नविन चित्रे

Submitted by विनार्च on 2 January, 2012 - 06:08

माझ्या मुलीने तिच्या शाळेच्या मासिकासाठी काढलेली चित्रे खाली देत आहे (खर तर इतक्या सुंदर चित्रांच्या विभागात लहान मुलीची चित्रं अपलोड करणे कसतरी वाटत पण बालविभाग नसल्यामुळे पर्याय नाही.) माझ्या मुलीचं वय ७ वर्ष ९ महिने. तिने पहिल्यांदाच कॉपी करुन चित्र काढलं आहे म्हणुन मला जाणकारांची मतं हवी आहेत.तिला असे कॉपी करायला द्याव का ? तिचा हात साफ व्हावा ह्यासाठी काय करता येईल? तिला अजुन कोणत्याही चित्रकलेच्या क्लासला घातलेले नाही आहे तर अशा क्लासची खरच गरज असते का? (तिच्या बाबांची तसेच माझीही चित्रकला चांगली आहे म्हणजे कॉपी हुबेहुब करु शकतो पण नवनिर्मिती म्हणावी तशी चांगली जमत नाही म्हणुन अनन्याला चांगली चित्र काढता यावीत अशी आशा आहे.)

पतंग उडवणारा मुलगा
2012-01-3.jpg

ओरिजनल चित्र
2012-01-4.jpg

पावसाळा
2012-01-8.jpg

ओरिजनल चित्र
2012-01-7.jpg

या आधी तिने तिच्या मनाने काढलेल्या काही चित्रांची लिंक खाली देत आहे.
http://www.maayboli.com/node/28187
http://www.maayboli.com/node/28947
http://www.maayboli.com/node/29801

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान आहेत.
मी एक सुचवू का?
तिला तिच्या कल्पनेनी ही काही चित्रं काढायला सांगा(पुस्तकातून न बघता).काहीवेळा मुलांच्या कल्पनेतून खूप छान चित्र साकार होतं.

बेफी, बित्तुबंगा,स्मितागद्रे,पद्मजा,रतन लेकीच्या कौतुकाबद्दल धन्यवाद!
तोषवी सुचने बद्दल आभार पण ती नेहमी स्वतःच्या मनानेच चित्रे काढते पहिल्यांदाच तिने कॉपीकरुन काढले आहे म्हणुनच मला इथल्या जाणकारांची मतं एकायची आहेत. तिच्या आधीच्या काही चित्रांच्या लिंक्स आता वर अ‍ॅड केल्या आहेत.

विनार्च, फक्त कॉपीच केलेय, ट्रेस नाही केलेय.
सुंदरच काढली आहेत.
यापुढे ग्रीड मेथड वापरुन हुबेहुब चित्रं काढता येतील, किंवा
कल्पनेने काढता येईल. एखाद्या ठिकाणी शांत बसून, समोर
दिसणारे दृष्य़ रेखाटता येईल.

(मी जाणकार नाही..)

अर्चना, छान काढली आहेत चित्रे. मलातरी काही वावगं वाटत नाही बघून काढण्यात (discl: मी जाणकार नाही). छान प्रमाणबद्ध चित्रं आहेत. तिची कल्पना नक्की फुलवा. किंवा देखावा कल्पनेतून येउ द्या आणि व्यक्ती वा figures साठी संदर्भ वापरू द्या. तुम्ही चित्रे काढा तिच्या बरोबर. मुलं बघत बघत खूप शिकतात. (माझा वैयक्तिक अनुभव : माझ्या ४ वर्षांच्या मुलीसोबत). अनन्याची आधीची सगळी चित्रे खूप आवडली Happy शुभेच्छा.

छानच.

नुसत वयाच्या मानानेच नाही तर ऑब्झर्व्हेशन पॉवर, रेखाटणी, कलर आँबिनेशनपण छान आहे. दुसर्‍या चित्रात तर तिच्या स्वत:च्या अ‍ॅडिशन्सपण छान आहेत. असच तिला प्रोत्साहन देत रहा.

