Submitted by हर्षल वैद्य on 22 January, 2012 - 11:31
पैलतिरीच्या नीलदिव्यांनो
कुणास तुमच्या व्यथा सांगता
किंवा का मग कातरवेळी
अंतरगर्भी दडवू बघता
पैलतिरीच्या नीलदिव्यांनो
जलहलती प्रतिबिंबे तुमची
पृष्ठावरची खळबळ का हो
कथी स्पंदने तुमच्या मनिची
पैलतिरीच्या नीलदिव्यांनो
कशास हो एकाकी जळता
वाट पाहता कोणाची अन्
उत्तररात्री झुरून विझता
पैलतिरीच्या नीलदिव्यांनो
प्रकाश तुमचा कोणासाठी
घरटी परतू बघणाऱ्या का
सांजभारल्या पक्षिणिसाठी
पैलतिरीच्या नीलदिव्यांनो
पैलतिरावर दुनिया तुमची
चुकूनही कधि ऐलतिराच्या
मोजु नका प्रश्नांची उंची
पैलतिरीच्या नीलदिव्यांनो
एकदाच तुम्हि मजला सांगा
दिसतो का हो माझा साजण
पैलतिरीच्या नीलमरंगा
गुलमोहर:
शेअर करा
आवडली ! छान आहे!
आवडली !
छान आहे!
पैलतिरीच्या
पैलतिरीच्या नीलदिव्यांनो
एकदाच तुम्हि मजला सांगा
दिसतो का हो माझा साजण
पैलतिरीच्या नीलमरंगा>>>>मस्त.
आवडली.
"पैलतिरीच्या
"पैलतिरीच्या नीलदिव्यांनो
कशास हो एकाकी जळता
वाट पाहता कोणाची अन्
उत्तररात्री झुरून विझता" >>> हे आवडलं.
छान आहे
छान आहे
आवडली.
आवडली.
अप्रतिम.............
अप्रतिम.............
खूप छान, सुरेख. आवडली
खूप छान, सुरेख. आवडली
पैलतिरीचे निलदिवे..कल्पना छान
पैलतिरीचे निलदिवे..कल्पना छान आहे.
मस्त आहे कविता.
मस्त आहे कविता. आवडली.
>>>>पैलतिरीच्या नीलदिव्यांनो
पैलतिरावर दुनिया तुमची
चुकूनही कधि ऐलतिराच्या
मोजु नका प्रश्नांची उंची>>>> हे कडवं सगळ्यात छान जमलय.
सर्वांचे मनापासून आभार !!!
सर्वांचे मनापासून आभार !!!
अप्रतिम आहे. प्रत्येक कडवे
अप्रतिम आहे. प्रत्येक कडवे म्हणजे एक संसार आहे.
मस्त आहे कविता.
मस्त आहे कविता.
खूप सुंदर आहे.
खूप सुंदर आहे.