मु. पो दिल्ली : खारीबावली गटगचा वृत्तांत

Submitted by Kiran.. on 13 January, 2012 - 13:37

टीप : सदरचा वृत्तांत हा राजधानीत ज्या कामासाठी आलो ते न झाल्याने, वेळ जात नसल्याने आणि चांगलं काही करता येईल असं वाटत नसल्याने लिहीला आहे. या गटगच्या वृत्तांताच्या शक्याशक्यतेबद्दल कायम सकारात्मक विचार करणा-यांना तो वाचताना प्रॉब्लेम येऊ नये. यात ज्या सदस्यांचा उल्लेख केलेला आहे त्यांची अर्थातच परवानगी वगैरे ( तशी सवयच नसल्याने ) घेतलेली नाही. तरीही कुणाला आपला उल्लेख खटकल्यास जाहीर माफी ! प्रसंगी बाफ अप्रकाशित वगैरे..

गटग म्हटल्यावर लाल किल्ल्याजवळ तरी ठेवायचं. पंण लाल किल्ल्यासमोर खारीबावली सारख्या गजबजलेल्या ठिकाणी ? लोक कसं छान छान ठिकाणी गटग करतात. जावं कि नाही इथपासूनच सुरूवात होती पण या ना त्या कारणाने आधीच्या कुठल्याच गटगला गेलेलो नसल्यानं आता टाळू नये असं वाटत होतं. जो होगा देखा जायेगा.

मसाल्याचे वास नाकात शिरले तसं सायकल रिक्षावाला थांबला. उतरून आजूबाजूला पाहीलं तर सगळे बिहारी आणि भैय्ये पाठीवर सामानाची पोती वाहत होते आणि धक्के देत होते. रस्त्याच्या कडेला गटारं वाहत होती. त्या गटारांवरच टेबलं मांडून छोले भटुर्रेचे ठेले लागले होते. दोन्ही बाजूला त्रिकामटेकड्या माणसांचे मळे फुलले होते. संसदेला सुटी असल्याने संख्या कमी होती इतकेच.

गटगला यायचं तर एकमेकांचे नाव पत्ते, फोन नंबर घ्यायला हवे होते. कारण खारीबावलीच्या गर्दीत अनोळखी लोकांना कसं ओळखायचं हा प्रश्नच पडला होता. पण नवीनच आलेला आयडी कसा सराईतासारखा विशिष्ट लेखकाच्या पाखुमधे खोदकाम करतो त्याच जिद्दीने मी लोकांना शोधायचा निर्धार केला.

अंगावर हत्ती चालून यावेत तशा फिरणा-या पंजाबी बायकांच्या गर्दीत भर दुपारी अंधारात चाचपडल्यासारखी चाललेली एक तरूण मुलगी आकाशात चांदण्या मोजताना वगैरे दिसली. ही कन्यका दिल्लीची नसावी इतकं तर आमच्या चाणाक्ष नजरेनं लगेच हेरलं.

" संध्या का गं तू ? "

तिने एकदम दचकून आजूबाजूला पाहीलं. खरच कुणी बोललं कि भास !! ती माझ्याकडे आली तेव्हां हिने पण मला ओळखलं वाटतं असं वाटत असतानाच " अरे ये सफेद टीशर्ट और ट्राऊझर हटाओ यहांसे . किसका है ? " असा दम तिने आजूआजूच्या दोन तीन भय्यांना भरला.

त्यावर मला कुणीतरी उचलल्याची जाणीव झाली आणि मी ओरडलो. ती अविश्वासाने माझ्याकडे पाहत आली.

" इसमेसे आवाज आया ? "

मी पोटाशी घेतलेले पाय सरळ करत उभा राहीलो.

" ओह माय गॉड ! मला वाटलं हँगरलाच कपडे अडकवलेत "

अशा पद्धतीने एखाद्या मुलीशी ओळख व्हावी असं कधीही न वाटलेला मी कसंनुसं तोंड करत म्हणालो..

