विवाहानतंर आडनाव बदलण्याविषयी..

Submitted by श्रद्धा१३८ on 13 January, 2012 - 04:46

मला विवाहानतंर आडनाव बदलण्याच्या कायद्याविषयी माहिती हवी आहे. माझी आडनाव बदलण्याची ईच्छा नाहीये. माझा पासपोर्ट/ ड्राईविंग लायसंस ई. ओऴखपत्रे माहेरच्या आडनावाने आहेत.
लग्नानंतर स्त्रीने आडनाव नाही बदलले, तर काही कायदेशीर अडचणी येउ शकतात का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही अडचणी येत नाहीत.. नवर्‍याचा जिथे उल्लेख येईल, तिथे मॅरेज सर्टिफिकेट दाखवा. स्त्रीमुक्तीचा विजय असो.. Happy

अजिबात येत नाहीत . माझ्या मावशीच्या लग्नाला ४६ वर्षे झालीत , त्या काळात सुद्धा तिने आडनाव बदलले नव्हते. मावशी व तिचे यजमान दोघे राज्य सरकारच्या नोकरीत होते तरी कुठेही अडचण आली नाही.
लोकांच्या कटकटी, सल्ले इत्यादी सहन करण्याची तयारी असू द्या .

मीही बदलले नाहीये. मला प्रवासात, घरं घेणे / विकणे; गाडी घेणे विकणे, त्यासाठीचे कर्ज , मुलांची बर्थ सर्टिफिकिटे, पासपोर्ट / व्हिसा , कशातही कायदेशीर अडचणी आल्या नाहीत.

मेधा +१
मीही आडनाव बदललं नाहीये. अनेक वेळा व्यवहारात समोरचे लोक/ संबंधित कर्मचारी स्वतःच नाव बदलून लिहितात. तिथे डोकं थंड ठेवून पण ठामपणे प्रत्येक वेळेला कायदा दाखवावा लागतो एवढंच लक्षात ठेव.. Happy

अहो हल्ली तर प्रायमरी ब्रेड विनर आई असेल तर वडिलांच्या ऐवजी आईचं नाव लावण्याची पण परवानगी आहे.
आणि नाव न बदलणे यात कायदेशीर काहीच अडचण नाही.

मंदार, आईचं नाव लावण्यासाठी तिने प्रायमरी ब्रेडविनर असण्याची आवश्यकता असते का खरंच? मला माहीत नाही म्हणून विचारते आहे.

स्वाती, तसं वाचलं होतं एका वृत्तपत्रात की तसा कायदा आहे. पडताळ्यासाठी प्रत्यक्ष त्या कायद्याचे दस्तैवजच बघावे लागतील.

पण या दोन्ही गोष्टींसाठी कायदेशीर अडचणी काहीच नाहीत हे नक्की.

माझ्या आईने लग्नानंतर नाव / आडनाव बदललेले नाही, ती सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहे. काहीही कायदेशीर प्रॉब्लेम्स येत नाहीत.

तसंही दक्षिण भारतात आडनाव नसतच त्यामुळे लग्नानंतर आडनाव बदलणं ही कायदेशीर सक्ती नाही.

मी पण सुरवातीला सासर माहेरचे दोन्ही आडनाव लावत होते. तेह्वा काही काही बँकांनी आम्ही अशा दुहेरी आडनावाने खाते उघडत नाही असे सांगितले. पण एका बँकेनी मात्र मला तशी परवानगी दिली . त्या एकाच बँकेत माझे दुहेरी आडनावाने खाते आहे. काही वर्षांपूर्वी वर्तमान पत्रात मी दुहेरी आडनावाने लेखन केले होते. वर्तमानपत्र कडून मला त्याच नावाने चेक मिळाला त्यामुळे त्या खात्यात भरणे मला सोप्पे गेले .
थोडक्यात तुम्ही कसेही नाव घेतलेत तरी कायदेशीर अडचणी येण्याचे कारण नाही Happy

चांगली माहिती मिळते आहे.
आजकाल बरीच कागपत्रे लग्नाआधीच्या नावावर असतात म्हणून माझ्या बर्‍याच मैत्रिणींनीही नावे बदलली नाहीत. त्यांना काहीही प्रश्न आले नाहीत असे म्हणाल्या.

