Submitted by अभय आर्वीकर on 10 January, 2012 - 03:14
मित्र-मैत्रिणींनो,
एक वाईट बातमी आहे. आंतरजालावरील लोकप्रिय लेखक धुंद रवी आणि त्यांचे कुटुंबियांवर महिन्यापुर्वी प्राणघातक हल्ला झाला. ही बातमी आज मला कळली. धुंद रवी आणि त्यांचे आई-वडील आणि बहिण यांच्यावर कोयत्याने वार झाले आणि झालेल्या जखमा खुप गंभीर स्वरुपाच्या होत्या.
पण दिलासा देणारी बाब एवढीच की ते मृत्युशी झुंज देऊन आता सावरताहेत.
आयुष्य पुर्णपणे सुरळीत व्हायला बराच काळ जाईल.
परमेश्वर त्यांना लवकरात लवकर संपूर्ण स्वास्थ प्रदान करो, ही सदिच्छा.
बातमी इथे जोडलीये.
http://gangadharmute.files.wordpress.com/2012/01/dhund-ravi.pdf
गुलमोहर:
शेअर करा
चिड आणणारी घटना आहे.... सर्व
चिड आणणारी घटना आहे.... सर्व मंडळी लवकरात लवकर या संकटा मधुन बाहेर पडू दे.
बातमी वाचून आणि पाहून वाईट
बातमी वाचून आणि पाहून वाईट वाटले.
लवकर बरे वाटू दे.
(No subject)
बातमी वाचून वाईट वाटले. लवकर
बातमी वाचून वाईट वाटले. लवकर बरे व्हा.
बापरे!!! फोटो पाहुन भयानकता
बापरे!!! फोटो पाहुन भयानकता समजली. त्यांच्या नातेवाईकानेच हे काम केले...कारण काहीही असो पण त्याला शिक्षा झालीच पाहीजे...आणि अशा शेजार्यांपेक्षा नसलेले बरे.
बापरे!!! फोटो पाहुन भयानकता
बापरे!!! फोटो पाहुन भयानकता समजली. त्यांच्या नातेवाईकानेच हे काम केले...कारण काहीही असो पण त्याला शिक्षा झालीच पाहीजे...आणि अशा शेजार्यांपेक्षा नसलेले बरे.
सहमत आहे शिल्पा! फोटो आजच
सहमत आहे शिल्पा! फोटो आजच बघायला मिळाले, नसते बघायला मिळाले तर बरे झाले असते असे वाटत आहे
अरेरे, ते यातून लौकर सावरोत.
अरेरे, ते यातून लौकर सावरोत.
यामधे सर्वजण शेजार्यांना का
यामधे सर्वजण शेजार्यांना का दोष देत आहेत ? एकतर आजकाल सदनिका संस्कृतीत दारे बंद असल्याने शेजारी काही झाले तरी लवकर कळत नाही. बर हा हल्ला अनपेक्षित होता, शेजारच्या लोकांना कळेपर्यंत बरेच नुकसान झाले असणार. त्यातुनही शेजारी समजा ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलेच घरात असतील तर ते लगेच काय करू शकणार होते ? पोलिसांना कळवून ते येईपर्यंत बराच वेळ जाणार.
असो, सर्वांची प्रकृती लवकर बरी होवो ही सदिच्छा !
बापरे! ही बातमी पुणे
बापरे! ही बातमी पुणे टाईम्स्/मिरर मध्ये (अगदी याच फोटोंसहित) आली होती. ती धुंद रवींकडची?
धुंद रवी व कुटुंबियांसाठी प्रार्थना. अजून अनेकोनेक हसवणारे लेख त्यांच्याकडून येवोत.
गंगाधर, तुमच्यामुळे कळली ही
गंगाधर, तुमच्यामुळे कळली ही बातमी.........!!
अतिशय भयंकर आणि अमानुष !!!
हल्लेखोरांना लवकरात लवकर शासन होवो आणि धुंद रवी आणि त्यांच्या कुटुंबियांना ह्यातून सावरायची शक्ती मिळो !!
हल्ल्याचे वाचून थरकाप उडाला.
हल्ल्याचे वाचून थरकाप उडाला.
>>यामधे सर्वजण शेजार्यांना का दोष देत आहेत>><<
+१
खरे तर दोन मिनिटे विचार केला की आपण कोणी जर त्या ठिकाणी शेजारी म्हणून असते तर खरोखर काय केले असते अश्या अनपेक्षित हल्ल्याच्या वेळी? आपण स्वतः खरोखर किती व कशी मदत केली असती हा विचार केला तर बरे शेजार्यांवर बोटे ठेवण्यापेक्षा.
Pages