" संध्याच ना ?"

" बरोबर ! पण तू कसं काय ओळखलंस ? तू कोण ? आणि इथं कसा ? "

" एकच मिनिट... मी किरण ! काढ हजार रूपये पहिल्या प्रश्नाचे Wink "
दुसरा प्रश्न - मी इथं कसा- तर तू इथं जशी.. तसाच "
आणि तिसरा प्रश्न .. भर दुपारीही अंधारात चाचपडल्यासारखी चाललेलीस तेव्हाच ओळखलं. ही सांजसंध्या !"

" अरे व्वाव ! किरण. विश्वासच नाही बसत. पण खरंच रे तू अजिबातच ओळखू नाही आलास. रादर दिसलाच नाहीस... सॉरी हं मघाशी तुला हँगर म्हणाले ते "

पासष्ठ किलो बरून एखादा पंचेचाळीस किलो पर्यंत उतरला असेल तर तिला तरी काय दोष द्यायचा ? खरं तर त्यासाठीच विचार केला होता.. दूध तूप खाईन, जाडजूड होईन आणि मगच गटगला जाईन . पण हाय रे दैवा ! या गटगला कसा काय आलो मी ?

" कोण कोण आलंय ?"

" मी तरी कशी काय सांगणार ?"

" कुणाचे नंबर्स वगैरे ? "

" छे ! फक्त इथं जमायचं इतकंच लिहीलेलं बाफवर "

एका पाणी नसलेल्या हात पंपाला तोंड लावून एक जण बाहेर पडणा-या थेंबांना शोषून घेत होता.

" तू पातक ना रे ? "

त्यावर घशात तुषार अडकल्याने ठसका लागल्यासारखा तो आजूबाजूला पाहू लागला. उद्या वृत्तांत पोस्टताना पुन्हा फुटेज खायला नको म्हणून संध्येला खूण केली तसा तो खुलला. जाकिटातून स्मायली काढून देत तो संध्येशी बोलू लागला. त्याला हाका मारूनही तो माझ्याकडे बघेचना. मग शेवटी वैतागलो आणि आंतरजालीय शायर बेहिसाबांची एक गझल गुणगुणायला लागलो तसा तो माझ्याकडे आला.

" आपण बेहिसाब फॅन क्लबचे मेंबर का ? "

" हो रे ! मी किरण "

त्यावर तो फक्त हायला आणि लगेचच संध्येकडे वळाला. मी त्याचा नाद सोडला. ओळख करून दिली हेच चुकलं.. मी चुकचुकलो.

एक काळा ढग बाजूने गेल्यासारखा वाटला म्हणून पाहीलं तर अशुद्धलेखनाने भरलेला लेख असावा तसा पिंपल्सग्रस्त चेहरा असलेली एक व्यक्रणी दिसली. " हाय स्वति ! " असं म्हणताच तिनेही तोच तो हँगरयुक्त कटाक्ष टाकला.

ती एकटी नव्हती. एक छिन्नी आणि हातोडा घेऊन आलेली आणि कारची बॅटरी उतरल्यावर दिसणा-या नऊ आकाराची मुलगी तिच्याशी बोलत होती.

" हाय नन्ना ! " पुन्हा तेच ते स्क्रीप्टस्कार पार पडले.
हँगर हँगर ! मी माझ्या मनास बजावले.

एकदाची संध्याची दयार्द्र दृष्टी माझ्यावर पडली. मग तिला सगळ्यांच्या आगमनाची वार्ता दिल्यावर लगेचच मला वा-यावर सोडून त्या बायाबायांचे तिथेच एक शीघ्र महिलागटग पार पडले. चित्रविचित्र चित्कारांनी अवघी खारीबावली दुमदुमली आणि काही क्षण तिथले व्यवहार ठप्प झाले तरी त्या महिलांना भान नव्हतं. नऊ आकाराची मुलगी छिन्नी आणि हातोड्याने त्यांच्यातल्या नसलेल्या भिंती फोडत होती. उद्या आता सेपरेट महिला वृत्तांतात बोल्ड टायपात एक पंचलाईन असणार.. मी मनात म्हटलं.

