एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उमेश कामतचे काम पाहिले नसल्याने कितपत आवडेल सांगू शकत नाही. आहे हा घना बरा आहे. कशाला बदलाबदली करतात कोण जाणे. नंतर कलाकारांना वेळ नसणार हे आधी कळत नाही का? प्रेक्षकांनी का म्हणून दुसरा घना सोसायचा? Wink हजार भागांची मालिका करण्यापेक्षा कलाकार न बदलता पाचशेच भागांची करा म्हणावं.

अरे, ह्या आत्याला कोणीतरी सांगा रे - म्हणावं एक तर 'जमाईराजा' तरी म्हण नाहीतर 'जावईबापू' म्हण. 'जमाईबापू' हे म्हणजे रबडी आणि श्रीखंड मिक्स केल्यासारखं वाटतंय>>>>>>.
अगं स्वप्ना मी हेच ओरडतेय रोज(मनातल्यामनात!)
अरे हिंदीत बापू वगैरे नसतो राव!
आणि उमेश कामत...........आत्याचा कुठे(अमेरिकेतच का?...माहिती नाही!) दूर असलेला "पुष्कर" म्हणून तर येणार नाही ना?
काल राधा म्हणत होती की..........पुष्करशी स्काइप करू या ...की कायसं!

मालिका सुरू झाली तेव्हा "यावेळीही आम्ही असाच निर्णय घेतला असून ही नवी मालिकाही १५६ भाग चालणार आहे. कथेत पाणी घालून पालीची मगर केली तर प्रेक्षक कंटाळतात, त्यामुळे आम्ही तसे करणारच नाही" असे सांगितले होते.
अजून किती भाग राहिलेत?
गुंहृहेही सांगितले तितक्या भागात संपवली ना?

राधाचा कालचा ड्रेस मस्त होता. निळी ओढणी प्रिंटेड व सलवार वाला. शिवणारे मी तसले कापड घेऊन. Happy
तिच्या सासूचा रोल कोण करते? मजेशीर आहे ते पात्र. तो अमेरिकेला नाही जाणार हे कळताच त्यांनी सहजच योग्य वेळी शिरा केला असे वाक्य फार मस्त टाकले.

राधाची सासू = इला भाटे.....सासूचे रोल करायचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. ह्याआधीही त्यांनी असंभव आणि अग्निहोत्रमध्येही तोच रोल केला होता. Happy

टीबी Rofl

१५६ भाग की ६ महिने?.... मी ऐकलं होतं, की 'गुंतता..' प्रमाणे ही मालिकाही ६ महिन्यात संपणारे.

Proud

उका PG म्हणून आणलाय महेशरावांनी ..
आता उका हा अगदी शिस्तप्रिय, काटेकोर, स्वावलंबी एवंगुणविशिष्ठ असणार..
आणि मग रॉधाला साक्षात्कार होणार की ते वेडंगबाळं, लाडावलेलं ध्यानच तिला आवडतय...

अरे, ह्या आत्याला कोणीतरी सांगा रे - म्हणावं एक तर 'जमाईराजा' तरी म्हण नाहीतर 'जावईबापू' म्हण. 'जमाईबापू' हे म्हणजे रबडी आणि श्रीखंड मिक्स केल्यासारखं वाटतंय>>> ती 'जमाईबाबू' म्हणते.
'जमाईबाबू' असा शब्द आहे हिंदीत. Happy

ती राधा काय आत्याला आत्ती म्हणते का? मला ते 'हत्ती' असं ऐकू येतं आहे.

माझ्या आईचा व्यावहारिक प्रश्न: हात प्लास्टरमध्ये असलेल्या बायका शक्यतोवर गाऊन किंवा तत्सम कपडेच घालतात. इथे घरात दुसरे कोणी बाई माणूस नसतांना ही आत्या एकदम लग्नी साड्या कश्या काय नेसू शकते?

इथे घरात दुसरे कोणी बाई माणूस नसतांना ही आत्या एकदम लग्नी साड्या कश्या काय नेसू शकते?>> आणि थालिपीट कशी लावत असेल? हे उगीचच. बघून सोडून द्यावे कि नै.

होहो फ्रॅक्चर झालाय. प्रिमीयरला मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलाय तो हात. पण तेव्हा ती लग्नी साडी न नेसुन ड्रेस घालुन आलेली बै. Happy

ए प्लिज स्वप्निलच्या जागी उमेश कामत नक्को.. सही चाललाय तो. परवा त्याची कबुली तर अगदी मस्त पोचली. Happy पण एक वेगळं पात्र म्हणुन उका आला तर मात्र आवडेल.

