Submitted by Kiran.. on 23 January, 2012 - 11:42
रात्रीचे दहा वाजतात आणि
सामसूम होते
गुलमोहर मान टाकतो
हितगुज वरची कुजबुज
ऐकू येईनाशी होते
गप्पाष्टकांना जाळ्या चढतात
आणि वर्दी येते..
जेवायची पानं वाढली जातात
तर कुठे चालू असतात
टीव्हीवरच्या मालिका
आणि कुठे कुठे
फोनवरच्या गटगगप्पा
काही चोरटे समस
इकडून तिकडे पास होतात
आणि काही..
किबोर्ड बडवण्यात दंग होतात..
उद्याची ती, बरं का, खानेसुमारी असते
पहिल्या पानावर येणा-या
त्सुनामीची तयारी असते..
वीररसाठी असतात इथे
कुरूक्षेत्रं आणि पानिपतं..एव्हरग्रीन
तुटलेल्या गदांची दुरूस्ती होत असते
नि गंजलेल्या तरवारींना तेल चढत असते
खिंडीमधे कापावा शत्रूला कसा
योजना ही रात्रीत बनत असते
असे थोर थोर सारे गुंगले असताना
काही मंद उथळ मात्र
झोपा काढत असतात
हम दो, हमारे दो
यातच दंग असतात...
अस्स चालतं का हो ?
सांगा बरं..
- Kiran
गुलमोहर:
शेअर करा
... आले वाट्टं माझे सोताचेच
रात्री नीट तलवार,ढाल,चिलखत इ. वस्तूंनी सज्ज होऊन मगच झोपत जा.. डोळे उघडे ठेवून.. हाकानाका!!!
Pages