माझी झालेली भांडणे, वाद ई.

Submitted by नथिंगनेस on 27 January, 2012 - 12:28

आपण समाजात वावरत असताना अनेकांशी आपले वाद, भांडणे होतात, काही भांडणे अगदी टोकाशी जातात. आपली अशीच झालेली भांडणे, वाद या विषयी हा धागा काढला आहे. आपल्या झालेल्या वादाची ,भांडणांची प्रार्श्वभुमी देऊन किस्से लिहावेत.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भांडण म्हणता येणार नाही पण एक मजेशीर शाब्दिक बोलाचाली:

स्थळ: पुण्यातील एक नामवंत सहकारी बँक

मी कॅशिअर कडून पैसे घेतले व पासबुक प्रिंटींग साठी टेबल पलीकडील क्लार्क कडे दिले.
हे क्लार्क महाशय अत्यंत निवांत चेहऱ्याने बसले होते, त्यांनी १५ मिनटे माझ्या पासबुकला हात देखील लावला नाही. मी आपला तिथेच उभा राहिलो.

मध्येच दोन तीन लोक त्यांना 'काय हरिभाऊ? कस काय' वगैरे विचारून पुढे जात होते.
हा माणूस निवांत सगळ्यांशी गप्पा मारत होता पण काम काही करायला तयारच नाही.

मी त्यांच्या समोरच जावून उभे राहिल्यावर त्यांनी मलाच प्रश्न विचारला:
" काय ? माझ्याकडे डोळे फाडून काय बघतोस ? खाणार आहेस का मला आं ?"

माझी सटकली आणि मी त्यांना जरा जोरातच सांगितले:

" नाही हो हरिभाऊ, मी विचार करत होतो कि यापूर्वी तुम्ही काय पोस्टात कामाला होता काय ? एवढी मंदगती आज काल फक्त तिथेच पाहता येवू शकते !"

यावर आजूबाजूचे १०-१५ लोक खो खो हसले आणि हरिभाऊ मात्र संतापाने लालेलाल झाले !

मी परत विचारले "पासबुक प्रिंट करताय ना?"
त्यानंतर मोजून ३ मिनटात पासबुक अपडेट करून माझ्या हातात आले.

मी ते घेऊन बाहेर गेलो तर हे गृहस्थ माझ्या मागे हजर !
वर मला म्हणतात "तू समजतोस कोण स्वत:ला, मोठ्या माणसांचा अपमान करतोस ?"

मग मात्र लगेचच मी आत आलो व थेट व्यवस्थापकांच्या खोलीत जावून त्यांना याबद्दल सांगितले.
यानंतर बँकेतील इतर कर्मचारी मध्ये पडले व व्यवस्थापकांनी दिलगिरी व्यक्त केल्यावर मी पण प्रकरण लांबवले नाही.

हरिभाऊ मात्र अजूनही रस्त्यात दिसले तरी खुन्नस देतात Happy

हिप्पो, सरकारी कार्यालयामधे असे 'हरिभाऊ' हमखास भेटतात. त्यांच्याशी झालेले वादाचे किस्से इथे टाकतोच लवकर.

एकदा पुण्यात बाईकवर प्रवास करताना एक व्यक्ती राँग साईडने ओव्हरटेक करताना माझ्या गाडीला धडकला. ** *** ** ही फ्येवरेट शिवी दिल्यावर तो उलटा फिरुन परत आला ,मग समस्त मराठी शिव्यांचा तोफखाना सुरु झाला. शेवटी गर्दी जमल्यावर दोघेही हळु हळु सटकलो तिथुन