Submitted by सस्मित on 5 January, 2012 - 08:01
'फेवरीट गझलकाराची माफी मागुन'
कुणास होती सवड रोज पोळ्या करायला
ब्रिटानियाचा आधार होता उदर माझे भरायला
सासुबाईंचा स्वभाव इतका गरीब की भाळलेच मी
उगाच आली नणंद माहेरी मुजोरी करायला
पुन्हा तुला शब्द देत आहे करेन पोळ्या कधीतरी
पुन्हा मला एक चान्स दे तू पावभाजी करायला
मला म्हणे पोळी कडक (माझी) तशी तिला मी दिली कणीक
फतकल मारुन बसली खुशाल (नणंद) कणीक तिंबायला
इतस्ततः पसरवूनी नकाशे जमे न पोळी लाटणे
कुणास सांगू न करपवता जमत नाही शेकवायला
अशीच पोळ्या करून मी लाटणे फिरवीत राहते
मनास ज्यांची न लाज वाटे जगासमोरी खावयाला
उदास सख्या रोजप्रमाणे असाच जेवतोस तू
भातच घे तु वाढुन तुझे उदरभरण करायला
:दिवे: :दिवे: :दिवे:
गुलमोहर:
शेअर करा
मस्त मनोरंजन.
मस्त मनोरंजन.
नना, मस्तच एकदम
नना, मस्तच एकदम
मस्त काव्य
मस्त काव्य
बेफिकीरांच्या ज्या गझलेचे हे
बेफिकीरांच्या ज्या गझलेचे हे विडंबन आहे त्या गझलेचा उल्लेख केलात तर चांगले दिसेल
विदिपा, ते राहुनच गेलय आणि
विदिपा,
ते राहुनच गेलय आणि आता एडीट कसं करायच माहित नाहिये.
'गझलकारांची माफी मागुन' असेही लिहायचे आहे.
मदत करा प्लिज.
(No subject)
नन्ना
नन्ना
बेफी, कवितेवर / विडंबनावर
बेफी,
कवितेवर / विडंबनावर हसताय?
का माझ्या अज्ञानावर हसताय?
अहो खरंच मला तसं लिहायच आहे.
का हे तु.क. वालं हसु आहे?
कवितेतील विनोदामुळे हसू आले.
कवितेतील विनोदामुळे हसू आले. गैरसमज नसावा
धन्यवाद बेफी
धन्यवाद बेफी
मस्तय
मस्तय
नन्ना, आपल्या लेखनात जाऊन
नन्ना,
आपल्या लेखनात जाऊन 'संपादन' असे सिलेक्ट करा.
तुम्हाला हवे ते बदल करता येतील.
हेही मस्त हलकंफुलकं आहे..
मस्त हलकंफुलकं आहे.. :स्मित.
कसला जुना धागा वर काढलाय ☺️
कसला जुना धागा वर काढलाय ☺️ प्रोफाइल मध्ये जाऊन वाचलेला दिसतोय.
आता का नाही लिहीत सस्मित तुम्ही,म्हणजे प्रतिसादात लिहिता पण धागे काढणे का बंद केले. चांगले लिहलाय की.
छान लिहता सस्मितजी..लिहत राहा
छान लिहता सस्मितजी..लिहत राहा..
म्हणजे प्रतिसादात लिहिता पण
म्हणजे प्रतिसादात लिहिता पण धागे काढणे का बंद केले. चांगले लिहलाय की.>> +१
तुमचं वापरायचं नाव आधी नन्ना होतं असं दिसतंय, तेव्हा लिहायच्या.
आणि आता बदललं तर लिहायच्या नावे नन्ना?
Bhaariye he
Bhaariye he
बरोबर च्रप्स :ही:ही:
बरोबर च्रप्स जी.
मी या बाबतीत किल्ली चं अनुकरण केलंय.. हलकंफुलकं लेखन शोध
अरे काय खोदकाम चालवलंय
अरे काय खोदकाम चालवलंय
एक नम्बर... सहीच
एक नम्बर... सहीच
सहीच !
सहीच !