मायबोली गटगच्या माहीतीचे जतन

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मायबोलीवर गेली १६ वर्षे वेगवेगळ्या देशात गटग होत आहेत. पण अनेक जुन्या गटगला कोण कोण आले होते याची माहिती उपलब्ध नाही. त्यांचे फोटोही नाही. प्रत्येक गटग (विशेषतः ज्याला बरेच जण जमले असतात) आपल्या परीने एक वेगळा अनुभव असतो. असे अनुभव जतन व्हावे म्हणून ज्या गटगला १० पेक्षा जास्त मायबोलीकर जमले होते त्यांचे ग्रूप फोटो जतन करून ठेवायचा आमचा प्रयत्न आहे. या ग्रूप फोटोला मायबोलीच्या अधि़कृत फेसबुकपानावर विशेष अल्बम मधे जागा दिली जाईल.

आजपासूनच मायबोलीच्या फेसबुकपानावरच्या अल्बममधे असे फोटो ठेवायला सुरुवात केली आहे. मायबोलीवरचे वृत्त्तांतच तिथे परत दुसर्‍यांदा टाकावे हा उद्देश नाही. वृत्तांत आणि फोटो मायबोलीवर येतीलच. पण प्रातिनैधिक स्वरुपाचे फोटो तिथे ठेवायचा प्रयत्न आहे. या फोटोना टॅग करायची सुविधा फेसबुकवर आहेच. तीही मायबोलीकरांना वापरता येईल.

अर्थातच हे पूर्ण ऐच्छीक आहे. कुठल्या गटगचे फोटो कुठे टाकायचे , सार्वजनिक करायचे का नाही याचा निर्णय त्या त्या गटगचे संयोजक घेत असतातच. गटग यात GTG, वर्षाविहार, वासंतिक कल्लोळ, अधिवेशन, मायबोलीकरांनी एकत्र येऊन केलेली समाजसेवा सगळेच अभिप्रेत आहे. १० पेक्षा अधिक मायबोलीकर अशी मर्यादा ठेवण्याचे कारण म्हणजे अगदी छोटेखानी गटग खूपच होतात त्या सगळ्यांचे व्यवस्थापन ठेवणे अवघड होईल म्हणून.

गटग काही वर्षांपूर्वी झाले असेल तरी आताही तुम्ही ते फोटो पाठवू शकता. आम्हाला फक्त ग्रूप फोटो हवा आहे. वैयक्तिक नको. असा फोटो आणि आलेल्या मायबोलीकरांचे आयडी (खर्‍या नावांची गरज नाही) , गटग ची तारीख , वृत्त्तांत असेल तर त्याची लिंक आणि गटग झालेल्या जागेचे नाव, गाव तुम्ही पाठवू शकाल का? त्यामुळे मायबोलीच्या बखरीत एक मोलाची भर पडेल.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

अ‍ॅड्मिन... जे वृत्तांत जुन्या मायबोलीवर तेव्हाच टाकले गेले होते ते कुठे archives मधे वगैरे असू शकतील का? तसे असल्यास ते ही इथे टाकले जावेत ही विनंती. कारण ते वृत्तांत कोणाकडे आता उपलब्ध असण्याची शक्यता फार कमी आहे.