पोळ्यापुराण

Submitted by सस्मित on 5 January, 2012 - 08:01

'फेवरीट गझलकाराची माफी मागुन' Happy

कुणास होती सवड रोज पोळ्या करायला
ब्रिटानियाचा आधार होता उदर माझे भरायला

सासुबाईंचा स्वभाव इतका गरीब की भाळलेच मी
उगाच आली नणंद माहेरी मुजोरी करायला

पुन्हा तुला शब्द देत आहे करेन पोळ्या कधीतरी
पुन्हा मला एक चान्स दे तू पावभाजी करायला

मला म्हणे पोळी कडक (माझी) तशी तिला मी दिली कणीक
फतकल मारुन बसली खुशाल (नणंद) कणीक तिंबायला

इतस्ततः पसरवूनी नकाशे जमे न पोळी लाटणे
कुणास सांगू न करपवता जमत नाही शेकवायला

अशीच पोळ्या करून मी लाटणे फिरवीत राहते
मनास ज्यांची न लाज वाटे जगासमोरी खावयाला

उदास सख्या रोजप्रमाणे असाच जेवतोस तू
भातच घे तु वाढुन तुझे उदरभरण करायला

:दिवे: :दिवे: :दिवे: Happy

विदिपा,
ते राहुनच गेलय आणि आता एडीट कसं करायच माहित नाहिये.
'गझलकारांची माफी मागुन' असेही लिहायचे आहे.
मदत करा प्लिज.

नन्ना Lol

बेफी,
कवितेवर / विडंबनावर हसताय?
का माझ्या अज्ञानावर हसताय?
अहो खरंच मला तसं लिहायच आहे.
का हे तु.क. वालं हसु आहे?

कसला जुना धागा वर काढलाय ☺️ प्रोफाइल मध्ये जाऊन वाचलेला दिसतोय.
आता का नाही लिहीत सस्मित तुम्ही,म्हणजे प्रतिसादात लिहिता पण धागे काढणे का बंद केले. चांगले लिहलाय की.

म्हणजे प्रतिसादात लिहिता पण धागे काढणे का बंद केले. चांगले लिहलाय की.>> +१

तुमचं वापरायचं नाव आधी नन्ना होतं असं दिसतंय, तेव्हा लिहायच्या.
आणि आता बदललं तर लिहायच्या नावे नन्ना?

बरोबर च्रप्स जी.
मी या बाबतीत किल्ली चं अनुकरण केलंय.. हलकंफुलकं लेखन शोध