कायदेशीर काहीच नाही. फक्त Marriage Certificate सोबत ठेवावे लागते. एक करा, कोठेच नवर्‍याचे अडनाव लावु नका. बरेच हाच गोंधळ करुन ठेवतात कोठे जुने नाव कोठे नविन नाव व मग ईतरांना दोष देत सुटतात. बाकी मूलांचे काय? ते कोणते नाव घेतील? तुम्ही middle name कोणते ठेवाल? तुमची मुले Middle name कोणाचे घेतील? Personally I like single Family name for entire family. But it is your choice. जमाना बदल रहा है ! You will not be able to say we are XYZ family.

अवधूत, प्रत्येक वेळी मॅरेज सर्टिफिकेट जवळ बाळगण्याची गरज पडत नाही. लग्नानंतर केलेल्या विमा/ मेडिक्लेम अशा कुठल्याही गोष्टीसाठी मला एकदाही ते दाखवायची गरज पडली नाही. नवर्‍याचे नाव काय आहे असा स्पेसिफिक प्रश्न असेल तरच तिथे लिहावे लागते. आणि मिडल नेम सगळ्या भारतीय प्रदेशांमधे वापरले जातेच असं नाही. ते मिडल नेम नवर्‍याचे अथवा वडलांचे असते असंही नाही (उदा: उत्तर भारतात..). काही ठिकाणी आडनाव वापरलं जात नाही. तेव्हा या सगळ्या तर्‍हा चालतील एवढा कायदा लवचिक आहेच.

कायदेशीर अडचणी मला तरी कधी आल्या नाहीत अजूनपर्यंत. लोकांनीही कधी टोकल्याचं आठवत नाही. पण आश्चर्य म्हणजे बर्‍याच हॉटेल्समध्ये (विशेषतः स्टार हॉटेल्समध्ये) नवरा-बायकोचं आडनाव सेम नसेल तर मॅरेज सर्टिफिकेट मागतात अन ते नसेल तर रुम द्यायला कटकट करतात. (शेवटी देतातच, पैसे कोण घालवेल? पण सत्रा प्रश्नं विचारतात.) याशिवाय काही त्रास नाही.
खरं म्हणजे एकाच आडनावाचे स्त्री-पुरुष एकमेकांचे नक्की कोण आहेत, हे त्यांना कसं कळतं हा मी अनेकदा विचारलेला प्रश्न आहे. त्याला गुळमुळीत उत्तरं मिळतात. Sad

१. लोकांच्या कटकटी, सल्ले इत्यादी सहन करण्याची तयारी नसली तरी ते दु:ख इथे मायबोलीवर येवून लेखाच्या रूपाने मांडा/पाडा(लेख पाडा). Happy
२. समोरचा माणूस बघून एक उत्तर तयार ठेवा.. नाहीतर मायबोली आहेच लेख पाडायला की कशी इतर लोकं (प्रश्ण विचारणारी) बुरसटलेली आहेत म्हणून. Wink

बाकी कायदेशीर अडचणी बाबतीत चिंता नसावी जर तुम्ही इथे पर॑देशात( ठळकपणे अमेरीकेत असलात तर) हा इकडचा अनुभव आहे. बाकी भारतातले माहीत नाही.

लग्न झालं तर दोघांना पार्सपोर्ट बदलावा लागतो... SPOUSE चे नाव अ‍ॅड करायला... जर Dependent म्हणून परदेशवारी करायची असेल तर...

अजून काही बेसिक प्रॉब्लेम्स कधी कधी मुलाच्या शाळेत (pickup)/ डॉक्टरकडे (appointment) येऊ शकतो..

लग्नानंतर स्त्रीने आडनाव बदलले नाही तर काही कायदेशिर अडचणी आल्याचे ऐकिवात नाही, पण त्याचे काय काय फायदे/ सहजता 'त्या' स्त्रीच्या कुटूंबात येते ते माहीत नाही, कुणीतरी त्यावर पण प्रकाश टाकावा.

