Submitted by -शाम on 23 January, 2012 - 08:48
दुपार सुनाट
ठिकाण जुनाट
खुणावते वाट
धुळभरली...
चुंबिते आभाळ
डोंगराचे भाळ
मधेच बाभूळ
लुडबुडली...
नागीण पांढरी
ओलांडून दरी
कातळ किनारी
घुटमळली...
कोवळ्या तनाची
नाहते उन्हाची
मासळी कुणाची
चमचमली...
झाडीझुडी दाट
पाखरं सैराट
विसरून वाट
चिवचिवली...
गर्द रानमळा
हिरवा सोहळा
राईत कोकिळा
गुणगुणली...
झुळूझुळू वात
वाहतो निवांत
लहर पिकांत
सळसळली...
बांबूच्या बेटात
वार्याच्या ओठात
पावरी थाटात
रुणझुणली...
बैसला मेघात
धरा निहाळीत
सावळ्याची प्रीत
आज कळली...
....................................................................शाम
गुलमोहर:
शेअर करा
ही एवढी नाही आवडली रे शाम्भौ
ही एवढी नाही आवडली रे शाम्भौ
बैसला मेघात धरा
बैसला मेघात
धरा निहाळीत
सावळ्याची प्रीत
आज कळली...>>मस्तच.
सुंदर कविता, आवडली.
आवडली कविता.चार चार ओळित कोकण
आवडली कविता.चार चार ओळित कोकण उभ केलय.
निसर्ग चित्रं चांगलं उभं
निसर्ग चित्रं चांगलं उभं केलंय.
-----------------------------------------------------------------------------------------------------
शेवटच्या कडव्यात 'न्याहाळत' किंवा 'न्याहाळित' असं हवं ना ?
निहाळीत हे हिन्दीमधल्या निहारना वरून तर लिहिलं गेलं नाही ना अशी एकदा शंका आली.
काही ठिकाणी(उदा. तिसं कडवं) टायपो आहेत ते कृपया दुरुस्त करावेत. रसभंगाला उगाच वाव कशाला ?
धन्यवाद
धन्यवाद दोस्तांनो..!
@उकाका,
निहाळणे- न्याहाळणे- न्याहारणे... एकाच अर्थाचे आहेत..(संदर्भ- वा.गो. आपटे. मराठी शब्दकोष)
टायपो सांगावेत नक्की दुरुस्त करेन...
धन्यवाद!
उत्तम निसर्गकविता.
उत्तम निसर्गकविता.
शाम, हे टायपो असावेत असं
शाम,
हे टायपो असावेत असं वाटतं.
नागीन……. नागीण
किणारी….. किनारी
छान.
छान.
मस्त
मस्त
छानच!
छानच!
सह्ही.... ह्याच पद्धतीची
सह्ही....
ह्याच पद्धतीची माझीही एक कविता तयार आहे... पोस्टली नाही आहे अजून
सुनाट शब्द आवडला. नागीन
सुनाट शब्द आवडला.
नागीन पांढरी
ओलांडून दरी
कातळ किणारी
घुटमळली...
याचा अर्थ नाही लागला..
छान आहे लॅन्डस्केप
छान आहे लॅन्डस्केप
धन्यवाद मित्रांनो..! काका बदल
धन्यवाद मित्रांनो..!
काका बदल केलाय...धन्यवाद!
...................................................
नागीन पांढरी
ओलांडून दरी
कातळ किणारी
घुटमळली..>>>>> नदीच्या पात्रात दुरून दिसणारी पाण्याची अरूंद रेघ, जी दुपाच्या उन्हात पांढर्या नागीणी सारखी दिसते आहे..
एक डगर ओलांडून ही धार तीरावरील खडकांत अडखळत पुढे जाते आहे.......
समजलं नाही म्हणजे मी नक्कीच कमी पडलो.. नी वे स्पेशल..थँकू!!!!!
.............................................शाम
नदीच्या पात्रातील पाण्याची
नदीच्या पात्रातील पाण्याची अरूंद रेघ, जी दुपाच्या उन्हात पांढर्या नागीणी सारखी दिसते आहे..
एक डगर ओलांडून ही धार तीरावरील खडकांत अडखळत पुढे जाते आहे.......
येक्झॅक्टली हाच अर्थ लागला होता. पण "ओलांडून दरी" मुळे ती रेघ दरी ओलांडून कशी जाईल, तॉ ओढ्याच्या वाटेने खाली उतरेल असं वाटलं मला. कारण हुबेहुब तसं पाहिल्यासारखं आठवलं...
ओलांडून >> वळसा घालून
ओलांडून >> वळसा घालून नचिकेत.. :).... मधल्या डगरीमुळे धार ओलांडून आल्या सारखी भासते.... !!
ह्म्म्म...
ह्म्म्म...

मस्त रचना !
मस्त रचना !