महिला तास दोन तास गटगल्याने आता तरी पातक माझ्याकडे बघेल असं वाटत वाटत असताना एक सायकल रिक्षा तिथे येऊन थांबली आणि तिथं माझ्याहीपेक्षा हलक्या वजनाचा हँगर उतरला. या हँगरला एका पंचाबरोबरच एक थर्माकोलची लहानशी गदा अडकवलेली होती.

" मामा पैलवान ! तुम्ही ? "
मामाने मात्र मला लगेच ओळख दिली.
" कुठे असता आपण ? "
" मी पुणे २४ "
" फक्त पुणे पण चालो बे "

यावर एक स्मायली बाजूला येऊन पडली. पातक हसत होता. चलो, देरसे ही सही, दुरूस्त तो आये म्हणत मी ही हसलो. पण कंबख्त वख्तं माझ्याबरोबर नव्हता. पातकाच्या नजरेप्रमाणेच मला आरपार भेदून एक लांबडा स्कर्ट आणि टॉप घातलेली वय वर्षे १६ ते ४० मधे कुठेही बसणारी एक प्रसन्न नवयुवती गेली. ती इकडे तिकडे बघत "अय्या, कित्ती कित्ती छान ना .." इतकंच म्हणत होती.

" नानी ..नानी मी किरण "

माझे शब्द हवेतच विरले. नानी आणि पातक एकमेकांना भेटले. उद्या यावर एक लेख येईलच, मी मनात म्हटलं.

" चल किरण. आता ते तुझ्याकडे लक्ष देणार नाहीत आपण मस्त गप्पा टाकूयात " मामा
" चालेल "
" चीमा भेलाड बद्दल तुला काय वाटतं ? "
" कोण चीमा भेलाड? "
" अरे असं काय करतोस ? प्रकरण क्रमांक सात. "
" नाही बॉ, नाही आठवत "
" तुझा रिप्लाय आहे कि तिथं खडूसछाप पद्धतीचा "
"अच्छा ! मी बरेचदा न वाचताच देत असतो रिप्लाय "
"तसं वाटलं नाही "
" काय तसं वाटलं नाही ?"
" न वाचता दिलाय असं "
" ओह ! त्यात काय, अलिकडचे पलिकडचे दोन तीन रिप्लाय वाचायचे. त्यात लेखकाला धन्यवाद देणारे रिप्लाय इग्नोर करायचे. लुटुपुटीचे निषेधात्मक रिप्लाय पण इग्नोर करायचे आणि साधारण अंदाज घेत ठोकून द्यायचं. हा.कां.ना.का. "

त्यावर मापै नाराज झाले. एक लांबडी पोस्ट त्यांच्या चेह-यावर उमटून गेली.

" ये ग ग ग ग ग ग गलत है " त्यावर शोलेतल्या जयसारखे बेरकी भाव धारण करत मी विचारलं,
"संयोजक कुठे आहेत ? "
" कोण झक्की ? त्यांना कसं काय ओळखायचं पण राव "

इतक्यात महिला गटग आमच्याकडे वळलं.

" हाय किरण ! " गुणगुणल्यासारखी छिन्नी म्हणाली. छिन्नीच्या टोकाला जुन्या गझलांचं एकाच प्रकारचं रक्त लागलं होतं. मी काय समजायचं ते समजलो. "आज पुन्हा खोदकाम ? "
" जळू नकोस " " जळायचा प्रश्नच नाही गं.. लोकांना काय वाटेल ? उगाच बदनामी होईल ना तुझ्या बेहिसाबसाहेबांची ?"
" बदनामी ? ती कशी काय ? "
" अगं बाळे ! आता आताच तर जन्म झाला तुझा आणि लगेचच नेमक्या स्थळीच खोदकाम सुरू केल्यावर डाऊट कुणावर जाईल ?"
त्यावर खांदे उडवत छिन्नी उर्फ नन्ना मला काय त्याचं या थाटात पातक कडे वळाली.

