Submitted by मी अभिजीत on 27 August, 2008 - 08:25
दिवस असे की ढोणी खेळत नाही, अन अनिल चालत नाही.
कांगारुंशी त्यांच्या देशी लढतो.
कधी केनिया बांगलादेशही नडतो.
या हरण्याचे कारण उमगत नाही.
या हरणे म्हणवत नाही.
कसोटी, वनडे, २०-२० चे तुकडे.
त्यावर नाचे बीसीसीआयचे घोडे.
या घोड्याला लगाम शोधीत आहे,
आयसीसीला गवसत नाही.
तेंडल्या अनफ़िट फ़ॉर्मात नाही युवी.
पाटा पीचवर झहीर भज्जी हेवी.
पराभवाला हजार कारणे देतो.
पण कबूल करवत नाही.
फ़ायनल मॅचला आता हसतो थोडे.
मिटून घेतो वस्तुस्थितीचे डोळे.
या खेळाला विजयाचाही आता.
मेघ पालवत नाही.
-- अभिजीत दाते
मूळ गीत - दिवस असे की कोणी माझा नाही
कवी - संदिप खरे
गुलमोहर:
शेअर करा
तेंडल्या
तेंडल्या अनफ़िट फ़ॉर्मात नाही युवी.
पाटा पीचवर झहीर भज्जी हेवी.
पराभवाला हजार कारणे देतो.
पण कबूल करवत नाही.
>> अगदी २१ मोदकांचा नैवेद्य तुला!
लय भारी अभिजीत! मजा आली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे!
>>>>फ़ायनल
>>>>फ़ायनल मॅचला आता हसतो थोडे.
मिटून घेतो वस्तुस्थितीचे डोळे.
या खेळाला विजयाचाही आता.
मेघ पालवत नाही.>> >>
अगदी अगदी... कटू सत्य,,,
आवडले
आवडले विडंबन
>> पराभवाला
>>
पराभवाला हजार कारणे देतो.
पण कबूल करवत नाही.
>>
एकदम आवडेश रे!....
अरे
अरे मस्त
झकास ..
व्वाह..
व्वाह.. क्या बात है!
खुश करून टाकलंस..
खन्गरी
खन्गरी यार....
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.
खुपच छान...
खुपच छान...