आज त्यांचेही आभार मानूया

Submitted by मंदार-जोशी on 25 January, 2012 - 22:46

आज, प्रजासत्ताक दिनी आपापल्या घरी आरामात बसून त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत बोलताना, त्यांच्या मग्रूरीबद्दल चर्चा करताना, आणि त्यांच्या अकार्यक्षमतेवर ताशेरे ओढताना आपण त्यांच्या त्यागाचीही आठवण काढूया. कारण आज त्यांच्यामुळेच आपण रात्री सुखाची झोप घेऊ शकतो आहोत, आज त्यांच्यामुळेच कसाबसारख्या अतिरेक्याला जिवंत पकडण्यात आणि पाकिस्तानचा खरा चेहरा पुराव्यासकट जगासमोर मांडण्यात आपल्याला यश आलं आहे.

आज त्यांचे आभार मानूया, त्यांना मनःपूर्वक वंदन करुया - ते म्हणजे अर्थातच आपले - पोलीस!

TheUniform.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अगदि अगदि ...
मला पोलीसांचे अतिशय कौतुक (खरेतर किव) .. आहे -
१) गणपती विसर्जनात पेताड लोक नाचत असतात त्याना अवरायाला हे ..
२) **** नेते वातानुकुलीत गाड्या फिरवणार .. गस्त घालणार हे ...

या २ गोष्टिंमध्ये पोलीसांची इतकी शक्ती खर्च होते ना.... विनाकारण ...

छान आहे....................नक्कीच त्यांच्या मुळेच आपण हे दिवस बघत आहोत

सही रे मंदार ! मस्त प्रचि आणि तु आठवण ठेवुन आम्हालाही आठवण करुन दिल्याबद्दल तुझे आभार.

पोलिसखात्याला अनेकानेक धन्यवाद !

आज हा पोलीस इन्स्पेक्टर एका शाळेच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात शाळेच्या विद्यार्थ्यांच्या बरोबरीने उत्साहात सहभागी होताना दिसला, आणि त्याच बरोबर घारीच्या नजरेने सगळीकडे लक्ष ठेवताना दिसला, आणि हे सुचलं.

अगदी अगदी! मंदार! स्व-संरक्षणाच्या साधनांचा तुटवडा, दर्जाहिनता ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करुन आपल्या संरक्षणासाठी झटणार्‍या आणि त्यांचे बलिदान व्यर्थच जाते, याची जाणीव असूनही आपले कर्तव्य करत राहणार्‍या आपल्या पोलिसांना आणि जवानांना आदरपूर्वक सलाम! सर्वांना प्रजसत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ऐ मेरे वतन के लोगो
जरा आँखमें भर लो पानी
जो शहिद हुए हैं उनकी
जरा याद करो कुर्बानी

When you go home, tell them of us & say,
for your tomorrow we gave our today"

मंदार खरोखर तुझे आभार मानायला पाहिजेत. तू स्वतः एवढी चांगली आठवण ठेवलीस आणि आम्हालाही करून दिलीस. खरंच आपण त्यांच्या जीवावर आरामात राहतो.

मंदार, तुझ्याशी १००% सहमत. फारच छान विचार मांडला आहेस.
दैनंदिन आयुष्यात आपण पोलीसांच्या लाचखोरी आणि अकार्यक्षमतेबद्दल कितीही बोलत असलो तरी गणपतीच्या काळात ते १८ - २० तास कामावर असतात हे पण खरं. एवढी प्रचंड लोकसंख्या असलेल्या आणि सर्व जाती धर्मांचे लोक असणार्‍या आपल्या देशात अतिरेक्यांना हुडकून काढणं आणि घातपाताच्या घटना न होऊ देणं हे सोपं काम नाही. त्यांचे आभार मानालायलाच हवे. आणि त्यांच्याबरोबर देशाच्या सीमेवर उभे राहुन शत्रूशी थेट सामना करणार्‍या सेनादलाचेही कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

जय हिंद!!

एवढी प्रचंड लोकसंख्या असलेल्या आणि सर्व जाती धर्मांचे लोक असणार्‍या आपल्या देशात अतिरेक्यांना हुडकून काढणं आणि घातपाताच्या घटना न होऊ देणं हे सोपं काम नाही. त्यांचे आभार मानालायलाच हवे. >>>>>> खरय.
खरंतर ह्यापेक्षाही सक्षम आहे आपले पोलीस्.पण आपले कायदे आणी कार्यपद्ध्ती एवढे किचकट आहेत कि पोलीसच त्यात अडकु शकतात्,म्हणुन कधी कधी(खरंतर बर्‍याचदा) मनाविरुद्ध कानाडोळा करावा लागतो.

मंदार खरोखर योग्य लिहीलस
पोलीस फक्त संरक्षणासाठी
चोर दरोडेखोराना पकडण्यासाठी असतात
कामच आहे त्यांच ते अशी भावना असते
पण खाकी वर्दीआडही एक माणूस असतो याच विस्मरण होतं बऱ्‍याचदा
पोलिस आठवतात गणेशोत्सवासाठी बंदोबस्तासाठीच

हँटस आँफ टू देम

खरंय मंदार. खूप छान विचार मांडलाहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना जराशा विलंबित शुभेच्छा! Happy

खरच....एरवी आपण नाहीच ना मानत त्यांचे आभार!
उलट लाखोलीच वाहतो त्यांना बरेचदा!
पण आज फक्त त्यांचे आभार मानुयात!

आपली झोप मोडू नये म्हणून स्वतः सदैव जागृत राहणार्‍या.....आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी स्वतःच्या मुला-बायकांचं भवितव्य धोक्यात घालणार्‍या....अन केवळ आपल्या रक्षणासाठी झटणार्‍या, प्रत्येक पोलीस अधिकार्‍याला टोकीचा त्रिवार सलाम!

आपली झोप मोडू नये म्हणून स्वतः सदैव जागृत राहणार्‍या.....आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी स्वतःच्या मुला-बायकांचं भवितव्य धोक्यात घालणार्‍या....अन केवळ आपल्या रक्षणासाठी झटणार्‍या, प्रत्येक पोलीस अधिकार्‍याला टोकीचा त्रिवार सलाम! >>>>

टोकी + १

सहमत Happy

खरंच आभार मानायले हवेत.
त्यांचे आणि सीमेचं रक्षण करणार्‍या आपल्या जवानांचेही.

खरंच आभार मानायले हवेत.
त्यांचे आणि सीमेचं रक्षण करणार्‍या आपल्या जवानांचेही. >>> +१ Happy

मंदार, ख्ररच फोटो पण भारी घेतला आहेस.
२००% अनुमोदन.. खरचं आपण सगळे प्रत्येक सणावारी मजा करत असतो आणि पोलीस सगळे तेव्हा
डबल डुटी बजावत असतातं

प्र.ची. मस्त , त्यांचे आणि सीमेचं रक्षण करणार्‍या आपल्या जवानांचेही. >> +१ Happy
मनःपुर्वक आभार

जे?