स्वति मात्र उजव्या हाताच्या बोटांची हालचाल करत होती. छातीच्या समोर उजवा हात उपडा धरून पंजा पसरला होता. अंगठा आणि करंगळीजवळचं बोट मात्र किंचित मुडपून खालच्या दिशेने धरलं होतं आणि तबला वाजवल्या सारखा अंगठा आणि क.शे बोटाचं नृत्य चाललं होतं.

"मोरे बाई ! कंट्रोल सी कंट्रोल व्ही थांबवा आता. त्याने का पींपल्सचे डाग जाणारेत ? "
मागून एक आवाज आला.

गागागागा गागालगा गागालगा गालगागा गागागागा गाललगा गालगा गागाल
वृत्त : पातालभैरवी

पसंतराव !!!

मी आनंदाने त्या आयडीला मिठीच मारली. या उपायाने पसंतरावांना माझी दखल घ्यावीच लागली. हे आधीच का बरं सुचलं नाही ? नाही नाही... चिरडलं असतं राग बिग आला असता कुणाला तर !!
मोरे बाई फणका-याने तिथून निघाल्या. मी लगेच त्यांना शांत केलं. दोन चार जोक्स सांगितल्यावर त्या नॉर्मल झाल्या आणि गाणं म्हणू लागल्या " पंत चि मुतले निळे जांभळे "
" अहो, बोलताना तरी मुद्रणदोष करू नका. पंख चिमुकले निळे जांभळे असं आहे ना ते "
त्यावर एक झापाझापीचा आवाज आला. " किरण जुने फाजो मारायचं बंद कर ! "
अगंग ! काकू !!!!

ही बया मलाच का झापत असावी नेहमी ?
दिसायला तर ककीक मधली शर्मिला टागोरच ! खूष करायला स्तुती करावी का कि आणखी झापणास्त्रे येऊन पडतील इनबॉक्सात ? या ब्लॅक मॅजिकला जरा दूरच ठेवावं असा विचार करत होते इतक्यात..

" किरण, तू माझी पींपल्सवरून केलेली चेष्टा मला आवडलेली नाही. उद्याच मी रीतसर तक्रार करणार आहे याबाबतीत "
"अगं, पींपल्सवरून चेष्टा नाही केली. मला टिंब म्हणायचं होतं पण मराठीत योग्य तो शब्द आठवला नाही म्हणून पींपल्सची उपमा दिली. उपमा अलंकार गं, चिडू नकोस गं बाई ! हवं तर पाय धरतो "
" अंगाला हात लावायचा नाही "
अगंग ... या महिलांचे माझ्याबाबतीतच गैरसमज होत असल्याने आता त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं असा विचार करत होतो.

" विदिपा आहेत का "

मी गर्रकन वळालो. कोल्हापुरी वैरणीवर पोसलेली एक दणदणीत सबला पुढ्यात ठाकली. एव्हढ्यातच जमलेल्या सुमित्रांकडे पाहत तिने आपली ओळख करून द्यायच्या आतच मी विचारलं,
"ये सुमित्रे ! शलाका नाही आली ? "
"ती गझलच्या वर्गाला गेलीये "

पुन्हा एकदा म.गटग आणि पुन्हा एकदा गा पै चर्चेचा प्रस्ताव घेऊन आले. पण मी वाहत्या पानावर भांडणं सुरू झाल्यावर बदलतात तसा विषय बदलला.

आतापर्यंत अंधार पडू लागला होता. बायकांना गप्पांमुळं वेळेचं भान नव्हतं.

