नव्या क्षणांचा प्रवास

Submitted by देवनिनाद on 2 January, 2012 - 02:51

दाटून आलेलं ते सारं
गद्यातच व्यक्त करायचं होतं
पण शब्दांनी मोकळेपणा ताणून धरला
बहूदा ते पद्यातच उतरायचं होतं
.
.
पद्याच्या दोन ओळी उमटल्या सहज कागदावरी,
मग, लेखणी ही थांबली ... अकस्मिक अचानक जागेवरी
दुख: तर वाहत्या पाण्यासारखं वाहतच होतं
दोन ओळीतलं मांडलेलं, कागदाच्या होडीसारखं हेलकावे घेत होतं
.
.
पद्यातलं दु:ख आता चारोळीवर आलं
उरल्या ओळीत घ्यायचा उसासा ... कि द्यायचा दिलासा ?
आधी शब्दांची नी मग होती ओळीची कसोटी ..
जी सावरणार होती मनास
.
.
व्यथित मन असचं असतं, जवळ जेव्हा कुणी नसतं
दु:खाला असते त्या नेमक्या शब्दांची अचूक ओळींची आस
हा नेमकेपणाच विरघळवून टाकतो सारं दु:ख
एक नवीन पहाट घेऊन येते सुखं
मन होते फूलपाखरू अन् सुरु होतो नव्या क्षणांचा प्रवास ..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

दुख: तर वाहत्या पाण्यासारखं वाहतच होतं
दोन ओळीतलं मांडलेलं, कागदाच्या होडीसारखं हेलकावे घेत होतं >>>
अप्रतिम!!!

व्यथित मन असचं असतं, जवळ जेव्हा कुणी नसतं
दु:खाला असते त्या नेमक्या शब्दांची अचूक ओळींची आस
हा नेमकेपणाच विरघळवून टाकतो सारं दु:ख
एक नवीन पहाट घेऊन येते सुखं
मन होते फूलपाखरू अन् सुरु होतो नव्या क्षणांचा प्रवास .. >>> या ओळींचा अर्थ शोधताना अगदी व्याकूळ व्हायला झालं. खूपच सुरेख कविता. अभिनंदन!!!

विभाग्रज, ह.बा. वैभव. बेफीकिर .. आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. २०१२ या नववर्षानिमित्त हार्दीक शुभेच्छा