राजू७६, लग्नं झाल्यावर दोघांना पासपोर्ट बदलावा लागत नाही. आवश्यकता वाटली तर पासपोर्ट मधे जोडीदाराचं नाव टाकण्याची जागा असते. तिथे दोघांचं आडनाव सारखंच पाहीजे अशी अट नाही. माझ्या माहीतीत अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्यांनी लग्नानंतर आपलं नाव बदललेलं नाही. पासपोर्टही तेच ठेवलेले आहेत. फक्त सगळीकडे मॅरेज सर्टीफीकीट लागते. मॅरेज सर्टीफीकीट असेल तर काहीच अडचण येत नाही. अगदी तुम्ही दुसर्या देशाचे पासपोर्ट जरी घेतलेत तरी नाव न बदलण्याने किंवा सारखी आडनावं नसल्याने काहीही प्रश्न उद्भवत नाही.

आता लग्नानंतर मुलींनी नावं बदलली नाहीत तरी होणार्या मुलांनी नक्की कोणतं नाव लावावं या विषयी संभ्रम निर्माण होऊ शकतो.
अवांतरः माझ्या माहीतीत एक आंतर्धर्मिय विवाह केलेलं जोडपं. नवरा मुस्लीम तर बायको हिंदू ब्राह्मण (दाक्षिणात्य). दोघेही चांगले शिकलेले. त्यांना दोन मुलं. आता दोघांनीही आपापले धर्म बदललेले नाहीत. घरात दोन्ही संस्कृती आहेत. पण मुलांचे धर्म लिहीतांना फॉर्म मधे मानवता (ह्युमॅनीटी) हा धर्म लिहीतात. त्या बाईंनी स्वतःचे पहिले नाव तेच ठेवले आहे पण आडनाव बदलले आहे.

नाव बदलण्याच्या कायद्याविषयी माहिती हवी आहे.माझ्या मुलाचे नाव जनमाच्या दाखल्यावर प्रथमेश व रेशन कार्डावर यश असे वेगळे झाले आहे.तर मला जन्मच्या दाखल्यावर यश असे करायचे आहे.

माझ्या मते मच्छिंद्र यांना मुलाचे नाव बदलल्याचे आवेदन(अ‍ॅप्लिकेशन) महाराष्ट्र शासनाच्या प्रिंटिंग प्रेसकडे (चर्नीरोड येथे) करायला लागेल. फॉर्म/अ‍ॅफिडेव्हिटचा नमुना तिथेच मिळावा. नाव बदलल्याचे महाराष्ट्र शासनाच्या गॅझेट(राजपत्र?)मध्ये प्रसिद्ध करून घ्यावे लागेल.

सगळ्यांचं फॅमिली नेम एक नसेल तर पुढे काय प्रश्न येतात ? जरी कायदेशीरप्रश्न नसले तरी..........

आईचे फक्त आडनाव वेगळे बाकी बाबा, आजी आजोबा यांचे आडनाव सारखे .....

मुलाचे आडनाव आईचे किंवा बाबांचे.... बरं ......मुलाचं आडनाव आईच्या माहेरचं असेल तर त्याचं मधलं नाव कुणाचं?

स्त्रीने लग्नानंतर तिचं आडनाव बदलू नये असं खरंच वाटतं ..........पण मुलांच्या नावाचे प्रश्न कसे सोडवले जातात?

बरं माहेरचं आडनाव तरी तिच्या आईचं नाहीच ....ते असतं तिच्या वडलांचं.......पुरुष प्रधान परंपरा अशीच चालू राहणार का?.

अवनी,
भारताच्या अनेक भागांत, धर्मांत इ. नांव वेगवेगळ्या प्रकारे लिहितात. सी. रामचंद्र हे रामचंद्र चितळकर होते, इत्यादी. नांव काय लिहिलेत त्याने फरक पडत नाही.
पण वारसाहक्क इ. साठी आवश्यक ती मॅरेज सर्टिफिकेट इ. कागदपत्रे गोळा करून ठेवणे महत्वाचे.

mansmi18 व भरत मयेकर प्रतिसादबद्दल मनापासुन आभार.. स्मित

दक्षिणेत अनेक ठिकाणी (जास्त करून तमिळनाडू) आडनाव ही पद्धत दिसत नाही.