"संयोजकांना शोधायला हवं " मी.
"आपण इथं कशासाठी जमलोय पण ? " इतका वेळ लाल दिव्याची टोपी घालून हिंडणारे एक गृहस्थ प्रश्न विचारते झाले. ते एकदम महाराष्ट्राच्या पोलीस पाटलांसारखे दिसत होते
" आबासाहेब ? "
त्यावर गहिवरून येत त्यांनी प्रेमाने मिठी मारली.
" तुम्हीच बेहिसाब ना ? "
" छे छे मी किरण ! " त्यावर उदास होत आणि हात सोडवून घेत ते ही संयोजकांना शोधू लागले.

पातकाने आता लीड घेतला त्याचा लॅपटॉप काढून संबंधित बाफ त्याने उघडला. ऐन वेळेची सूचना बाफवरच टाकण्यात येणार होती.

खारीबावली गटग - झक्की

या रंगीबेरंगी पानाचं आम्ही पुन्हा वाचन केलं. तिथं बदलून असा शेरा दिसत होता.

ताजा कलम देण्यात आला होता

मी एक म्हातारा मनुष्य. मी जे बोलतो ते अनेकांना पटत नाही. तरीही मी बोलतच असतो. लोकांना वाटतं मी बोलूच नये तरी मी बोलतो. त्याला काही अर्थ आहे असं अनेकांना वाटत नाही. भारतातल्या लोकांना बरंच कळतं. मला तसं कळत नाही. गलिच्छ वस्त्या, ट्रॅफिक जाम, उघड्यावरचं खाणं, भिकारी या सगळ्यांवर भारतात चर्चा होतात. मी अमेरिकेत निघून आल्यामुळं मला यावर विचार करावा लागत नाही. पण इथं होत असलेल्या चर्चांमुळं उत्सुकता चाळवते. पुन्हा एकदा भारतात जावं असे विचार मनात येतात. म्हणूनच खारीबावली इथं गटगची कल्पना मी मांडली.
पण आता पुन्हा एकदा विचार करताना असं वाटलं कि मी तर येऊन जाऊन एक अप्रिय व्यक्ती. मी आयोजित केलेल्या गटगला कोण येणार ? ज्यांनी नावं रजिस्टर केलीत ते सगळेही कधीच कुठल्या गटगला न गेलेले दिसतात. त्यावरून ऐनवेळी कुणी येईल याचीच खात्री नसल्याने येण्याजाण्याचा खर्च तरी का करावा या निष्कर्षाप्रत मी आलो. त्याऐवजी इथंच आराम करावा, बाफ वाचावेत आणि आपल्याला कसं काही कळत नाही हे दाखवणा-या पोष्टी लिहाव्यात असा विचार केला. हे गटग रद्द केलं आहे हे सांगायची गरज नाही. तरीही खरंच कुणी चुकून आलं असेल तर मी मनापासून क्षमा मागतो.

- झक्की

ही पोस्ट वाचून सगळे सर्दच झाले.

" हायला ! आयोजकांचं नाव वाचून आधीच हे डोक्यात यायला हवं होतं. " पातक म्हणाला.
" चूक आपलीच आहे रे " मी त्याचं सांत्वन करत म्हणालो.
"आता जमलो आपण. काय करावं ?"
"काय करायचं. गटगच करायचं "

आता पातककडे सूत्रं होती. त्याने तिथंच एका सिनेमा हॉलच्या प्रांगणात सर्वांना जमा केलं.

" गटग करायचं म्हणजे काय रे ?" एक लाडीक आवाज आला. एक गोरीपान सुंदर (पक्षी चिकणी ) मुलगी तितक्याच लाडीकपणे विचारत होती.
सगळ्यांच्या नजरा तिच्याक्डेच वळल्या. महिलावर्गाने नापसंतीदर्शक नाकं उडवली तर उरलेले सर्व तिच्याभोवती गोळा झाले.
तिच्या हातात शॉपिंग मॉलमधे देतात तशी कागदी बॅग होती आणि तिच्यावर निवडक दहा असं लिहीलेलं होतं.

