मन उधाण वार्‍याचे

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

हे जुन्या मायबोलीतल्या रंगीबेरंगी वर टाकलं होतं .. पण आज पुन्हा नव्याने अगदी असंच वाटतंय ..

गेले काहि दिवस जाम कंटाळा आलाय .. सगळं सोडून कुठेतरी छान vacation ला जावंसं वाटतंय .. पण उगीच अशीतशी vacation नाही .. इकडे अमेरिकेत असते तशी तर मुळीच नाही .. म्हणजे expedia वरून flight आणि car book करून आणी google वरच्या diections घेऊन सगळ्या त्याच त्या ठराविक, standardized पध्दतीने नाही .. गाडी आणि छान रस्ते असावेत पण मध्येच कुठेतरी चहाची टपरी लागावी, एखादा ढाबा लागावा जिकडे गाडी थांबवून गरम गरम पराठा, दहि आणि लोणच्याबरोबर खाता येईल .. छानपैकी पाऊस भुरभुरत असावा .. घाटातला रस्ता .. सगळीकडे तो fresh हिरवा, पोपटी रंग दिसावा .. आणि मग मध्येच जिथे वाटेल तिथे थांबून एखाद्या खडकावर बसून रहावं .. पावसाची भुरभुर झेलत, थोडंसं शहारत प्रसन्न मनाने ते सौंदर्य भरून घ्यावं मनात .. त्या देखाव्याने मन तृप्त झालं की मग एखाद्या ढगाळलेल्या डोंगरमाथ्यावर जावं .. वरून दिसणारा, दरीतला नागमोडी वळणाचा काळाभोर रस्ता निरखावा .. तिखट मीठ लावलेली रसरशीत काकडी खावी .. मनात मातीचा मनोहर सुगंध दरवळत रहावा .. अजिबात कसली चिंता नको, विवंचना नको .. कुठे परतायची घाई नको नी कसलंच वेळापत्रक नको .. सगळा परिसरच स्वच्छंदी असावा .. पाऊस आणि शहारणारी थंडी अनावर झाली कि घरी परतावं .. ते घर मात्र समुद्रकिनारी असावं .. घराला छानसा झोपाळा असावा ज्याच्यात बसलं की अनंतापर्यंत फ़क्त नीळंशार, मध्येच हिरव्या छटा असणारं समुद्राचं पाणी दिसावं .. फ़ोटोतल्यासारखं, मोठ्ठं केशरी दिसणारं आणि भरपूर वेळ रेंगाळणारं सूर्यबिंब दिसावं .. जुन्या आठवणी काढाव्या, त्यांच्याशी relate होऊ शकणारं कोणीतरी असावं आणि मग भरपूर गप्पा माराव्यात ..

कधी बरं मिळेल अशी vacation?

विषय: 
प्रकार: 

थोडक्यात भारतात जाऊन अशी सुट्टी हवीय.. Happy सगळं वर्णन तसंच आहे! आणी खरंच इथे कंटाळा आला की एक्झॅक्ट असंच वाटतं! मस्त लिहीलंय.. फ्लो सहीच..

हो, खरंच. मी पण वाट बघतेय अशाच एखाद्या छान vacation ची. मला मस्त सिमला, मनाली.. खरंतर भारतात कुठेही चालेल.

हे सगळं २४ तासात कसं करायचं?

आयहाय सशल, अशी सुटी आणि ट्रिप मिळाली तर काय मज्जा येइल!

सशल,
दिवे आगर ला जाउन ये भारतात गेलीस कि, तू लिहिलेलं सगळं मिळेल :), फक्त अत्ता तरी पाउस भुरभुरणरा नाही, धो धो मिळेल !:)
दिवे आगर वरून हरीहरेश्वर ला जायचा रस्ता तर आपल्य इथल्या हायवे वन च्या तोंडात मारेल असा आहे, म्हणजे जागो जागी सुंदर 'सी स्केप्स' , पण इथल्या सारखा शिस्तबध्द -निर्जीव नाहीत , एकदम आपला वाटणारा रस्ता... !:)

अगदी अगदी डीजे! दिवे आगर हे ठिकाण मंत्रमुग्ध करणारं आहे.. आणि तो रस्ता.. (हरिहरेश्वर नाही गं)- श्रीवर्धन ते दिवे आगर! breathtaking म्हणतात तसाच! Happy
अशी सुट्टी लवकरच मिळो!
--------------------------------------
सलोनासा सजन है और मै हूँ
जिया में इक अगन है
और मैं हूँ..

सशल नुकतीच डेरवण, रत्नागिरी, लांजा, मार्लेश्वर अशी सहल करुन आले ऐन पावसाळ्यात अगदी तू वर्णन केलेलं सगळं काही होतं. समुद्रकिनारा, डोंगर, हिरवळ, धबधबा, उंच डोंगर, 'चा'ची टपरी, भजी सगळंसगळं ... बोल कधी येतेस? तुझ्या आठवणींशी रीलेट करणारं माणूस फक्त घेऊन ये.

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

लांजा? माझं गाव आहे. पण तिथे प्रेक्षणीय असं काहीही नाहीये.

मी हरिहरेश्वर कधि विसरणार नाहि ! अगदि वेगळ्या कारणासाठी ....माझे दोन मित्र तिथल्या समुद्रात पोहताना बुडाले.....मि पण त्यावेळि त्यांच्याबरोबर होतो, पण वाचवु शकलो नाही, पण, तिकडिल लोक खुप चांगल्या स्वभावाचे आहेत्....!

i miss my friends too much !

अरेरे... चुकीच्या वेळेला वाचले.. आता माझ्या मनात सुद्धा अश्याच भटकंतीचे प्लान्स सुरु होणार... अजून काही दिवस आहेत हो सुट्टीवर जायला.. Happy

भारतवारीत एकदा गोव्याहून गोकर्ण-कारवारला बाय रोड जा. भरपूर हिरवीकंच झाडी असलेला जवळजवळ सगळा रस्ता समुद्रकिनार्‍याच्या बाजूने आहे! श्रावण-भादव्यात गेलीस तर भुरभुरणारा पाऊसही लागेल कदाचित...केवळ अप्रतिम!!
आणि गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांचं नाव दिलेला बीच...आहाहा!!
मी बसने गेलेय तिकडे. जपून ठेवलाय तो रस्ता मनात. Happy