"रानवाटा" प्रस्तुत ठाण्यातील नवोदित छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन ठाणे कलाभवन, कापुरबावडी येथे ७ व ८ जानेवारी २०१२ रोजी भरविण्यात येत आहे. या प्रदर्शनात नवोदित छायाचित्रकारांची जवळपास २०० छायाचित्रे पाहायला मिळतील; त्यात निसर्गसौंदर्य, वन्य प्राणी- पक्षी, जनजीवन, समुद्रकिनारे यांचा समावेश करण्यात आला आहे. हे प्रदर्शन शनिवार व रविवार सकाळी ११ ते ८ पर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहिल. यात अस्मादिकांनी काढलेली काही छायाचित्रेही आहेत.
थोडंस रानवाटाविषयी:
"स्वप्निल पवार" यांच्या संकल्पनेतुन "रानवाटाची" निर्मिती झाली आहे. सह्याद्री आणि त्यावर वसलेल्या गडकिल्ल्यांवर मनसोक्त प्रेम करणार्या या अवलियाने आत्तापर्यंत १५० हुन अधिक गडकिल्ल्यांना गवसणी घातली आहे आणि उर्वरीत किल्लेही लवकरच सर करण्याचा त्याचा मानस आहे. रानवाटाचे कार्यक्षेत्र फक्त फोटोग्राफी आणि गड किल्ल्याची भटकंती इतकेच मर्यादित नसून गडकिल्ल्यांची साफसफाई यावरही विशेष भर दिला जातो. सलग ४-५ वर्ष पावसाळ्याच्या आधी हरीश्चंद्रगडावर रानवाटा टिमबरोबर स्वतः स्वप्निल जाऊन प्लास्टिक, कचरा गोळा करून त्याची रीतसर विल्हेवाट लावतात, पाण्याच्या टाक्या साफ करतात. सन २०११ च्या पावसाळ्याआधी जवळ जवळ वर्षभरापासुन साठलेला १५ गोणी प्लास्टिक कचरा रानवाटा टिम व स्वतः स्वप्निलने अथक परीश्रम करून केदारेश्वराच्या गुहेजवळ असलेल्या मळगंगा नदिच्या उगमा पासुन गोळा केला. अन्यथा हा सगळा कचरा वाहत्या पाण्याबरोबर खाली गावात आणि पर्यायाने शेतात पसरला असता. नुसतं गडकोटांवर जाऊन भटकंती करण्यातच समाधान न मानता, आपणही या निसर्गाचे/गडकिल्ल्यांचे काहितरी देणं लागतो याची जाणीव ठेवून केलेले हे कार्य निश्चितच उल्लेखनिय आहे.
रानवाटाच्या संकेतस्थळावर विविध किल्यांची रीतसर माहिती आणि फोटो उपलब्ध आहेतच. लवकरच इतर अधिक किल्ल्यांची माहितीही अपडेट करणार आहेत. भन्नाट रानवार्यात, स्वत:च्याच मस्तीत शिळ घालणार्या या रानवाटाच्या संकेतस्थळाला जरूर भेट द्या.
मितभाषी आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असलेल्या स्वप्निलला फोटोग्राफीची प्रचंड आवड असुन त्याने आत्तापर्यंत सलग ४ ते ५ वेळा हरीश्चंद्रगडावरील कोकणकड्यात दिसणारे इंद्रवज्र आपल्या कॅमेर्यात बंदिस्त केले आहे. याच फोटोग्राफी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी सदर प्रदर्शनानंतर हौशी छायाचित्रकारांसाठी अतिशय सोप्या भाषेत छायाचित्रण शिबीराचे आयोजन २२ जानेवारी पासुन करण्यात आले आहे. इच्छुक अधिक माहितीसाठी स्वप्निल पवार यांना 9821367894 या मोबाईलवर संपर्क करू शकतात.
मागील प्रदर्शनाची हि झलकः
(फोटो: रूपेश बांदकर आणि योगेश जगताप)
आम्हा नवोदित छायाचित्रकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी या प्रदर्शनाला नक्की भेट द्या.
दिनांकः
शनिवार ७ जानेवारी आणि रविवार ८ जानेवारी, २०१२.
वेळः
सकाळी ११ ते रात्रौ ८ पर्यंत
स्थळः
ठाणे कलाभवन केंद्र
बिग बझार शेजारी,
कापूरबावडी,
ठाणे (पश्चिम).
=======================================================================
=======================================================================
जिप्सी, लई भारी ! किप इट अप
जिप्सी,
लई भारी !
किप इट अप ....
योग्या नक्की येतोय रे
योग्या नक्की येतोय रे
जिप्सी यांचे हार्दिक
जिप्सी यांचे हार्दिक अभिनंदन!
रानवाटाच्या सर्व उपक्रमांना हार्दिक शुभेच्छा!
प्रदर्शनास भेट देण्याचा, रानवाटाच्या प्रकल्पांत सहभाग घेण्याचा प्रयत्न अवश्य करेन.
अभिनंदन आणि शुभेच्छा ! ! असेच
अभिनंदन आणि शुभेच्छा ! ! असेच सुयश लाभो !!
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन जिप्सी!
अभिनंदन जिप्सी!
Pages