विवाहानतंर आडनाव बदलण्याविषयी..

Submitted by श्रद्धा१३८ on 13 January, 2012 - 04:46

मला विवाहानतंर आडनाव बदलण्याच्या कायद्याविषयी माहिती हवी आहे. माझी आडनाव बदलण्याची ईच्छा नाहीये. माझा पासपोर्ट/ ड्राईविंग लायसंस ई. ओऴखपत्रे माहेरच्या आडनावाने आहेत.
लग्नानंतर स्त्रीने आडनाव नाही बदलले, तर काही कायदेशीर अडचणी येउ शकतात का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या पत्नीच्या LIC Policy मध्ये तिचं सासरच नाव आहे. पण तिच अकाऊंट SBI मध्ये आहे आणि ते माहेरच्या नावावर आहे. आता LIC बेनिफिट अमाऊंट डायरेक्ट अकाऊंट मध्ये ट्रान्सफर करते. तर मग मला तिचा माहेरच्या नावावरचा अकाऊंट नंबर LIC ला देता येइल का?

आबासाहेब, आधीच्या पोस्ट्सवर जे बहुतेकांनी परत परत लिहिलंय ते लक्षात घ्या/आचरणात आणा... सर्व सरकारी कागदपत्र, विमा, मेडिक्लेम, पासपोर्ट, पॅनकार्ड, लायसन्स, रेशनकार्ड, आधार, बॅन्केची सर्व खाती, नोकरीचे ठिकाण या सगळ्या ठिकाणी एकच नाव असणे अत्यावश्यक आहे (सासर-माहेर हा वैयक्तिक चॉईस). जर नसेल तर ते योग्य ती कायदेशीर बाबींची पूर्तता करून बदलून घेणे हे जरूरीचे आहे.

आबासाहेब., नाही देता येणार. LIC कडे तुम्ही जेव्हा NEFT साठी नोंदणी कराल तेव्हा एक फॉर्म भरायचा असतो, त्यात बँक खात्याचे तपशील भरायचे असतात. त्यात पॉलिसीवरील नाव बँकखात्याच्या नावाशी न जुळल्याने LIC तुमच्याकडे पॉलिसीनावाच्या बँकखात्याच्या तपशीलांची मागणी करेल.

आबासाहेब, तुम्ही नाव बदलण्याचा खटाटोप केला नसेल तर आधी एल आय सी मध्ये जाऊन चौकशी करा, मला वाटतं, तुम्ही म्हणता तसं करायला काही त्रास नसावा, कारण तुम्ही एल आय सी मध्ये मॅरेज सर्टिफीकेट देऊ शकता.

मीसुद्धा लग्नानंतर आडनाव नाही बदललं. मला स्वतःला नीधप म्हणते तसे स्वतःचीच पद्धत वापरणारे भेटले होते. त्यांना त्याच भाषेत - माझं नाव काय असावं ते मी ठरवेन, तुम्ही तुमच्या पद्धती वापरायची गरज नाही असे सांगावे लागले. शिवाय एकांला तर मला असेही विचारावे लागले की मला तुम्ही कायदा दाखवा, कोणत्या कायद्यात लिहिलं आहे आडनाव बदललं पाहिजे? असो. आता अनेकांना सवय झाली आहे.

आद्या - रेशन्कार्डात सर्वसाधारण्पणे नाव असतं आडनाव नसतं. त्यामुळे फारसा प्रश्न येत नाही.

माझ्या माहितीप्रमाणे लग्नानंतर नवरा / बायकोचे नाव पासपोर्ट मध्ये टाकणे कम्पलसरी आहे. आडनाव काहीही असले तरी. पासपोर्ट्वर नाव टाकताना मॅरेज सर्टिफिकेट दाखवावे लागते नाव काहीही असो. वकिलाचा सल्ला घ्यावा. कारण पासपोर्टात नाव टाकले नसेल तर आणि लग्नसंबंधात काही विघ्न निर्माण झाले तर तुमच्यावर असा आरोप केला जाऊ शकतो की इन्टेन्शनच चुकीचे होते. तेव्हा सांभाळून..

त्यांना त्याच भाषेत - माझं नाव काय असावं ते मी ठरवेन, तुम्ही तुमच्या पद्धती वापरायची गरज नाही असे सांगावे लागले. शिवाय एकांला तर मला असेही विचारावे लागले की मला तुम्ही कायदा दाखवा, कोणत्या कायद्यात लिहिलं आहे आडनाव बदललं पाहिजे? >>> Happy आमच्या ओळखीत एका बाईनी डिवोर्स नंतर पुन्हा माहेरचे नाव लावले नाही, फक्त नवऱ्याच नाव कायद्याने सगळीकडे (प्रोपेर्ती इ) कमी केल. आता त्यांचे पुन्हा लग्न झाले तरी आधीचे आडनाव (पहिल्या नवऱ्याच) वापरतात. त्यांच्या मते इतर अनेक कामे आहेत अशा गोष्टीमागे रिटायर होईन तेव्हा वेळ वाया घालवेन. नवा नवरा समंजस असावा.

सिमंतिनी - ग्रेट आहेत त्या आणि त्यांचे पती देखील. खरच सारख सारख नाव बदला खूप त्रास्दायक प्रक्रिया आहे.

प्रतिसाद वाचून एक प्रश्न पडला

मुलांनी (फक्त) आई चे नांव व आडनाव कागदोपत्री लावण्या संदर्भात काही कायदा आहे का?
PAN card संदर्भात बातमी वाचली होती. पण इतरत्र (शाला महाविद्यालय पासपोर्ट इ.) वापरायचे असेल तर काही कायदेशीर अडचणी येऊ शकतात का?

Pages