" चिकणी चमेली ! "

मनात आलं गटग गेलं चुलीत. तिने पुन्हा एकदा लाडीकपणे विचारलं
" सांगा ना गडे ! गटग म्हणजे काय ? "

त्यावर सगळेच एकमेकांकडे पाहू लागले. जमलेल्यांपैकी कुणालाच गटगचा अनुभव नव्हता. यावर पातकने सौदीला घेतलेला लॅपटॉप काढून गटगचे वृत्तांत वाचायला सुरूवात केली. ते सगळेच बेहिसाब यांनी लिहीलेले होते. त्यात त्यांनी एकट्यानेच केलेल्या गटगचा वृत्तांतही असल्याने त्याचा आम्हाला फारसा उपयोग झाला नाही.

" अरे गटग म्हणजे माहीत नाही होय ? गटग म्हणजे चरणे आणि फोटु काढणे " आख्खं गाव जागं होईल अशा खणखणीत आवाज निळ्या शर्टातले एक आडदांड व्यक्तिमत्व म्हणाले.

" खवीस ! वेलकम मित्रा !! "
" चला पराठेवाली गल्लीत गटग करू. मला खूप भूक लागली आहे "
" कुठल्याही कपड्यात आलात तरी भूक कंट्रोल होत नाही र्व तुम्हाला खवीसराव " सुमित्रा म्हणाली. त्यावर खवीसाने आधी पोटोबा या अर्थाची खूण केली. मग आम्ही सगळे पराठेवाली गल्ली कडे वळालो.

खरं तर सर्वांनाचा भूक लागली होती. पण पातक म्हणाला म्हणून आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाचं मनावर घेतलं. लॅपटॉपला माईक आणि स्पीकर्स जोडून त्याने एक स्टेज बनवलं. मग पातक आणि नानी यांनी सगली सूत्रं हाती घेतली. तिथंच कविता वाचनाचा आणि गायनाचा कार्यक्रम सुरू झाला. दोन तीन भैय्ये तिथं डोकावून गेले. आता मराठी भाषा ओळखू येत असल्याने दिल्लीवाले आमच्याकडे उत्सुकतेने पाहू लागले.

"अण्णाजी आनेवाले है ? "
मी कपाळाला हात लावला. कार्यक्रम मस्तच रंगला. सर्वात कमाल केली ती खवीसरावांनी. पहाडी आवाज आणि शास्त्रीय गायन असं काही रंगलं कि आमच्याबरोबर दिल्लीकरांनीही टाळ्या वाजवल्या. एक दोघांनी खवीसरावांचा नंबर मागून घेतला. पण त्यांनाच भूक सहन होत नसल्याने आता सां.का. गुंडाळनं आवश्यक होतं.

मग आम्ही पराठेवाले गल्लीकडे मोर्चा वळवला.

प्रचि :
काकूंनी चांगलाच हात मारलाय
2images.jpegdelhi_liveindia_a1.jpgimage-1-party2.jpgchotibahu200.jpgparatha plate.jpgparty.jpgparatha making day.jpg

आमच्यासाठी सरप्राईझ
10103914.cms_.jpeg

खवीस रावांमुळे आम्हाला पराठ्यांचा आस्वाद घेता आला. कधी नाही ते सर्वांसोबत खाल्ल्याने दोन घास मलाही जास्त गेले. खवीसने प्रेमाने आणखी एक पराठा ताटात टाकला तस मी नको नको म्हणालो. त्यावर कोल्हापुरी प्रेमाने खवीसराव म्हणाले
" किरण्या, असं चांगलं चुंगलं खाल्लं तर अंगाला लागेल"

आयडींमागचा प्रेमळपणा जाणवून डोळ्यात येणारं पाणी लपवत आणि जीभेवर रेंगाळणारी पराठ्याची चव घेऊन आम्ही तिथूअ बाहेर पडलो. संध्या आणि काकूंना बसस्टॉपवर सोडावं असा विचारच करत होतो इतक्यात पातक तिथं घुसला.

