ढगफुटी

Submitted by निंबुडा on 27 January, 2012 - 05:02

ढगांचं आपलं एक बरं असतं
जड झाले की बरसून मोकळे होतात

मग मी ही ठरवलं
आपणही आता असंच वागायचं
दु:ख, वेदना, राग, संताप
सगळ्या-सगळ्याचा एका क्षणात निचरा करायचा!

पण एखादा चुकार ढग असतोच ना...
तो नाही हा नियम पाळत
वाहत राहतो त्याचं ओझं अव्याहत

पण तरी एक दिवस तो फुटतोच!
पण मग त्याला पाऊस म्हणत नाहीत
त्याला म्हणतात ढगफुटी....!
मी ही त्या अशाच चुकार ढगांपैकी एक!

गुलमोहर: 

वाह! किती दिवसांनी पुन्हा वाचली ही कविता!
पुन्हा तितकीच आवडली जेवढी पहिल्यांदा वाचलेली तेंव्ह आवडलेली Happy
थॅक्स वैशाली Happy

Pages