नाव + वडिलांचे नाव उदा. सतिश रामचंद्रन
नाव + नवर्‍याचे नाव उदा. पार्वती सतिश

हाँ आता दोन्ही केसेसमधे पुरूषाचे नाव शेवटी लिहिण्याची पद्धत मात्र आहे त्याला अपवाद अजुन तरी ऐकण्यात नाही.
बहुतेक पुर्वी महाराष्ट्रात देखील अशी नावे प्रसिद्ध होती. उदा. नारो अप्पाजी, त्रिंबक शंकर, इ. पण ती एवढी मजबुतपणे वापरली जात नसावी.

पुण्यात पुर्वी स.प.महाविद्यालयात एक प्राध्यापक होते ते आई आणि वडिलांचे नाव लावत असत.

भारताच्या अनेक भागांत, धर्मांत इ. नांव वेगवेगळ्या प्रकारे लिहितात. सी. रामचंद्र हे रामचंद्र चितळकर होते, इत्यादी>>

ओ साहेब.......त्यांनी सिनेमासाठी ते नाव घेतले होते....त्यात धर्माचा किन्वा देशाच्या भागांचा काहीही संबंध नाही..............अक्षयकुमार आणि अजय देवगण ही सुद्धा खरी नावे नव्हेत. जरा अभ्यास वाढवा हो...

दक्षिणेत अनेक ठिकाणी (जास्त करून तमिळनाडू) आडनाव ही पद्धत दिसत नाही.><< इथे नावापूर्वी गावचे नाव लावले जाते. लग्नानंतरदेखील नवर्‍याचे नाव लिहिण्यापेक्षा मेडन नेम चालू ठेवले जाते. केरळामधे मातृसत्ताक पद्धत असल्याने (नायर) तिथे मुले आईचे नाव लावतात. मंगलोरसाईडला देवाडिगा वैगरे समाजामधे संपत्तीचा वारसदार मुलीला मानले जाते. तिथेदेखील मुले आईचेच नाव लावतात.

पण नंदिनी माझ्या बरोबर काम करणार्‍या तमिळ लोकांना पाहिले तर मी वर दिलेल्या पद्धतीने नाव लावत असल्याचे दिसले. गावाचे नाव नाही.
कदाचित कम्युनिटीज आणि विभागा नुसार वेगळ्या पद्धती असतील का ?

ते नावापूर्वी इनिशियल्स लावतात का? उदा, एम नंदिनी रविंद्र असे? एम म्हणजे मूळ गाव, त्याचे ते इनिशियल्स लावतात. नंतर गिव्हन नेम, मिडल नेम अथ्वा वडलांचे नाव. नवर्‍याचे नाव लावणे "एक पद्धत" म्हणून फार कमी आहे असे मला नुकतेच समजले आहे. Happy कम्युनिटीप्रकार यामधे अर्थात बदल होतोच. शिवाय इथे लग्नानंतर मुलीचे फर्स्टनेम बदलण्याची मात्र पद्धत नाहीच आहे.

पुण्यात पुर्वी स.प.महाविद्यालयात एक प्राध्यापक होते ते आई आणि वडिलांचे नाव लावत असत. >>
विनय आर. आर. => विनय रमा रघुनाथ (रसायनशास्त्र शिकवत होते आणि कदाचित अजुन शिकवत असतील.)

मनस्विता, विनय र.र. निवृत्त झाले, गेल्यावर्षी.
त्यांच्या पत्नी देखील सुनीती सु. र. असं नाव लावतात, आता त्यांच्या मुलींनीही त्यांचा वारसा पुढे चालवला आहे. Happy

माझ्या पासपोर्टवर माझे लग्नापूर्वीचे नाव आहे पण रेशनकार्डावर लग्नानंतरचे आड-नाव! तर मला इतर कागदपत्रांवर लग्नानंतरचे नाव लावण्यासाठी ते गॅझेटमध्ये नोंदणीकृत करून घेणे आवश्यक आहे का? की सगळीकडे मॅरेज सर्टीफिकेटने काम भागेल?

नंदिनी मी वर जे उदाहरण दिले आहे तसेच गावाच्या नावाचे इनिशिअल नाही.

