माझा एक गंमतीदार प्रवास

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

काही वर्षा पूर्वी खरे घड्लेले प्रवास वर्णन.....
मी आणि माझे नातेवाइक पुणे ते भिवंडी असे एकदा (माझी मावशी आजारी असल्याने तिला पहायला) निघालो होतो. परतीच्या प्रवासाच्या वेळी आम्ही ठाणे येथुन (६० रु भाडे) प्रायव्हेट बस सेवेत बसलो. आम्ही एकूण आठ लोके होतो.
आमची बस इतर लोंकाना भरत भरत काही वेळाने निघाली. काही वेळानंतर ही बस वाटेत बंद पडली. थोड्या प्रयत्ना नंतर गाडी सुरु झाली. थोड बरे वाट्ले असे म्हणताच अर्ध्या तासतच परत बंद पडली. या वेळेस चालक आणी त्याचा साथिदार बराच वेळ प्रयत्न करत होते. काही केल्या त्यांना परत चालु करायला जमेना. शेवटी त्यांनी आम्हाला आमचा मालक ठाण्यावरुन येइल आणि मगच पुढे काही करेल असे सांगितले. आम्ही त्याला दुसरी गाडी आहे का ते विचारले, त्यास ते म्हणाले की मालक येइल आणि दुरुस्त करेल.
या वेळेस आम्ही खोपोली च्या आधी आठ किलोमीटर वर होतो.काही लोक वाट पाहुन दुसर्‍या वाहनाने जाण्यास निघाले आणि गेले पण. आता गाडी जवळ १० ते १५ जणच राहिले. मी आणि माझा भाउ पुढाकार घेत त्यांना आमचे पैसे परत देण्यास सांगितले. पण ते द्यायला ते काही तयार नव्हते, कारण पैसे त्यांच्याकडे नव्हते आणि मालकाला न विचारता कसे देणार. शेवटी त्यांनी आमच्या मालकाला फोन करा असे सांगितले, मी त्या मालकाला फोन लावला आणि आमचे पैसे द्यायला सांगितले. यावर तो म्हणाला थोडा वेळ थांबा मी तिकडे येतो आणि पहातो. तो येणार कधी आणि गाडी सुरु करणार कधी आणि आम्ही घरी पोहचणार कधी.
जाम वैतागलो आणि इतर काही शिल्लक प्रवांशी लोंकाना सोबत घेत एक वेगळा निर्णय घेतला.तो असा की गाडीत असलेला व्ही सी आर टेप काढायचा आणी तो जवळच असलेल्या ढाब्यात न्यायचा आणि तो त्याच्याकडे ठेवायचा आणि त्याच्या बद्ल्यात पैसे घ्यायचे. तसे आम्ही ठरवलं आणि टेप घेत सरळ एका ढाब्यात गेलो. त्याला सगळी खरी परिस्थिती सांगितली आणि यांचा मालक आल्यावर तो पैसे देउन सोडवून घेइल असे सांगितले. एक ढाबे वाला तयार झाला नाही.
मग आम्ही शेजारी असलेल्या दुसर्‍या एका ढाब्या वाल्या कडे गेलो. या वेळेस आम्ही त्याला त्याचा पण फायदा होइल असे सांगितले. त्याला सांगितले की तु एका कागदावर हे सर्व लिहुन घे आणि त्यात रक्कम १८००/- रु दिली असे लिही पण आम्हांला तु १५००/- च दे. तसेच जेव्हा तो मालक ठाण्यावरुन येइल त्याच्या कडून १८००/- रु घेउन त्याचा व्ही सी आर परत कर. शेवटी यांस तो तयार झाला आणि आमच्या काही सह्या घेत त्याने आम्हांला पैसे दिले. पैसे लगेच घेत आम्ही आमच्या ८ लोंकाचा हिशोब करुन तेवढे काढुन घेतले आणि बाकीच्या लोंकाना त्यांचा हिशोब त्या चालकाकडुन घेण्यास सांगितले. पैसे मिळताच आम्ही ८ लोकांनी रिक्षा करत खोपोली गाठलें. त्यानंतर एसटी प्रवासाने पुण्यास पोहोचलो Happy

विषय: