शीर्षकगीत झलक: वैश्विक गीत सृजन (युगंधर)

Submitted by युगंधर on 19 January, 2012 - 23:08

नमस्कार लोक्स, मी युगंधर..मायबोली शीर्षक गीता बद्दल अगदी 'योगा'योगाने कळलं..अनेक दिवसात फुर्सतीत रोमायला मिळलं नव्हतं..यंदाचा माबो गणेशोत्सव ही नीट बघता ही आला नव्हता.इतक्यात अशाच एक सन्ध्याकाळी माबो वर शीर्षकगीताबद्दल वाचलं आणि लगेच चि. सृजन च्या सह्भागाबद्दल योग आणि रुनी ला ई-पत्र टाकलं. सृजन आणि भावनाला सांगीतल...आणि खरंतर विसरलोही होतो. योग कडुन सविस्तर ई-पत्र आल्यानन्तर मात्र wow वाटलं. एकूणच ही वैश्विक वीणेची कल्पना खूप आवडली. योग कडून आलेले चालीचे tracks ऐकल्यावर एकेकदा दोन्ही पट्ट्यांमध्ये शब्द म्हणून बघण्याचा प्रयोग केला. ह्म्म्म्म्...जमतंय तर. मध्येच एकदा आमच्या गायका ची गाडी 'डीरेल' झाली होती..मी नाही म्हणणार वगैरे..पण तेवढ्यात प्रत्यक्ष तालमीचा 'योग' आला. योग घरी आला, त्याच्या बरोबर जेव्हा गायला, तेव्हा अचानक जादूची कांडी फीरली आणि 'आमची' कळी खूलली. योग काका, त्याने दिलेली चाल, गाण्याच्या टीप्स वगैरेंवर आम्ही म्हणजे अगदी खूषच झालो होतो. आणि मग ध्वनीमुद्रणाची तारीख आणि वेळ ठरली, पत्त्ता मिळाला. मला सुट्टी घेणं जरा कठीण होतं, म्हणून भावना ऑफीस ला बुट्टी मारून सृजनला घेउन गेली आणि....
बघता बघता अनेक अंतरांना जोडणारी, स्वरा स्वरांना गुंफणारी अशी काही स्नेहशाल विणल्या गेली की 'क्या बात है'...

चाल तर भावली होती, गोडव्यामुळे आणि 'simplicity' मुळे. फर्स्ट कट ऐकल्यावर, एकन्दर सन्गीत संयोजनाचा दम (impact या अर्थी) आवडला..शब्दसूरान्चा मस्त मेळ जूळला आहे.

गाण्यातली ती लकेर "मायबोली......ssssss मायबोली.......ssssssss" आता खरंच साद घालते आहे.
सर्व गायकांचं विशेष कौतुक....

या वैश्विक गीत सृजनाच्या चमूत आमचा सृजनही आहे ये खयाल (बहोतही) अच्छा है !!!

अनेक धन्यवाद्..आता होउन जाउ दे लवकर (घाई करणारि बाहुली) :-)
IMG_1185.jpg
भावना (सृजन ची आई) स्टूडियो मध्ये त्याची तयारी पाहताना...

मायबोली शीर्षकगीताची झलक पहा:

झलक मधील गाय़कः

१. मायबोली आलापः भुंगा (मिलींद पाध्ये)
२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)
३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक

संपूर्ण श्रेयनामावली:
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिका ची मुलगी), वर्षा नायर, योग
कुवेतः जयावी- जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा, अनिलभाई

ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

. मध्येच एकदा आमच्या गायका ची गाडी 'डीरेल' झाली होती..मी नाही म्हणणार वगैरे..पण तेवढ्यात प्रत्यक्ष तालमीचा 'योग' आला. योग घरी आला, त्याच्या बरोबर जेव्हा गायला, तेव्हा अचानक जादूची कांडी फीरली आणि 'आमची' कळी खूलली. योग काका, त्याने दिलेली चाल, गाण्याच्या टीप्स वगैरेंवर आम्ही म्हणजे अगदी खूषच झालो होतो. आणि मग ध्वनीमुद्रणाची तारीख आणि वेळ ठरली, पत्त्ता मिळाला. मला सुट्टी घेणं जरा कठीण होतं, म्हणून भावना ऑफीस ला बुट्टी मारून सृजनला घेउन गेली आणि....
बघता बघता अनेक अंतरांना जोडणारी, स्वरा स्वरांना गुंफणारी अशी काही स्नेहशाल विणल्या गेली की 'क्या बात है'...>>>>>>>>>>>>

फार छान वर्णन..... सृजन आणी आपलेही अभिनंदन. Happy

सृजनचाही फोटो हवा होता आणि सृजनच्या आईकडूनही त्याच्या तयारीविषयी लिहून घ्यायला हवं होतं Happy

लहान मुलांकडून एखादी कला त्याच्या कलेकलेने घेऊन उतरवणं फार कलेचे काम आहे.

छान लिहिलंय. रेकॉर्डिंगच्यावेळी सृजन खूपच आत्मविश्वासाने गायला. एकदम बिनधास्त! लहान मुलांकडून मोठ्यांनी शिकण्यासारखी गोष्ट! Happy
त्या निमित्ताने सृजनच्या आईशी ओळख झाली! आणि आता तर त्या माबोकर झाल्या सुद्धा!

त्या निमित्ताने सृजनच्या आईशी ओळख झाली! आणि आता तर त्या माबोकर झाल्या सुद्धा! >>> हे या उपक्रमाचे बेस्ट साईडइफेक्टस् Happy

युगंधर,
मस्तच! तुमच्या सक्रीय पाठींब्यामूळेच सृजन ला ही संधी मिळाली हे निश्चीत!

सृजन च्या आईचे विचार व त्या बरोबर सृजन चे फोटोही लवकरच अपलोड होत आहेत..

वा मस्त खुसखुशीत लिहिलय Happy
>>> मध्येच एकदा आमच्या गायका ची गाडी 'डीरेल' झाली होती..मी नाही म्हणणार वगैरे..पण तेवढ्यात प्रत्यक्ष तालमीचा 'योग' आला. योग घरी आला, त्याच्या बरोबर जेव्हा गायला, तेव्हा अचानक जादूची कांडी फीरली आणि 'आमची' कळी खूलली.<<< खरच लहान मुलांकडून कोणतही काम करून घ्यायचं हे फार अवघड असतं. त्यातून मधल्या वयातल्या मुलांच्याकडून फारच अवघड ! तुम्हा दोघांचे आणि योगचे त्यासाठी खास अभिनंदन Happy

मस्त लिहिलंय !! प्रत्येकाच्या लिखाणातून इतकी एक्साईटमेंट दिसतेय ना........ !! मज्जा येतेय सगळ्यांचे अनुभव ऐकताना Happy

प्रतिसादांबद्द्ल अनेक धन्यवाद!
सृजन ने ही या सगळ्या प्रक्रियेची भरपूर मज्जा लुटली, विशेषतः ध्वनिमुद्रण, खुद्द संगीतकारा कडून चालीचे बारकावे समजून घेणे, ती सुरावट तीथेच का असा त्याच्यामागचा विचार वगैरे म्हणजे मस्त अनूभव होता. ध्वनिमुद्रण आणि त्या निमित्ताने माबो करांशी प्रत्यक्ष भेटीची संधी मी मिसली. पण आता या मनोगतांमुळे या एका प्रयत्नाचे अनेक कंगोरे, अनेक छटा वाचून छान वाटतं आहे...
एकूणात मायबोली ची वीण (की पीळ?) घट्ट आहे हे खरं Happy