मनस्विता, येस मी विनय सरांबद्दलच लिहिले होते Happy

कधीही दोन वेगळ्या नावांनी कागदपत्रे असू नयेत.
तुम्हाला जे नाव नकोय त्या नावाने असलेले ओळखपत्र/ नोंदणीपत्र रितसर मॅरेज सर्टिफिकेट आणि बाकीची गरजेची डॉक्युमेंटस, देऊन नवीन नावाने लवकरात लवकर करून घ्या.

मी नताशा ,

डॉ. कलाम यांच्या आत्मचरित्रात (अग्नीपंख) दिले आहे.अबुल ---- जलालुद्दीन अब्दुल कलाम! पणजोबा, आजोबा,

वडील आणि मुलगा! मी नाव विसरले.

मुस्लीम लोकांमधे बरीच इनिशियल्स लावतात>>> मी एकाला विचारले तेव्हा वेगळेच कळले की < नावासोबत

विशेषण असते. जसे महंमद हनीफ .त्यात महंमद हे नाव हनीफ हे विशेषण !

मी लाग्नानंतर आडनाव बदलले नाहीये. माहेरचे आडनाव लावते. Mediclaim policy, विमा policy इत्यादि साठी Prefix (Mrs./ MS/ Smt) काय लावावे? Mrs. किंवा Miss तर लावता येणार नाही (माहेरचे आडनाव लावत असल्यामुळे ). मी MS असे लावते हे योग्य आहे ना? भविष्यात पुढे काही कायदेशीर अडचण येणार नाही ना?

प्रीफिक्स हे कंपलसरी नसते. असेल तर श्रीमती वा एम एस लावावे.
ते सर्व कागदपत्रांवर चालते. तुमच्या विवाहित असण्यानसण्याचा, नवरा जिवंत असण्यानसण्याचा या प्रीफिक्सशी काहीही संबंध नसतो.

>>> तुमच्या विवाहित असण्यानसण्याचा, नवरा जिवंत असण्यानसण्याचा या प्रीफिक्सशी काहीही संबंध नसतो. <<<< शक्य आहे.
पण मग एकीकडे मेल्/फिमेल स्वतंत्र विचारुन घेतात म्हणजे जेन्डरचाही संबंध नाही, तू वर म्हणलेस तसाही सम्बन्ध नाही, तर मग प्रेफिक्स असतेच कशाला? Happy

तर मग प्रेफिक्स असतेच कशाला?>>> गूड क्वेश्चन. Happy खरंच त्या प्रेफिक्सचा आता काय उपयोग राहिलाय?

आडनाव बदला किंवा बदलू नका.. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा.. सगळी कडे एकच नाव वापरा... त्यानी सर्व प्रकारचे घोटाळे टळतील.. आणि लग्न झालेले आहे हे दाखविण्यासाठी मॅरेज सर्टीफिकेट जवळ बाळगा...

नी+१
मी-आद्या, मीही नाव बदललेलं नाहीये. सगळीकडे Ms असंच लावते, जर प्रेफिक्सची गरज असेल तर. पॅन, पासपोर्ट, व्होटरआयडीकार्ड, मेडिक्लेम, विमा इथे कधीही कुठेही प्रेफिक्स लावायला लागलेलं नाही. कसलीही कायदेशीर अडचण येत नाही.
मात्र सगळीकडे एकच नाव आहे ना, त्याचं स्पेलिंग बरोबर आहे ना ते आवर्जून बघून घेणे. टेबलापलिकडच्या माणसांना बरेच वेळा अकारण पण अमाप उत्साह असतो नाव 'बरोबर' करून कागदपत्रांवर घालण्याचा... Happy

मी नाही प्रेफिक्स निर्माण केले. प्रेफिक्सची गरज लॉजिकली नसतेच.
सरकारी/ निमसरकारी व इतर कागदपत्रांच्यातही नसतेच. जिथे अगदीच कंपलसरी असेल तिथे काय करायचे एवढे सांगितले.

आडनाव न बदलणं हे कसं चुकीचं, आमची संस्कृती, जातायेता समोर पाया पडलेल्या बाईला कोणता आशिर्वाद द्यायचा वगैरे कुटाण्यासाठी वेळ, इच्छा नाही.

