नान हुआ - चायनिज बुध्द मंदिर

Submitted by शापित गंधर्व on 3 January, 2012 - 03:07

सर्व प्रथम समस्त माबोकरांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
हे वर्ष आपणा सर्वांना सुख, समृध्दी आणि समधानाचे जावो ही ईश्वर चरणि प्रार्थना.

१ जानेवारी २०१२ ला नान हुआ बुध्द मंदिरात बेबी ब्लेसींग कार्यक्रम आयोजीत केला होता. पिल्लूला या कार्यक्रमासाठी घेउन गेलो होतो. इतरवेळी मुख्य प्रार्थना कक्षात फोटो काढतायेत नाहित. आज या कार्यक्रमामुळे फोटो काढण्याची मुभा होती.

जोहानसबर्ग पासुन साधारण १०० कि. मी. अंतरावर ब्रॉकोंस्पुर्ट (Bronkhorstspruit) शहरात नान हुआ नावाचे चायनिज बुध्द मंदिर आहे.
६०० एकर इतक्या प्रचंड क्षेत्रफळावर विस्तारलेल्या मंदिराचे बांधकाम १९९२ मधे चालु झाले होते आणि २००५ मधे ते जनते साठी खुले केले गेले.

प्रचि १ - मुख्य प्रवेश द्वार
प्रचि २ - मुख्य स्वागत कक्ष
प्रचि ३ - मुख्य प्रार्थना स्थळ
प्रचि ४ - मुख्य स्वागत कक्ष आतल्या बाजुने
प्रचि ५ - मुख्य प्रार्थना स्थळ चौकोनी आकाराच्या इमारतीने वेढलेले आहे. चार कोपर्‍या पैकी एका कोपर्‍यातील इमारत
प्रचि ६ - मुख्य प्रार्थना स्थळ आणि विस्तृत प्रांगण
प्रचि ७ - मख्य प्रार्थना कक्षात बुध्दाच्या तीन मुर्ती आहेत. सगळ्यात डाविकडे आहे ती शाक्यमुनी बुध्दा, मधली अमिताभ बुध्दा आणि उजव्या बजुची मेडिसिन बुध्दा.
(हा प्रचि माझ्या आधिच्या भेटी दरम्यान घेतला आहे)

प्रचि ८
प्रचि ९ - बुध्द मुर्तींच्या डाव्या व उजव्या बाजुस धर्म रक्षकांच्या मुर्ती आहेत
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३ - मधलि मुर्ती - अमिताभ बुध्दा
प्रचि १४ - डाव्या बाजुची मुर्ती - शाक्यमुनी बुध्दा
प्रचि १५ - उजव्या बाजुची मुर्ती - मेडिसिन बुध्दा
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९ - धर्म रक्षक १
प्रचि २० - धर्म रक्षक २
प्रचि २१ - लाईट ऑफरींग - येणारे भक्तगण ईच्छा पुर्ती साठी ठराविक मुर्ती समोर दिवा लावतात
प्रचि २२ - पुजे दरम्यान वापरले जाणारे वाद्य
प्रचि २३

गुलमोहर: 

सुरेख प्रचि आणि छान वर्णन. आधिच्या कही प्रचिं मधे आभाळ छान टिपलयं. प्रचि ५ खूप आवडला - हिरवी जमीन, निळे आभाळ आणि सुन्दर कोपरा. मंदिराच्या आतले प्रचि पण छान आलेत. सगळी कडे झगमगाट दिसली. 'बेबी ब्लेसिंग' ह्या कार्यक्रमाची कल्पना आवडली.

Pages