" किरण बाय रे ! मी सोडतो कारमधून दोघींना "

मनात चडफडत मी मागे वळलो तर चिकणी चमेली उभी.
" जाऊ दे त्यांना. आपण गटग चालूच ठेवू "
" म्हणजे ? "
" अरे ही बघ निवडक दहाची यादी. आपण चवीने आस्वाद घेऊ या यादीचा "
" ये ग ग ग ग ग ग ग गलत है " आता माझी पाळी होती .

खवीस आणि सुमित्रा सायकल रिक्षातून टाटा करून गेले.

" अरे बेहिसाब !"
" अय्या ! कुठेत "असं म्हणत चिकणी चमेली चित्कारली . ती इकडं तिकडं पाहत असतानाच मी तिथून सटकलो आणि गर्दीत दिसेनासा झालो.

खारीबावली गटग अशा रितीने अळीमिळी गुप चिळी थाटात संपन्न झालं.

तळटीप : काही आयडीजची नावं बदलावी असा विचार ऐनएळी मनात आल्याबद्दल कौशिच्या एका धाग्याचे आभार.
उपटीप : लेख आपल्या जबाबदारीवर वाचावा. हसू न आल्यास नाईलाज आहे.
उपौपटीप : प्रतिक्रियांवरून देण्यात येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सानी - Rofl

सानी - हाय्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य

पुन्हा एकदा कुणी दुखावले गेले असल्यास मनापासून माफी. ज्यांनी ज्यांनी खिलाडूवृत्तीने घेतलं त्या सर्वांचे आभार आणि सलाम Happy

( यातले सगळ्याच आयडीजचं बिल मात्र माझ्या नावावर फाडू नये ही नम्र विनंती. जाहीर खुलासा अंगलट आल्यास मै तेरे बच्चे की मां बननेवाली हूं सारखी अवस्था होईल माझी Happy )

<<दोन चार जोक्स सांगितल्यावर त्या नॉर्मल झाल्या आणि गाणं म्हणू लागल्या " पंत चि मुतले निळे जांभळे ">> Lol Lol
काल्पनिक गटगचं लिखाण इतकं भारी तर खर्‍या गटगचं लिखाण लोकांची हसुन हसुन मुरकुंडी होईल. Happy
ते स्मायल्या येवुन पडणं, सफेद टीशर्ट और ट्राऊझर, आयडींची वर्णनं अन प्रसंगानुरुप फोटो खुप छान Happy

काल चुकून खाजगी जागा मधून प्रचि उडवल्याने लेखातले प्रचि दिसेनासे झाले होते. प्रचिंसहीत पुन्हा एकदा लोड केलाय. Happy

मंडळ आभारी आहे.

हल्ली बरेचसे लोक सक्रीय नसल्याने नव्या लोकांना संदर्भ न लागण्याची शक्यता आहे. त्यांनी शंकानिरसनासाठी संपर्क साधावा ही विनंती Proud

स्वगत : या गटगचा वृ ब-याच जणांनी टाळला. त्यांच्या किंवा त्यांच्या मित्रमंडळींच्या विशिष्ट अडचणींमुळे त्यांना नोंद घेणे जमले नसावे बहुधा ;). आम्ही मात्र स्वतःच स्वतःची टर उडवत असल्याने इतरांना फारसं काम शिल्लक राहत नाही, उलटपक्षी काही ड्युआयची नावं चुकून इथं आली असतील तर त्यांचे मूळ कोण हे आजही माहीत नसल्याने कुणी दुखावले गेले असल्यास ती कल्पना नाहीच. आणि अशा दुखावल्या गेलेल्यांचा विचार करायची पद्धत आमच्याकडे नाही. चोर के दाढी मे तिनका.. ( ही म्हण का आठवली असावी? विचारात पडलेला बाहुला ).

अगदी खुसखुशीत लिहिलं आहे, अफाट कल्पनाशक्तीचा मार्मिक अविष्कार..
काही पंच अगदी सिक्सर आहेत Proud
टीपः मला काही नावं समजली तर काही डोक्यावरुन गेली. Happy

Pages