आडनाव बदला किंवा बदलू नका.. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा.. सगळी कडे एकच नाव वापरा... <<<
+१०००००००००००००००००००

सर्व कागदपत्रे एकाच नावावर असावीत. नसतील तर ते काम पहिले करावे.

टेबलापलिकडच्या माणसांना बरेच वेळा अकारण पण अमाप उत्साह असतो नाव 'बरोबर' करून कागदपत्रांवर घालण्याचा. <<<
हो हो. बरोबर करताना आडनाव बदलण्याचे उद्योग पण करतात काही सरकारी गाढवे. विशेषतः रेशनकार्डाच्या इथे घडू शकतं. अश्यांवर लक्ष ठेवणे मस्ट.

.

गाढवे वगैरे म्हणून फ्रस्ट्रेट होऊ नका Happy ती पिढानपिढ्यांची सवय असते. ते मुद्दाम करतील असं नाही. शिवाय, लग्न झालेली बाई नवर्‍याचं नाव लावत नाही, त्याची गरज नाही- ह्याचं ज्ञानच त्यांना नसतं. त्यामुळे ते तत्परतेने त्यांच्यापरीने त्यांचं कामच करत असतात. आपली गरज म्हणून आपण शांतपणे हे हॅन्डल करणे इष्ट.

तेच प्रिफिक्सचं. संबोधन हे केवळ आदर दाखवण्याकरता असतं. त्याची गरज नाही हे अनेकदा लक्षातही येत नाही. त्यामुळे आपण चिडचिड करून घेऊ नये. हे फार मुळापर्यंत गेलेले समज आहेत. ते बदलण्यास किमान चार पिढ्या खर्च कराव्या लागतील!

बाकी, 'एक पे रहो' ला अनुमोदन!

गाढवे म्हणावं लागतं. सांगूनही मुद्दामून आडनाव बदलून घेणे परत सांगितल्यावर आम्हाला अक्कल शिकवू नका प्रकारची भाषा. माझं नाव बदलणारे तुम्ही कोण अश्या प्रकारची भाषा वापरल्याशिवाय समजत नाहीच. तस्मात गाढवेच.
गाढवांना सॉरी. Happy

आमच्या मॅडमचा डीव्होर्स झाला होता..तेव्हा त्यांना नाव बदलण्यासाठी मुख्य म्हणजे प्रॉपर्टी पेपर्स, बँकखाती, पासपोर्ट इ. सर्व महत्वाचे पेपर्सवर नाव बदलण्यासाठी त्रास झाला होता. त्यांनी नवर्याचे नाव काढुन टाकुन माहेरचे तेही फक्त वडिलांचे नाव लिहिले होते. उदा. विनिता शंकर असं नाव असेल तर त्या सरकारी लोकांचं म्हणणं होतं म्हणे की आडनाव पाहिजेच. किंवा मग शंकर हे आडनाव लावुन मधल्या नावाच्या जागी फक्त टिंब टाका. Uhoh

>>>> त्या सरकारी लोकांचं म्हणणं होतं म्हणे की आडनाव पाहिजेच <<<<<
एचडीएफ्सी ब्यान्क सरकारी आहे का? असावी बहुतेक.
कारण आमच्या केरळी साहेबान्च नाव, ते महाराष्ट्रीय पद्धतीनेच हवे म्हणुन हटून बसले, शिवाय त्यान्या प्यानकार्डापासून सर्व ठिकानी सुरवातीस दोन इनिशिअल्स अन पुढे नाव असा प्रकार आहे. सुरवातीची इनिशिअल्स बहुधा गावाच्या नावाची असतात. त्यामुळे त्याचा लोन्गफॉर्म बर्‍याचदा देत नाहीत. तर त्याकरताही ते हटून बसले होते. यात नेमके काय बरोबर काय चूक?

सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद. हिम्सकूल, वरदा मी सगळीकडे एकच नाव वापरते. मात्र नवऱ्याच्या rationcard मधे महेरच्याच आडनावा सहित माझ नाव add होऊ शकेल का?

Pages