तांत्रिक सफाई, परदेशातल्या महत्त्वाच्या ठिकाणी बेतलेलं चित्रिकरण, चित्रपटाला असलेला वेग, एकानंतर एक घडणार्या घटना, उत्तम ३डी ईफेक्ट्स... डॉन २ सज्ज आहे हे सर्व काही घेऊन. तरीही तो काही काळानंतर असह्य होतो- आणि त्याचं कारण शाहरूख नसतं! (हे एक नवलच!) ते कारण असतं चित्रपटाला नसलेली कथा आणि चकचकाटाकडे संपूर्ण लक्ष केन्द्रित केल्यानंतर वेळ न मिळाल्यामुळे त्यावर न केलेले काम.
डॉन अंडरवर्ल्डचा बेताज बादशाह आहे. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटणे हा त्याच्या हातचा मळ, नव्हे ह्यातच त्याला 'थ्रिल' वाटतं. असा हा डॉन एक साधी ड्रग्जची कन्साईनमेन्ट, जी एका 'ब्रीफकेस'मध्ये मावते, ती घ्यायला स्वत: जाईल का? बरोबर कोणालाही न घेता? त्याला काहीही 'बॅक ऑफिस' नाही? का एन्ट्रीसाठी काहीतरी स्टंट असावा म्हणून हे तोंडीलावणे? सहाजिकच एकटा गेल्याने, त्याच्यावर हल्ला होतो आणि मग त्यातून अनेक चमत्कार करत तो सुटतो. आणि थेट इन्टरपोलच्या मुख्यालयातच येतो. स्वतःहून शरण जाण्यासाठी! त्यावेळेला मलिक रिटायरमेन्टची घोषणा करून बिल्डींगबाहेर निघतच असतो. पण नेमका डॉन शरण आल्यामुळे त्याला बिचार्याला तो प्लॅन पुढे ढकलावा लागतो! (अशी सोय असते का हो?)
रोमा स्वतःच्या हाताने, जातीने डॉनला तुरुंगात पोचवून येते. आता हा खतरनाक डॉन. ह्याला जगभरचे पोलिस शोधत असतात. जगभरातले गुंड ह्याच्या जीवाच्या मागे असतात. आणि ह्याला तुरुंगात एका साध्या कैद्याप्रमाणे ठेवतात? त्याला मृत्यूदंडाची शिक्षा झालेली असते. त्याला 'आयसोलेशन सेल' वगैरे काही नाही? शाहरूख कॅरेक्टरमध्ये असतानाही एकटा रहायला घाबरतो बहुतेक! त्याच तुरुंगात वर्धान त्याची वाट पहात असतो. आता मलिक आणि रोमा ह्याच केसवर काम करत होते की नै पूर्वी? मग त्यांना माहित असायला पाहिजे की नै की वर्धान आणि डॉन ह्यांना एकत्र ठेवण्यात धोका आहे म्हणून? जेलमधून ते पळून गेल्यानंतर रोमा विचारते- अय्या! वर्धानपण गेला डॉनबरोबर? आता काय होणार?
काय होणार? प्रियांका थेट फ्रान्समध्ये! हे बरं असतं बुवा एक चित्रपटांमध्ये! ह्यांनी ठरवलं की दुसर्या फ्रेमला ते त्या देशात हजर. तेही कार, सेलफोन, सुंदर कपडे, लॅपटॉप्स ह्यांसह. इथे आपल्याला एक सिमकार्ड घ्यायचं असलं तरी किमान ३ दिवस लागतात! मलिकही पाठोपाठ येतोच. (अहो, रिटायर होऊन घरी चालला होतात ना?) डॉनही पळून जातो आणि आयेशानामक सुंदरी त्याच्या स्वागताला सर्व जामानिम्यासकट हजर! कधी अरेंज करतात हे सगळं? मध्येच डॉन वाढलेले केस कुठे कापतो?
त्याच्या मग पुढची कथा घडते झुरिकमध्ये. 'युरो' जिथे छापले जातात, त्या बॅंकेतून युरोंचे साचे पळवून, नंतर खोट्या नोटा छापून खूप खूप श्रीमंत होण्याचा प्लॅन डॉन करतो. (आताची युरोची स्थिती पाहता, हा चित्रपट आणि त्याचा हेतूच फसतो आणि हास्यास्पदच वाटायला लागतं सगळं, हाही भाग आहेच. Very bad timing!) मग त्याच्या मदतीला येतो 'समीर'. हा असतो कॉम्प्युटर हॅकर. पण त्याला बहुतेक दिव्य दृष्टीही असते. कारण एकही सीन असा दाखवला नाहीये जिथे समीर काही अभ्यास करतोय, नेटवर चित्र बघतोय, लोकांशी बोलतोय वगैरे. पण बँकेच्या सॅनिटेशनच्या प्लॅनपासून युरोचे साचे जिथे आहेत त्या सेफ्टी वॉल्टपर्यंत सर्व बिल्डिंग आणि सेक्युरिटी प्लॅन्स ह्याचाकडे तयार असतात! हां. मुख्य म्हणजे पॅरिस, झुरिक, मलेशियात, बॅंगकॉक येथे लोक हिंदी बोलतात!!!
मग खुद्द चोरी. मग डॉन कसला भारी असतो हे दाखवणारे डायलॉग, मारामार्या. मग कोणीतरी फितूर होतो, मग डाव पलटतो वगैरे, मग परत एकदा डॉनची सरशी वगैरे सर्वकाही तेच ते. सर्वात खटकणारी गोष्ट म्हणजे इतकं सगळं करून डॉन शेवटी मुक्तच राहतो. अजून एका सिक्वलसाठीची ही महाभयंकर योजना करून ठेवलेली आहे! तेव्हा बीवेअर! 
