटीकरण असते.

बी, अरे तू अत्यंत चौकस आहेस? म्हणजे? अस्ल कै म्हणू नको रे, लोकान्ना वाटेल "चौकस" ही आयडी तुझीच! Wink

ज्याची मुंज झाली आहे तो मुलगा लग्न होईपर्यंत 'ब्रह्मचर्याश्रम' पाळेल याची खात्री कोणी देईल काय?

चौकसराव, कंडोम वापरला तरी एड्स होणार नाही, याची गॅरँटी सरकार देते काय? आणि ब्रह्मचर्याची गॅरंटी मात्र मुंज लावणार्‍या गुरुजीने द्यायची! अजबच डोस्कं दिस्तय! तुमचा मेंदू जरा तपासुन घ्या.. मेंदूची काटकी झाली आहे का ते बघा. Proud

लग्नात गर्भदान विधी केला तरी पोरं होणार याची कुठं गॅरँटी मिळते? मग लग्नाचा विधीही कालबाह्यच का? Proud

आम्ही गर्भदान विधी करतो असे खुळचट उत्तर देणार्‍यान्नी आधी जगातल्या समस्त मानवजातीतील जोडप्याना गर्भदान विधी केल्याने पोरे होतीलच याची गॅरँटी द्यावी.. मग आम्ही हा विधी आनंदाने करु... आणि तसेही कुत्र्या मांजराना हा विधी न करताही पोरे होतातच ना! मग आजच्या काळात या विधीला काही अर्थ आहे का?

जमलं जमलं... आधुनिक होऊन नेटावर आधुनिक विचारी लेख लिहिणं आमालाबी जमलं !

Proud Biggrin Rofl

मूळ लेखच एक हास्यास्पद गोष्ट आहे, त्यात विषय सोडून चालेल्या चर्चेमुळे हा बहुतेक माबोवरचा सगळ्यात हास्यविस्फोटक धागा बनणार.

जामोप्या,
लग्नात गर्भदान विधी केला तरी पोरं होणार याची कुठं गॅरँटी मिळते?>>>>>>>>>>>>
Rofl Rofl Rofl Rofl

मुंज करु नये, कारण त्यामुळे ब्राह्मणी संस्कार बळावत जातो. ब्राह्मणी संस्कार हा चातुरवर्णाचा पुरस्कर्ता असल्यामूळे मुंजच्या माध्यमातून भक्कम होणारा ब्राह्मणी संस्कार समाज घातकी ठरतो. त्याच बरोबर मुंज केल्याने इतर कुणाचाही फायदा होत नाही पण ब्राह्मण मात्र दक्षिणेच्या रुपात कमाई करुन जातो. त्यामूळे ब्राह्मणांची कष्ट न करता दक्षिणा घेऊन कमविण्याची वृत्ती वाढत जाऊन नवे कर्मकांड जन्मास घालण्याची विकृती सुचण्याची शक्यता आहे. आता कुठे समाज नव्या उंबरठ्यावर उभा होतोय तेंव्हा परत एकदा ब्राह्मणी संस्कार मुसंडी मारल्यास आजवर झालेली सामाजिक क्रांती व सलोख्याची नाती कोलमडून पडतील. म्हणून ब्राह्मणी संस्काराना पिटाळून लावताना मुंजी सारख्या गोष्टी (विधी) कटाक्षाने टाळाव्यात.

टिपः ब्राह्मण व ब्राह्मणी संस्कार याच्यातील फरक न जाणता माझ्यावर तुटून पडण्याचे कारण नाही.

>>ब्राह्मण व ब्राह्मणी संस्कार याच्यातील फरक न जाणता माझ्यावर तुटून पडण्याचे कारण नाही.

ब्राह्मणी संस्कार यात ब्राह्मण हा शब्द येतोच. तुम्हाला अक्कल नाही एवढंच यातून समजलं. त्यामुळे तुमच्यावर तुटून पडण्याइतके तुम्ही विद्वान नाही असे आम्ही समजतो.

