मास्तर म्येला! अर्थात पिंजरा

Submitted by pradyumnasantu on 8 January, 2012 - 21:27

मास्तर म्येला! अर्थात पिंजरा

हॆ हॆ हॆ आपला चहा फारच लज्जतदार होता
बरं तर येउ का आम्ही आता?
हो पण सांगितलं नाहीत आपल्या येण्याचं प्रयोजन
कसलं आलंय प्रयोजन
आपण सारे एकाच सोसायटीचे जन
चौकशी करायची आपली एकमेकाची
बरंवाईट बघायचं, खबरबात घ्यायची
आणि शिवाय आम्ही तुमचे विद्यार्थी ना पूर्वीचे, सर?
येतो तर!
अहो विद्य्यार्थी नाव तरी सांगून जा
असेल दारव्हेकर, हेर्लेकर नाहीतर चिपळूणकर
नावात आहे काय तर
आपला दोस्तच तसं म्हणाला होता ना सर?
दोस्त नव्हे शेक्सपीअर
हां तोच तो, आता येतो बरं !
**
(काही दिवसांनी)
नमस्कार, नमस्कार
ओळखलं का सर?
हो, हो का नाही, दारव्हेकर, हेर्लेकर नाहीतर चिपळूणकर
खरं, खरं, पण मी नाही एकटा
दहा बारा लोक आहेत बरोबर
कशासाठी
पोटासाठी
अरे हे चाललंय तरी काय? एक्स्प्लेन कराल तरी खरं?
ओके ओके मी सांगतो सर
आम्ही दुस-या कोणाची तरी खातो मीठ-भाकर
कोणाची?
त्याचं नाव बिल्डरभाई
त्याला नेहमीच असते घाई
मी आहे त्याचा भाडोत्री गुंडा
माझा तिन्ही लोकी झेंडा
त्याच्यापुढं झुकते आमची मान
त्याच्या नावावर ट्रान्स्फर करवतो मी तुमच्यासारख्याचं मकान
समझे क्या?
तर आता मास्तर ऐक जरा उघडून कान
बंद कर तुझं दुकान
हे वीस लाख घे मोजणी कर
कागद बी आहे तयार
मार सही आणि हो पशार
नाही तर?
नाही तर, हे बाहेरचे डझनभर
देतील धसका
तोडतील
एकेक लचका
मास्तरड्या, सही कर
पैसा ठेवून जातो
पुन्हा उद्याला येतो
**
(मास्तरआपल्या मित्राला काही दिवसांनी)
काय करणार
केली सही, घालवलं घर
(मित्र मास्तरना)
नकोस होवू विषण्ण मित्रा
ढाळू नकोस अश्रू
वीस लाख रोख आहेत तुझ्याकडे
हे नकोस विसरू
**
(काही काळाने)
नमस्कार, मास्तर
या दारव्हेकर, हेर्लेकर नाहीतर चिपळूणकर
का येणं केलंत, हे तर आहे भाड्याचं घर
खरंय मास्तर या घराचा काय उपयोग आम्हाला
मी फक्त आलो बिल्डरभाईचा हुकूम पाळायला
बिल्डरभाईंनी काढलीय पतसंस्था नवी
तुमची वीस लाखाची रक्कम डिपॊझिट हवी
आणि मी नाही दिली तर?
काय बोलता गुरुजी, अजून आमच्यात आहे दम थोडा
ही माझी मॆग्नम पहा आणि हा तिचा घोडा
**
(मास्तर मित्राला)
काय करणार
धमकी होती भक्कम
मी मुकाटपणे
काढून दिली रक्कम
(मित्र मास्तरना)
नकोस होवू विषण्ण मित्रा
ढाळू नकोस अश्रू
जीव शाबूत आहे तुझा
हे नकोस विसरू
**
(काहीच्या काही मोड ऒन. हे असं कधी घडत नसतं)
नमस्कार वेलणकर
ऒं नाव कसं ओळखलंत मास्तर
काय यार
तुझ्यासारख्या विद्यार्थ्याचं नाव विसरलो तर कसला मी मास्तर
पण आणखीही काही आहे तुला दाखवणार
हे बघ करारपत्तर
तुझ्या बिल्डरभाईनं परत केलंय माझं घर
आणि ही माझी वीस पेटी
मुकाटपणे आली माझ्या पाठी
पण मास्तर हे घडलं तरी् कसं
सांगतो, त्याचं झालं असं
तू काढून घेतलंस माझं घर
माझं जीवन, माझा वरण-भात
मी पडलो मास्तर
तुझ्यासारख्या भंगार विद्यार्थ्याकडून कसा स्वीकारणार मात?
सरळ गाठली दिल्ली
तिथं भेटली एक बिल्ली
तिच्या एका कटाक्षावर
मी ऎक्सेप्ट केली तिची मीठ-भाकर
तिनं केली घाई
गाठून दिला मला एक सुपर-बिल्डरभाई
त्यान दिली ४४मॆग्नम
म्हणाला मास्तर, घाल एकेकाला गोळी
मी संभाळतो राजकारण
तीन मी उडवले
तुझा बिल्डर आणि त्याला साथ देणारा इन्स्पेक्टर
आज होणार वन टू का फोर
पण मास्तर, हे तर झाले तीनच
अरे यार, हे असले उद्योग केल्यावर
माझेही पडलेच आहे ना कलेवर?
(हसू लागतो खो खो खो
गोळ्या झाडतो ठो ठो ठो !!!)

शब्दखुणा: 

शेवटचा काहीच्या काही मोड ऑन आहे ना तो आता सामान्य माणसाच्या जगण्याचा भाग झालाय.आपल्यावरच्या प्रत्येक अन्यायाचा बदला नाही घेउ शकत.मग अतिरंजीत दिवास्वप्नातच सुड उगवायचे आणि समाधान मानायचे.