Submitted by पाषाणभेद on 27 December, 2011 - 16:45
कळीकाळानं असला कसला मौका साधला
कळीकाळानं असला कसला मौका साधला
व्हता तो आधार आमचा निघूनीया गेला ||धृ||
बाप तू रं आमचा तूच आमची माय
दूध बी तूच आन तूच दूधावरली साय
कोना म्हनू आता आमी माय अन बाप
तुझ्यायीना जगू कसं कळंना आम्हाला ||१||
न्हावूमाखू केलं तू रं
तूच घातलं खावू
तू न्हाई समोर आता
आमी कुठं पाहू
इस्तवात पडलो जवा
तवा तूच विझवाया आला ||२||
पुर्वप्रकाशित:शब्दगाऽऽरवा २०११
- पाभे
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
कविता बरोबर भावना पोचविते.
कविता बरोबर भावना पोचविते. साधे पण परिणामकारक शब्द वापरलेत.
छान....
छान....
दु:खदायक.
दु:खदायक.
मैतात काही बाया रडतांना
मैतात काही बाया रडतांना पाहीलेल्या? अगदी तसलं कहीतरी फिलींग आलं.
एका चित्रपटातील हे गीत आईविना
एका चित्रपटातील हे गीत आईविना असलेल्या लहान बहिणभावाच्या तोंडी आहे. त्यांनी बाप गमावलेला आहे अन आता काय करावे या विवंचनेत ते आहेत.
एकुणच परिणाम आपल्यापर्यंत पोहोचला तर. धन्यवाद.