साने गुरुजी कथामाला (इमामवाडा शाखा) - २४ डिसेंबर २०११

Submitted by राखी.. on 28 December, 2011 - 02:00

// करी मनोरंजन जो मुलांचे / जडेल नाते प्रभुशी तयाचे //
नमस्कार,
शिर्षकावरुन तुम्हाला कळलंच असेल कि हा एक सोहळ्याचा वृतांत आहे.. वरवर पाहता तो एक वृतांतच आहे. पण आमच्यासाठी तो एक सण आहे. गेली ४२ वर्षे अव्याहत पणे हा सण आम्ही साजरा करतोय. २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर हा काळ म्हणजे आमच्यासाठी जणूकाही दिवाळीच.
साने गुरुजी कथामाला
साने गुरुजी कथामाला, इमामवाडा ही संस्था १९६९ साली कै.सोनू तरे, कै.रघुनाथ सागवेकर, कै.अनाजी तरे ,कै. बाबुराव बांदिवडेकरश्री.ज्ञानेश्वर तारी, श्री. गंगाराम तरे यांनी स्थापन केली. इमामवाडा (भेंडीबाजार) या विभागातील मुलांना चांगले संस्कार लाभावेत, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा, तशी त्यांना संधी उपलब्ध व्हावी व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ह्या हेतूने ही कथामाला स्थापन करण्यात आली. दर रविवारी सकाळी ९.३० वाजता पटांगणात मुलांना जमवायचे. साधारण एक तास त्यांचे खेळ घेतल्यानंतर त्यांना अतिशय शिस्तीने कथामालेत बसवायचे.
अशाच शिस्तीत आम्ही पण बसायचो आमच्या लहानपणी
IMG_3087.jpgखरा तो एकची धर्म आणि असो तुला देवा माझा सदा नमस्कार या दोन प्रार्थना झाल्यानंतर त्यांच्याकडुन गाणी, कथाकथन तसेच वक्तृत्व यांची तयारी करुन घ्यायची. याच तयारीची पुर्तता करणारा सण म्हणजे मातृदिन सप्ताह.
२४ डिसेंबर ते ३० डिसेंबर या ७ दिवसांत आम्ही क्रिडा, वक्तृत्व, सांस्कृतिक अशा स्पर्धांचे आयोजन करतो.
बालकलाकार आपले नृत्य सादर करताना
IMG_3057.jpg
३० डिसेंबर या दिवशी बक्षीस समारंभ, कार्यक्रमाची सांगता आणि सर्वांचा सामुदायिक वाढदिवस असतो. सामुदायिक वाढदिवसाच्या मागे एक खुप चांगला हेतु आहे.त्याकाळी इमामवाडयात बहुसंख्येने कामगारांची वस्ती होती. आपल्या मुलांचे वाढदिवस साजरे करणे म्हणजे खुप खर्चिक बाब, त्यात रविवारी कथामालेत येताना इतर मुलांसाठी चॉकलेट्स आणणे हे सगळ्यांनाच जमत नव्हते. मग त्या रविवारी त्या मुलाची हमखास अनुपस्थिती असायची. ही गोष्ट कार्यकर्त्यांच्या लक्षात आली. मग त्यातुनच सामुदायिक वाढदिवसाची कल्पना उदयास आली. त्यामुळे मुलांचाही उत्साह वाढला.
उपस्थित मान्यवर मुलांना खाऊ आणि भेटवस्तु देताना
IMG_3070.jpg
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे संस्थापक आणि सानेगुरुजींचा लाडका मुलगा म्हणुन ज्यांची ओळख आहे असे श्री. प्रकाशभाई मोहाडीकर हे दर वर्षी न चुकता या कार्यक्रमाला आवर्जुन हजर असतात. या वर्षी वयाच्या ९३ व्या वर्षी सुद्धा ते हजर होते. मुलांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी त्यांच्यात सामील देखील होतात.
पाहिलंत कसे लहान होतात ते.. (वय वर्षे ९३)
IMG_3064.jpg
श्री. प्रकाशभाई मोहाडीकर मुलांशी हितगुज करताना
IMG_3080.jpg
त्यांचा वाढदिवस ९ जानेवारी परंतु ३० डिसेंबरलाच त्यांचा वाढदिवस करण्याच भाग्य आमच्या कथामालेला मिळतं ही एक आनंदाची बाब. संपुर्ण भारतात प्रथमच आदर्श कथामाला पुरस्कार मिळालेली अशी ही आमची कथामाला आजही हा सण साजरा करतेय.
फक्त हा सात दिवसांचा सण गेली दोन वर्षे आम्ही एका दिवसात साजरा करतोय.. त्याला मुख्य कारण बी आय टी चाळींचे पुर्नवसन. जवळ-जवळ ४५० कुटुंब इमामवाडयामधुन स्थलांतरित झाली. अर्थातच कथामालेच्या दर रविवारच्या प्रथेत खंड पडला.
पण मातृदिन सप्ताहात खंड पडला नाही. गेली दोन वर्षे एका दिवसाचा का होईना पण कार्यक्रम होतोय. आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. या एका दिवशी आम्ही माहेरवाशिणी पण वेळात वेळ काढुन या कार्यक्रमाला सहकुटुंब हजर असतो.
मी आणि माझे मिस्टर मोठ्यांचे आशिर्वाद घेताना भाई आम्हाला उखाणे पण घ्यायला लावतात बरं का..
IMG_3053.jpg
२४ डिसेंबर हा साने गुरुजींचा वाढदिवस. त्यामुळे त्याच दिवशी सर्व कार्यक्रम होतात. या वर्षी देखील आम्ही हा सण दणक्यात साजरा केला आणि करत राहूच..
आमची ही कथामाला अशीच अखंड चालत राहो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
// खरा तो एकची धर्मं........जगाला प्रेम अर्पावे //

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

.

स्तुत्य उपक्रम. छान. Happy

बाकीच्यांना ऐकण्यासाठी येण्याची परवानगी आहे का? कधीतरी यायला आवडेल.

हो हरकत नाही.. दर वर्षी प्रमाणे २४ डिंसेबरला.. स्थळ : इमामवाडा, मुंबई ४०० ००९.
धन्यवाद...

राखी छानच आहे हा उपक्रम. शुभेच्छा!
खरा तो एकची धर्मं........जगाला प्रेम अर्पावे >>>>ही प्रार्थना आम्ही लहानपणी म्हणायचो. आणि मला ह्या प्रार्थनेची नोव्हेंबरच्या शेवट्च्या आठवड्यात फ़ार आठवण येत होती. Happy
असो तुला देवा माझा सदा नमस्कार>>>ही प्रार्थना पण आम्ही लहानपणी म्हणायचो. Happy

आज या समारंभाचा उद्घाटन सोहळा आहे. पण यावर्षी हा कार्यक्रम ४ दिवसांचा असल्याने बक्षीस समारंभ, लहान मुलांचे (आणि मोठ्यांचे सुध्धा) डान्स, आणि सामुदायिक वाढदिवस दि. २८ डिसेंबर २०१४ ला इमामवाडा येथे आयोजित केला आहे. तरी उच्छुकांनी जरुर यावे Happy