मार्लेश्वर

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

सही ! चिक्कार धबधबे आहेत. मार्लेश्वर हा धबधब्यांचा देव आहे का ? Happy कुठे आहे हे ठिकाण ?

    ***
    Skating away on the thin ice of the new day...

    खुप सही Happy , कुठे आहे हे ??
    ****************************
    Happy Blush Proud Lol Biggrin Rofl

    अतुल, मस्त आलाय रे फोटो.. सहिच एकदम. त्या मुख्य धबधब्याचा नाही काढलास का फोटो? तो देवळाचा परीसर पण खुप छान आहे. माझं आजोळ देवरुखचं, त्यामुळे दर सुट्टीत मार्लेश्वरला जाणं व्हायचंच व्हायचं... बर्‍याचदा उन्हाळ्यात गेल्यामुळे पाणी आटलेलं असायचं... पण पावसाळ्यातली मजा काही औरच..

    बरं आता अगदीच राहवत नाही म्हणून तुझी संमती गृहीत धरून मी पुढची थोडी माहिती लिहिते, तू त्यात भर घाल... Happy आणि बाकीचेही मायबोलीकर त्यात भर घालतीलच..

    हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यात देवरुखजवळ आहे. मार्लेश्वर हे शंकराचं जागृत देवस्थान मानतात. तिथे सापांचा अगदी मुक्त संचार असतो. मुख्य देऊळ आहे ते एका गुहेत आहे. तिथे निरांजनाखेरीज कुठल्याही प्र्कारचा दिवा लावायला मनाई आहे. बॅटरी पेटवलेलीही चालत नाही. त्या गुहेच्या खबदाडींमध्ये अनेक प्रकारचे साप पहुडलेले असतात. मिणमिणत्या उजेडात, अंधाराला जरा डोळे सरावल्यावर ते आपल्याला दिसूही शकतात. इथे त्या सापांना कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण करायला मनाई आहे.

    अतूल... अफलातून...
    मंजू छान माहिती...

    पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे मुख्य धबधब्या पर्यंत जात येत नाही... मंदिर परिसरात सापांचा मुक्त संचार कमी झालाय...

    मोरया!!!

    मंजू छान माहिती...
    या शिवाय आजुन काय सांगण्या सारखे असे कि या डोंगरावर जायला रस्ता आहे, कोल्हापुर मार्गे. चालत ३ तास लागतात आणि वरती काहि वस्ती पण आहे. असे मला तिथल्या एका इसमानी सांगितले.
    साप काही दिसले नाही मला. पण त्यांच्या काही प्रतीक्रूति आहेत आत मध्ये. खुप अंधार आहे आत आणि आत जाणे पण खुप अवघड आहे.
    मोठा धबधबा पण आहे त्याचा ही फोटो टाकला आहे...

    खुप सुंदर ठिकाण आहे हे. पावसाळ्यात तर निसर्ग अप्रतीम दिसतो Happy

    आट्ल्या, खुपच छान फोटो, देवरुखला माझी मावशी असते, तिच्याकडे खुपवेळा जातो पण अजुन मार्लेश्वरला जायला जमले नाही.
    आजी असताना तिथे जाऊन पुरणाचा नेवैद्य करायची, ती पण नेहमी बोलवायची.
    खुप वर्णन ऐकले होते तिच्याकडुन. पण या फोटोतून मात्र प्रत्यक्ष दर्शन घडले.

    वा. मस्त आहे धबधबा.. मला पुर्वी या गावाचे नाव ऐकले की प्रेशर कुकर आठवायचा... Happy

    अतल्या , फोटो पाहुन १९९९ मध्ये मित्र्-मैत्रिणींसोबत केलेल्या कोकण प्रवासाच्या आणि विशेषता मार्लेश्वर दर्शनाच्या आठवणी जाग्या झाल्या.. सुपर्ब फोटो.

    फोटो एकदम मस्त !
    या मार्लेश्वरला खूप मोठे डोंगर आहेत, इतके उंच की तिथे संध्याकाळ चार नंतर होते. कारण डोंगरामागे लवकर सूर्य जातो.
    त्यामुळे हवाही थंड होते.

    अरे इधर तो बौत सालसे जानेका मन है, लेकीन कब जमेगा मालुम नय रे बाबा.

    मी याचे पावसाळ्यातले तुफान पाणी असलेले फोटो पाहीले होते आमच्या ओळ्खीच्यान्कडे. तेव्हापासुन मी याच्या ( मार्लेश्वराच्या) प्रेमात आहे. ओ अतुलभाव जरा मन्दिराचे फोटु बी टाका वाईच.