अनन्या, मोठी कलाकार हो!

श्री, आर्च, दक्षिणा कौतुकाबद्द्ल धन्यवाद!
दिनेशदा, अभिप्रा सुचनांसाठी आभार (तुम्ही जाणकार नाही असं तुम्ही म्हणणं हा तुमचा मोठेपणा आहे)..... Happy

वयाच्या मानाने चित्रकलेतली प्रगल्भता फारच वाखाणण्यासारखी आहे. मानवाकृती काढायला खरंच कठीण असतात. पण या दोन्ही चित्रांत तिने उत्कृष्ट काढल्या आहेत. शिवाय चित्रातील इतर गोष्टिंची प्रमाणबद्धता, अँगल्स, रंगकाम, रंगांची निवड अतिशयच सुरेख आहे. दुसर्‍या चित्रातला रस्ता मागे छोटा होत जातोय हे फारच उल्लेखनीय वाटतं. Happy

शाब्बास अनन्या!

वेगळ्या विभागाची मला वाटत गरजच नाही. खरच इतकी सुंदर चित्रे काढली आहेत की अस वाटत खरच क्लास वगैरे लावला असेल. मला अगदी शाळेतल्या पाठपुस्तकातल्या चित्रांची आठवण झाली. तिच्या कलेला जास्तित जास्त प्रोस्ताहन द्या.

सुरेख काढलीत चित्र ! अन फक्त कॉपी नाही केलेली तिनं.तिची स्वतःची अ‍ॅडीशन्स, स्वतःची व्हिजन दिसतेय. उदा. पहिल्या चित्रातले पतंग, त्यांचे जाणीवपूर्वक काढलेले मांजे जे मूळ चित्रात नाहीत. दुसर्‍या चित्रात पाठमोरी रेनकोट घालून जाणारी व्यक्ती अन मुलीची वेगळी एक्स्प्रेशन्स. मस्त काढलीत चित्र ! किप इट अप !
निसर्गाची, नेहमीच्या जीवनातील घटना यांची चित्र काढायला प्रोत्साहन द्या. काही वेळा कॉपीही चालेल. शक्य तर पर्स्पेक्टिव्हज ( वन पॉईंट, टू पॉईंट/ थ्री पोईंट ) बद्द्ल थोडी माहिती द्या. कोणत्या अँगलमधून काय अन कसे दिसते याबद्द्ल थोडी चर्चा करा. म्हणजे एकच झाड तळमजल्यावरून कसे दिसते, पहिल्या मजल्यावरून कसे दिसते, गच्चीवरून कसे दिसते याचे निरिक्षण करायला सांगा. एकदा ती व्हिजन आली, की आपोआप चित्रातही ती येईल. चित्रांची प्रदर्शने/ नेटवरच्या काही चित्रकारांची चित्रे तिच्याबरोबर बसून पहा, त्यातले चांगले काय अन ते का चांगले याची माहिती द्या. तुम्ही स्वतः थोडा वेळ द्याल तर मुद्दाहून क्लास लावायची गरज नाही वाटत. पण घातले तर चित्रकलेतील बेसिक आपोआप तिथे शिकेल. क्लास मात्र "घिसापिटा" नसावा Happy

कॉपी असु देत अथवा चित्रे असु देत............महत्व चित्रे काढते याला द्या............ ओरिजनल जमेल हळु हळु .....

आवडीने काढु द्या त्यांना..

दोन्ही चित्रं मस्त जमली आहेत. तिच्या वयाच्या मानाने तिने अ‍ॅडिशन्स, कलर काँबिनेशन्स वगैरेही छान काढली आहेत. कीप इट अप.

सुरेख !! चित्रं खरंच सुरेख काढली आहेत तिनं...!!
तिच्या नव्या अ‍ॅडिशन्स पण एकदम झकास आहेत. तिच्यात जबरदस्त कला आहे. तिचा आत्मविश्वास वाढता ठेव म्हणजे आणखी उत्तमोत्तम कलाकृती तिच्या हातून होतील.

छान