ब्राह्मणी संस्कार यात ब्राह्मण हा शब्द येतोच. तुम्हाला अक्कल नाही एवढंच यातून समजलं. त्यामुळे तुमच्यावर तुटून पडण्याइतके तुम्ही विद्वान नाही असे आम्ही समजतो.>> ब्राह्मण म्हणजे नुसतं त्या जातीत जन्माला आलेला पण चातुर्वण्य ना मानणारा, सर्वाना समान मानणारा, स्त्रीयाना शुद्र न समजणारा. रानडे, गोखले, पासून ते मा. फुलेना शाळेसाठी आपला वाडा देणारे भीडे व असे अनेक महान सामाजीक कार्य करणारे जन्माने ब्राह्मण होते पण त्यांच्यावर ब्राह्मण संस्काराचा (चातुर्वण्याचा) प्रभाव नव्हता, किंवा त्यानी तो नाकारला. बाबासाहेबांसमोर मनूस्मृती जाळण्याचा प्रस्ताव ठेवणारे सहस्त्रबुद्धे व नाशीक(काळाराम मंदिर) सत्याग्रहाचे रणशिंग फुंकणार नाईक हे सर्व जन्माने ब्राह्मण होते. पण आयुष्यभर ब्राह्मणी संस्काराच्या विरोधात लढा देत राहीले. ब्राह्मणी संस्कारात येणारा ब्राह्मण शब्द व ब्राह्मणी संस्कार याच्यात जमीन अस्मानचा फरक आहे.

आपल्या जन्मदात्री आईला शूद्र (हिंदु धर्मात स्त्रीला शुद्र मानल्या जाते) मानणारी संस्कृती ज्यानी निर्माण केली व ती इतरांवर लादली ती ब्राह्मणी संस्कृती.

>>आपल्या जन्मदात्री आईला शूद्र (हिंदु धर्मात स्त्रीला शुद्र मानल्या जाते) मानणारी संस्कृती ज्यानी निर्माण केली व ती इतरांवर लादली ती ब्राह्मणी संस्कृती.

अजूनही तुम्ही अक्कलशून्यच बोलताय, चालुद्या, फक्त वर बरळलात त्याचा पुरावा द्या म्हणजे झालं.

ह्याला ब्राह्मणी संस्कारच का म्हणायचे? चातुर्वण्य व्यवस्था मोडीत निघणं गरजेचंच आहे पण ही व्यवस्था ब्राह्मणच नव्हे तर दुसर्‍या जातींनीही पाळलीच की. बाकीच्या जातीही दुसर्‍या जातींना हीन मानतच होत्या व अजूनही मानतात. स्त्रियांना शूद्र फक्त ब्राह्मणांनीच नव्हे तर अख्ख्या समाजाने मानले होते. उलट स्त्रियांना हक्काची मारहाण ब्राह्मणांतच कमी होती. अजूनही बरेच लोक स्त्रियांना मारणं वगैरे पुरुषार्थ मानतात आणि त्या स्त्रियाही त्यात धन्यता मानतात. मग ह्याही लोकांची ब्राह्मणी संस्कृती असते का? ब्राह्मणी हा शब्द शिवी असते का? शिवी नेहमी तिरस्कारातून निर्माण होते हे लक्षात घ्या.

त्यामुळे याला ब्राह्मणी संस्कार न म्हणता अजून दुसरं काही नाव देता येईल का तुम्हाला जे अख्ख्या समाजात दिसणार्‍या दोषांचं वर्णन करेल?

आपल्या जन्मदात्री आईला शूद्र (हिंदु धर्मात स्त्रीला शुद्र मानल्या जाते) मानणारी संस्कृती ज्यानी निर्माण केली व ती इतरांवर लादली ती ब्राह्मणी संस्कृती. >>> या व्याख्येमध्ये ब्राह्मणी या शब्दाची व्युत्पत्ती दिसत नाही कुठे.

