मायाबाईंचा महागडा हत्ती!

Submitted by ठमादेवी on 11 January, 2012 - 01:21

मायाबाईंचे पुतळे आणि हत्ती झाकायला गुलाबी पॉलिथिन आणि त्यासाठी काही कोटींचा खर्च... हत्ती पोसणं आणि त्याहीपेक्षा त्याला झाकणं किती महागात पडतं नाही? आज दुपारी डेडलाईन संपतेय... त्यातही कंत्राट देताना कितींचा घोटाळा केला याचा साद्यंत वृत्तांत कुणी देऊ शकेल काय?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयुष्यात ईमाने ईतबारे नोकरी-धंदा करणार्‍या आणि सरकार ला टॅक्स देणार्‍या प्रत्येक माणसाला चिड ,संताप येणारी गोष्ट म्हणजे ते हत्ती,आणि काशिराम, मायावती चे पुतळे आहेत.नोएडा-ग्रेटर नोएडा च्या रस्त्या वर भल्या मोठ्या पार्क मध्ये हा तमाशा उभा आहे.यू पी मध्ये आणखी ही बर्‍याच ठिकाणि या पुतळ्यांच्या रुपानी मायावती नी स्व:ता ला अमर करुन घेतले आहे.अर्ध्या राज्यात लाईट नाहीत्,चांगल्या शाळा,होस्पिटल्स नाहीत.पण या मुर्त्या आहेत.राष्ट्रिय महामार्गांची अवस्था ,हा शेतातला रस्ता असावा अशी शंका येण्या ईतपत वाईट आहे,गुन्हेगारी,हत्या,अपहरण या बद्दल तर काय बोलावे?? पण तरीही बहेनजी संगमरवरी पुतळ्या तुन "भिउ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे "सारख्या मुद्रेत चौका चौकात उभ्या आहेत.हे पुतळे झाकण्या पेक्शा हा सगळा जनतेचा पैसा मायावती आणि तिच्या भ्रष्ट मंत्रांची मालमत्ता जप्त करुन वसुल करावा.

हे पुतळे झाकण्या पेक्शा हा सगळा जनतेचा पैसा मायावती आणि तिच्या भ्रष्ट मंत्रांची मालमत्ता जप्त करुन वसुल करावा.<<<
कुणी??

एकतर पुतळे अन हत्ती उभारणे बिनडोक पणाचं काम अन ते आत्ता झाकायला सांगणं हे दुप्पट बिनडोकपणाचं काम.

हे पुतळे झाकण्या पेक्शा हा सगळा जनतेचा पैसा मायावती आणि तिच्या भ्रष्ट मंत्रांची मालमत्ता जप्त करुन वसुल करावा.<<<
कुणी??>>>>>>>>इब्लिस खरोखर डोकं पकडुन विचार करावा असा प्रश्न आहे हा.

अगदी अगदी... मलाही हा प्रशन पडलाय. आणि आता आणखी एक प्रश्न पडलाय की मायाबाईंच्या हत्तीचे शेपूट दिसतेय, पाय दिसताहेत किंवा सोंडच उघडी पडलीय म्हणून निवडणूक आयोग त्यांच्यावर कारवाई करणार काय?

पुतळा बंधणे गुन्हा नाहिये बहुतेक ... ते तसे असणे (निवड्णूक जवळ आल्यावर ... आणि केंद्रातले सत्ताधारी तेथे सत्ताकांक्षी असतील तर ... ) मग मात्र हा खूप मोठा गुन्हा आहे रे बाबा .....

पुतळे उभारण्यामध्ये काहीही बेकायदेशीर नाही.
ते जनतेच्या पैशाने उभारणे आणि ते उभारताना भ्रष्टाचार करणे हे कायद्याच्या (पर्यायाने न्यायालयाच्या) कचाट्यात येवू शकते, परंतु तो निवडणूक आयोगाचा विषय नाही.
निवडणूक आयोगाचा दृष्टीकोन केवळ केंद्रातील सत्ताधार्यांना पूरक वाटतो.
(मायावतींचा युक्तिवाद : बसपाचे चिन्ह हत्ती आहे म्हणून हत्ती झाकायचे म्हटल्यावर आता काय हाताचे पंजे, सायकली, रेल्वेची इंजिने, कमळ इत्यादी सर्व झाकून ठेवणार काय? :-))

विषयांतर: कुमार केतकर यांनी लोकसत्ता सोडल्यापासून लोकसत्ताचे अग्रलेख जरा सुखद धक्काच देवून जातात Happy

याला आपण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी असे म्हणतो. जो पक्ष सत्तेत त्याच्याप्रमाणे यंत्रणा काम करणार हे स्पष्टच आहे. पण कॅगसारख्या संस्था अजूनही आहेत ज्या त्यांना पाठीशी घालत नाहीयेत.

आता निवडणुका होईपर्यंत जो तो एकमेकाला सांगत राहणार, ती बघ त्या हत्तीची सोंड उघडीच आहे, तिकडचे सगळे हत्ती झाकले का रे? अरे तो चौकातला मोठा हत्ती कसा झाकला असेल रे? किती खर्च आला रे हत्ती झाकायला? उघड्यावर ठेवले असते तर हत्तीकडे लक्षही गेले नसते. आता या निवडणूकीवेळीच नव्हे तर इथून पुढच्या प्रत्येक निवडणुकीवेळी हत्ती आवर्जून आठवला जाणार. गुलाबी कव्हर घालून निकाल लागल्यावर जनतेला गिफ्ट म्हणुन दाखवतील त्या हत्ती.

हाताचा पंजा, बोटात धरलेल कमळ, त्यामागच मनगट आणि घड्याळ काय काय झाकणार ?

सर्वात मोठ्या लोकशाहीची लाज जेव्हा चंद्रशेखर यांच अल्पमतातल सरकार चार महिन्यांसाठी आल तेव्हाच गेली आहे.