धुंद रवी यांचेवर प्राणघातक हल्ला

Submitted by अभय आर्वीकर on 10 January, 2012 - 03:14

मित्र-मैत्रिणींनो,

एक वाईट बातमी आहे. आंतरजालावरील लोकप्रिय लेखक धुंद रवी आणि त्यांचे कुटुंबियांवर महिन्यापुर्वी प्राणघातक हल्ला झाला. ही बातमी आज मला कळली. धुंद रवी आणि त्यांचे आई-वडील आणि बहिण यांच्यावर कोयत्याने वार झाले आणि झालेल्या जखमा खुप गंभीर स्वरुपाच्या होत्या.

पण दिलासा देणारी बाब एवढीच की ते मृत्युशी झुंज देऊन आता सावरताहेत.

आयुष्य पुर्णपणे सुरळीत व्हायला बराच काळ जाईल.

परमेश्वर त्यांना लवकरात लवकर संपूर्ण स्वास्थ प्रदान करो, ही सदिच्छा.

बातमी इथे जोडलीये.
http://gangadharmute.files.wordpress.com/2012/01/dhund-ravi.pdf

गुलमोहर: 

.

मला रविवारी संध्याकाळी धुंद रवी यांचा दूरध्वनी आला होता. शारिरिकदृष्ट्या संपूर्ण बरे व्हायला काही महीने आणखी जाणार असले तरी आता ते मानसिकरित्या बरे झाले आहेत आणि व्यवस्थित गप्पा झाल्या.

त्यांना काही कायदेशीर मदत हवी आहे. पोलीसातला कोणी उच्चपदस्थ अधिकारी ओळखीचा असल्यास उत्तम. तसे आपल्यापैकी कुणाला अशी माहिती असल्यास लगेच रवीला कळवणे. किंवा मला कळवल्यास मी त्याच्यापर्यंत नक्कीच पोहोचवीन.

गेल्या चार महिन्यांपासून आंतरजालावरील माझा वावर कमी झालाय.
त्यामुळे मला काहीही माहिती नव्हती.
आज त्यांची मेल आल्यामुळे घटना कळली. Sad

अरे बापरे! हे असे कसे झाले? Sad अवघड आहे!
ती बातमी वाचली. सोसायटीतील एकही जण मदतीसाठी पुढे झाला नाही हे वाचून महदाश्चर्य वाटले की अशीही प्रजा अवतीभवती आहे?
मुर्दाड प्रजा! अन या अशा तथाकथित "उच्चभ्रू" म्हणून रहाणार्‍या प्रत्यक्षात षंढ प्रजेच्या सन्गतीत रहायचे?
पूर्वीच्या चाळीच बर्‍या होत्या रे बाबो.

भयंकरच आहे. दु:खी बातम्या बीबीवर वाचले होते. पण फोटो पाहून फारच वाईट वाटले. Sad
जखमी कुटुंब लवकर बरे होवो अन अपराध्याला शिक्षा होवो .

Kay falatu lok aahet yaar ashya lokan war ka halla kela aani shejari kay ....... jawu de te bar asalya ch aikun bar watal

लिंबूटिंबूचे म्हणणे खरे आहे. शेजार्‍यांनी मदत करायलाच हवी होती. रवी यांच्या कुटूंबीयांना सावरण्यास परमेश्वर बळ देवो.

त्रिशंकू, इथे कुणी रवीच्या घरी जाऊन फोटो काढून इथे डकवलेले नाहीत. ती वर्तमानपत्रातली बातमी आहे त्यात फोटो असणारच. उलट त्या बातमीची लिंक दिल्याबद्दल मुटेसरांचे आभार कारण फोटोंवरुन रवी आणि त्याच्या कुटुंबियांवर काय भयानक प्रसंग ओढवला याची पुरेपूर कल्पना येते आहे. असो.

अरे बापरे फोटो अजिबात बघवत नाहीत. दु:खद घटनावर आधी समजलं होत पण फोटो पाहुन त्याची भीषणता जाणवली .
रवी आणि कुटुंबीय लवकर बरे होवोत.

Pages