हिंदूंचे हिंदवी होते तसे ब्राह्मणाचे ब्राह्मणी होते. आणि तुम्ही म्हणता ब्राह्मणी हा शब्द ब्राह्मणाशी संबंधीत नाही. जर संबंधीत नसेल तर त्या शब्दाची व्युत्पत्ती सांगाल का?

असो. या बाफचा विषय मुंज आहे. समजा काही ४-५ जातींमध्येच मुंजीची प्रथा असेल तरी बाकीच्या जातींच्या तशाच काही प्रथा असतीलच की. 'आमच्यात' अस्सं नाही करत, हे नाही चालत, बोकड कापावाच लागतो, कोंबडी कापावीच लागते ही वाक्य आज जातीव्यवस्था खिळखिळी झाल्यावरही ऐकू येतातच. आता ह्या बळीच्या प्रथेला कुठली संस्कृती म्हणाल तुम्ही?

शांत व्हा आणि जात ह्या विषयापासून दूर रहा. समोरच्याकडे माणूस म्हणून पहा.. समाजात कुठल्या समुहात काय चांगलं आहे तेच उचला.. बाकीचं कालपरत्वे बदलेल अशी आशा ठेवा. बरं वाटेल. अर्थात कालपरत्वे जुन्या अनिष्ट प्रथा जातात तशा नव्या इष्ट / अनिष्ट प्रथाही निर्माण होतातच.

बघा ! हे आई गं नाही तर बाप रे बोलले.... हे सगळे ब्राह्मणी संस्कारान्नी स्त्रीला शुद्र मानून पुरुषान्ना महत्व दिल्याने घडले.... हाच तर पुरावा.... हो की नाही हो बकासुरा?... Proud

प्रत्येक वेळी चर्चा जातिवादावर का जाते ...

आता हा ही धागा बंद पडणार...पान डीलीट होणार बहुधा .

छान मुद्दे मांडले होते सर्वांन्नी !

प्रसाद, हा धागाच मुळात ब्राह्मणद्वेषातून निर्माण झालाय. त्यामुळे चर्चा तशी जाणारच. मुंजीवर चर्चा हवी होती लेखकाला तर एका वाक्यात चर्चा करा असं सांगून सुरवात करता आली असती. पण नाही.

अश्विनी के, जबरदस्त पोस्ट. आवडली.

अश्विनी.. पोस्ट खरच छान आहे पण बर्‍याच गोष्टी न पटणारी.. पण इथे त्यावर भाष्य करत नाही.. कधी भेट झाली तर नक्की बोलेन..:)

अके,

त्यामुळे याला ब्राह्मणी संस्कार न म्हणता अजून दुसरं काही नाव देता येईल>> नाही, दुसरं काहीच म्हणता येणार नाही. कारण हा विधी ब्राह्मणानी काढला व दक्षिणा लुटणे सर्रास चालू आहे.

उलट स्त्रियांना हक्काची मारहाण ब्राह्मणांतच कमी >> त्या तथाकथीत समाजाची विद्याबंदी ब्राह्मणानी केली व अज्ञानात ठेवले. शिक्षणाची मालकी फक्त ब्राह्मणांकडे होती. ब्राह्मण मारहाण करीत नसले तरी सतीच्या नावाखाली स्त्रीला जिवंत जाळण्याचा प्रघात घातला. यापुढे मारहाण अगदीच नगण्य आहे अर्थात त्याचेही समर्थन करता येत नाही. स्त्रीला तुच्छ लेखण्याच्या शिकवणीमुळे हे घडत आले आहे. ती शिकवण जिथून आली ती ब्राह्मणी व्यवस्था होय. म्हणून ब्राह्मण दोषी ठरतात.