एलदुगोसाठी एक मराठी विरहगीत रचले गेले आहे. काल संध्याकाळी ६:५५ ला झीवर याची माहिती दिली गेली. गीतकाराचे नाव लक्षात नाही. संगीत नीलेश मोहरीर गायक-गायिका: मंगेश बोरगावकर, वैशाली सामंत. राधा आणि घना 'तुझ्याविना' असा जप करताना दिसतील. मीलनाच्या वेळी हिंदी गाणी आणि विरहाग्नीत होरपळताना मराठी गाणी.

मीलनाच्या वेळी हिंदी गाणी आणि विरहाग्नीत होरपळताना मराठी गाणी. >>> Lol

जसं ठेच लागल्यावर आपण "आई ग्गं.." म्हणतो आणि समोर एखादं सुंदर दृष्य दिसलं की "वॉव" म्हणतो, तसंच Proud

मीलनाच्या वेळी हिंदी गाणी आणि विरहाग्नीत होरपळताना मराठी गाणी. >>> त्या हिंदी गाण्याला मायबोलीकरांनी घेतलेला आक्षेप पोहोचला की कॉय ? नाहीतर विरहाग्नीच्या मराठी गाण्याचा एवढा खटाटोप कशाला म्हणे ?आपली मराठी वर हे काही दिसत नाही. तसंच तो ' उका ' कोण ते पण नाही दिसलं.

मी म्हटलं नव्हतं की इथली चर्चा पाहून आता ते आपला मोर्चा मर्‍हाटी गाण्याकडे वळवतील म्हणून? Wink

टोक्स येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
अगदी ग!

मी मालिका नियमाने पहात नाही, पण हा धागा मात्र अगदी नित्यनेमाने वाचते.

आता उका हा अगदी शिस्तप्रिय, काटेकोर, स्वावलंबी एवंगुणविशिष्ठ असणार..
आणि मग रॉधाला साक्षात्कार होणार की ते वेडंगबाळं, लाडावलेलं ध्यानच तिला आवडतय... >>>

हा फार ट्रॅडिशनल विचार झाला Wink किती मुळमुळीत गुळगुळीत रस्त्यावरुन जाईल कथा मग. मालिका जरा हटके होवु दे की. उका भेटल्यावर मुक्ताचा शोध संपेल आणि तिला गमावल्यावर मग स्वप्नील शहाणा मुलगा होइल असं दाखवलं तर? Wink

राधाला घना आवडतोयच, ती ते कबूलहि करतेय, घर सोडताना किती काकू करत होती Happy घनाला कळायला हवं हे Wink उका आल्यावर कदाचित त्याला कळेल .

Proud

काही प्रस्तावित शेवट

(१)
घना हा प्रभातच्या जिममधे जाऊन बारीक होण्याची प्रतिज्ञा करतो
तिथे जिम मधे प्रभातशी 'प्रेम' या विषयावर त्याला प्रवचन-कम-बोधपर भाषण ऐकायला मिळतं
येऊन तो राधाला तेच भाषण ऐकवतो आणि घरी घेऊन येतो.
अशा रीतीने कहाणी सुफळ संपूर्ण

(२)
घना हा प्रभातच्या जिममधे जाऊन बारीक होण्याची प्रतिज्ञा करतो
तिथे पुरुष-बायका अशी वेळेची विभागणी केलेली नसल्याने एक मुलगी भेटते
मग घना-तीमुलगी आणि राधा-उका अशा प्रकरणांत एक वर्ष सहज जाईल
मग ती मुलगी घनाचं आणि उका राधाचं हृदयाचे १७६० तुकडे करुन निघून जातात
घना आणि राधाला एकमेकांवरचं प्रेम लक्षात येतं
अ.री.क.सु.सं.

(३)
घना हा प्रभातच्या जिममधे जाऊन बारीक होण्याची प्रतिज्ञा करतो
तिथे पुरुष-बायका अशी वेळेची विभागणी केलेली नसल्याने एक मुलगी भेटते
मग घना-तीमुलगी आणि राधा-उका अशा प्रकरणांत एक वर्ष सहज जाईल
मग एकमेकांना टाटा करुन नवीन जोडीदाराशी विवाहबद्ध होतात
मराठी मालिकांत क्रांती वगैरे.
अ.री.क.सु.सं.

@ मंदारः अशा तर्‍हेने वेगवेगळे शेवट आधीच सुचवणे हे बिचार्‍या मराठी सीरीयलांच्या ष्टोरी रायटरांच्या पोटावर पाय देणे आहे.... ( कोण रे तो माझी मराठी वाईट आहे म्हणतोय? ) Lol

Proud

Pages