या व्याख्येमध्ये ब्राह्मणी या शब्दाची व्युत्पत्ती दिसत नाही कुठे>> अत्याचाराचं बोला, व्यत्पत्तीच काय धरुन बसलात. तीन पिढ्या आधी तुमच्या घरातल्या बायकांची शैक्शणीक स्थीत काय होती उभ्य जगाला माहीत आहे. सुधारकानी झगडा चालविला नसता तर अके तुम्ही आज ईथे लिहू शकला असता का याचं एकदा आत्मचिंतन करुन पहा.

अके,
जमल्यास रानडे, गोखले, फुले व कर्वे यांचा इतिहास नक्की वाचा. तत्कालीन सुधारणावाद्यानी चालविलेला सामाजिक झगडा व स्त्रीयांवरील हिंदू (ब्राह्मणी व्यवस्थेचे) अत्याचर कसे होते ते जाणून घ्या.

हा विधी आयुष्य्तात एकदाच करतात.. त्याची दक्षिणा ठरलेली नस्ते.. यजमान जितके यथाशक्ती देइल तितकेच.... लुटण्याचा संबंध येतोच कुठे?

टीचभर पोराना शाळेसाठी लाखाने डोनेशन घेतात.. यापैकी शिकवणार्या मास्तरान्ना शिक्षण सेवक म्हणून दोन तीन हजार पगार देतात... यात असलेले लुटणे तुम्हाला दिस्ले नाही का?

मुंजीचा आणि अत्याचाराचा काय संबंध?

जामोप्या ... जर काहि गोष्टि थांबवायच्या असतील तर पूर्णविराम आपल्यापासून द्यावा. . .

बकासूर, मला एकंदरच समाजातील अनिष्ट रुढींबद्दल बोलायचे आहे. ब्राह्मणांचे जे चुकले ते चुकलेच. लाज वाटेल इतके चुकले आहे Sad ज्या ब्राह्मणांनी ह्या चुका सुधारण्यासाठी कष्ट घेतले त्यांचा मला अभिमान आहे.

पण ब्राह्मण सुधारले आणि बाकीचा समाज तसाच चुका करत राहिला तरी अख्खा समाज मागेच रहाणार आहे. सतीच्या चालीपासून स्त्री शूद्र ठरली गेली का? माहित नव्हतं मला हे.

स्त्रियांवरील अत्याचाराबद्दल बोलायचं तर ब्राह्मण सोडून इतर स्त्रियांवर त्यांच्या घरातूनच अत्याचार झालेच नाहीत का? अनिष्ट प्रथा त्यांच्यात नाहीत का? की त्यांच्यावर काम करण्याची गरज नाही? त्यांच्यावर काम करण्याची गरज नसेल तर हे दुर्दैवी आहे. त्यांच्या त्यांच्यात चाललेल्या अत्याचारांना काय नाव आहे ते सांगा की.

असो, मला जातीपातींबद्दल बोलणं प्रामाणिकपणे टाळायचंय. बाकी माझ्या घरात माझ्या आधीच्या मला माहित आहेत तेवढ्या पिढ्यांमधील स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे शिकलेल्या होत्या आणि त्यांना घरात चांगला मान होता. प्रत्येक घरात असतात तशी मतमतांतरे ही असणारच Happy पण फक्त माझं घर म्हणजे समाज नव्हे.. त्यामुळे खरंच मला तळमळीने वाटतंय की असं एकट्या दुकट्या समुहाने सुधारण्याची अपेक्षा न बाळगता, सगळा समाजच सुधारला पाहिजे असा दृष्टीकोन का असू शकत नाही?

नुसतं मुंजीच्या मागे लागला आहात तसे एकदा बळी वगैरेच्याही मागे लागा (बळी देणं वगैरे अनिष्ट वाटत असेल तर).

बाबासाहेबांसमोर मनूस्मृती जाळण्याचा प्रस्ताव ठेवणारे >>. बाबासाहेब आज असते तर त्यांनी मनुस्मृती जाळण्याची कृती केली नसती हे निश्चित.

अन बकासुर दक्षिणा कुठल्या समाजाकडून घेतली जाते? ब्राह्मणाकडूनचा, कारण हा विधी फक्त ब्राह्मण करतात असे लोकांचे म्हणने आहे ना?

दक्षिणा उपटतात हे माहिती झाल्यावरही परत परत ब्राह्मणांनाच का बोलावता? अगदी कुठल्याहीविधीला? आज तर कोणी म्हणत नाही ब्राह्मणांनाच बोलवा म्हणून. जरा आत्मपरिक्षण कराल काय?

स्ट खरच छान आहे पण बर्‍याच गोष्टी न पटणारी.. पण इथे त्यावर भाष्य करत नाही.. कधी भेट झाली तर नक्की बोलेन. >>> राम तुम्हीही तुमची टिकली लावण्याआधीची पोस्ट लिहिली होती ती तर ग्रेट होती. थेट ब्राह्मण उपरे आहेत असे सुचवणारी. (पुर्वापार राहत आलेले हिंदू असे शब्द योजले होते)

एकुण काय ब्राह्मणांनी खूप मोठी हाणी केली पण आम्ही आज सुधारणार नाही. कारण .. ? कोणास माहित. अरे हो मग नावे कोण ठेवणार. इथे नेट वर नेटाने मारे पुरोगामी म्हणून दाखवणार. पण परत घरी कुठला विधी असलाकी ब्राह्मणांना दक्षिनेसाठी बोलावणार. व परत शिव्याही देणार. जनू इतर जातींचे काहीही चुकलेच नाही अन त्या इतक्या बाळबोध होत्याकी त्यांना कुठल्याश्या उपर्‍या ब्राह्मणांन्चे सर्व पटले. गंमत आहे सगळी!

ब्राह्मण द्वेश आजकाल "इन" आहे. जो खरा सर्वजातसमभावी असतो तो कुठल्याही जातीला दोष देणे टाळतो असे वाटते.

कितीही ठरवले तरी एकदम १८-१९ नवीन प्रतिसाद दिसले की इथे येवून वाचायची खुमखुमी येतेच आणि आता तर तोच सदाबहार विषय चालू झालाय.
मायबोलीवरच्या प्रत्येक धर्मविषयक धाग्याच्या प्राक्तनात शेवट ब्राम्हण-ब्राम्हणेतर वादानेच लिहिला आहे असे वाटते.

चौकस राव, मुंजीचा विषय संपला की पुढचा फटाका काय आहे ?

नुसतं मुंजीच्या मागे लागला आहात तसे एकदा बळी वगैरेच्याही मागे लागा (बळी देणं वगैरे अनिष्ट वाटत असेल तर).>> अगदी अगदी. बळी देण्याची प्रथा सुद्धा ब्राह्मणानीच रुजविली आहे. ऋग्वेदात होम हवनांत बळी देण्याचे कित्येक उल्लेख येतात. ईथला समाज मुळात निसर्गपुजक होता. त्याला होम हवनाच्या जाळ्यात ओढून प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा वेदिकानी सुरु केली. होम-हवनात गायीचा बळी देणे व गोमांस खाण्यात वैदिक (ब्राह्मण) अव्वल होते याचे संदर्भ वेदात आहेत.
बळीवरुन सुद्धा ब्राह्मण(वेदिक) हेच दोषी ठरतात. आता झोडपायचे तरी किती या ब्राह्मणाना... ब्राह्मणांचं काय होईल ते देव जाणे, म्हणून मी त्याना क्षमा करतो व रजा घेतो.

हुश्श...

काविळ झाली असेल तर ती बरी करता येऊ शकते पण कायमच काविळीचे सोंग घेतलेल्यांना कोण आणि कसे बरे करणार ? Sad
(आता यावर असे म्हणतील की हे सोंग आम्ही नाही ब्राह्मणांनीच घेतले आहे, किंवा त्यांनी आम्हाला ते घ्यायला लावले आहे. पुढचे प्रतिसाद लिहिण्याचे कष्ट कमी करण्याचा एक प्रयत्न.)

Pages