दिसायला स्लीक, वेगवान. पण तरीही बंडल. ३डी ईफेक्ट मात्र चांगले आहेत. (हॅरी पॉटर पेक्षाही सरस वाटले). डॉन१ हा मूळ डॉनची शेवट वगळता असलेली कॉपी होती, म्हणून की काय, खूपच बरी होती. ह्यात ना कथा, ना कोणत्या गोष्टीचं स्पष्टीकरण. बर हे दुर्लक्ष करण्याइतपत अभिनयसामर्थ्य तरी हवं. पण शाहरूखचा अभिनय (?) तो डॉन आहे म्हणून त्याची दहशत वाटावी असा नाही. अभिनयच नाही असं म्हणूया. उलट सुरूवातीला लांब केसांमध्ये तो थोडा वेगळा दिसतो म्हणून बघवतो
कोणालाच काहीही छाप पाडण्याजोगं काम नाही. रोमाचं मूळ कॅरॅक्टर का आहे, कारण डॉनने तिच्या भावाला मारलेलं असतं. इथे रोमा भाऊ वगैरे विसरते आणि तिच्या मनात डॉनबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण होऊ पाहतो. हे इतकं हताश करणारं आहे! अरे, मूळ उद्देश काय, करताय काय? राहूनराहून अमिताभ आठवतोच. कशाला हवीत गॅजेट्स, की आधुनिक तंत्रज्ञान? नुसती नजर बांधून ठेवते!
तात्पर्यः नका पाहू 
(ह्या सिनेमानंतर शाहरूखने निवृत्ती घ्यावी. मलिकसारखी नाही, खरी!)
>>Don 2 classic naahiye...
>>Don 2 classic naahiye... Pan enjoy karnyaasaarkhaa aahe...
आता अग्निपथचा रिमेक येत
आता अग्निपथचा रिमेक येत आहे... डॉनच्या वेळी त्याचे प्रोमो बघितले.
जामोप्या, २५ रु.तरी कशाला
जामोप्या, २५ रु.तरी कशाला घालवलेत गावात या सिनेमावर. नेटवर फुकट उपलब्ध आहे.
पौर्णिमा , मस्त समिक्षण .
पौर्णिमा , मस्त समिक्षण
. तरी मी बघेन असं म्हणतेय

<< फरहानाचे जास्त कौतुक झाले वाट्ते. ही खिचडी फसलीच.
अश्विनीमामी , हे बाकी पर्फेक्ट बोललात
आता अग्निपथचा रिमेक येत
आता अग्निपथचा रिमेक येत आहे<<
यात हि सारुक आहे की काय?
चला म्हणजे अमिताभच्या हिट सिनेमाचे. पडीक रिमेक बनवून शाहरुकने अमिताभवर मात करायचा विडा उचलून धरलाय तर.
नाही. त्यात र्हितिक रोशन आहे.
नाही. त्यात र्हितिक रोशन आहे. डॉन २मध्येही र्हितिक आहेच. तसेही शाहरुख आणि र्हितिक एकच आहेत हे डॉन २मध्ये दाखवले आहेच ! डॉन २ मध्ये एका प्रसंगात चेहर्यावर मास्क लावून शाहरुख र्हितिक बनतो...
>>डॉन २ मध्ये एका प्रसंगात
>>डॉन २ मध्ये एका प्रसंगात चेहर्यावर मास्क लावून शाहरुख र्हितिक बनतो.
म्हणजे गाढवाने वाघाची कातडी पांघरली आहे तर
आमची एन्जॉयमेंन्ट ची कल्पना
आमची एन्जॉयमेंन्ट ची कल्पना वेगळी आहे हो
>>>
Swata na anubhavtaa criticize karna hich tumchi enjoymnt chi kalpanaa asaavi asa watta...
>>Swata na anubhavtaa
>>Swata na anubhavtaa criticize karna hich tumchi enjoymnt chi kalpanaa asaavi asa watta...
काय आहे, दोनशे तीनशे रुपयांचा चुराडा करण्यापेक्षा............असो

विषाची परीक्षा घेत नाही हो आम्ही
>>नाही. त्यात र्हितिक रोशन
>>नाही. त्यात र्हितिक रोशन आहे.<<
नाम "विजय दिनानाथ चौहान" हा अमिताभचा डायलॉग र्हितिक रोशन कसा म्हणेल ह्याचा विचार करूनच हसता हसता पुरेवाट झालेय.
आयला.........मेरा ना.........
आयला.........मेरा ना......... विजय है...........विजय चौहान.....
आयला दिनानाथ तो भुल ही गया दादी.......
इति.रितिक
मस्त समीक्षण माझ्या मते 'दिल
मस्त समीक्षण
माझ्या मते 'दिल से' या एकाच सिनेमात शाहरुखने बरं काम केलं होतं, इतर सगळ्या सिनेमात ईमाने ईतबारे पाट्या टाकल्या.
>>आयला.........मेरा
>>आयला.........मेरा ना......... विजय है...........विजय चौहान....<<
@udayone
अग्निपथ २, मध्ये र्हितिक रोशन आहे सचिन नाही. आयला.
सचिन नाही.
सचिन नाही. आयला>>>>>>>>>>>>>>>>. अरे लोकांनो............चित्रपट चालु असताना झोपा काढत असतात का....????? कोई मिल गया मधे सारखे आयला कोण प्रिती झिंटा करते की रेखा...
कोणतंही परिक्षण न वाचता
कोणतंही परिक्षण न वाचता पिक्चर बघायचा नाही हा निर्णय योग्यच आहे तर!!
कशाला हवीत गॅजेट्स, की आधुनिक
कशाला हवीत गॅजेट्स, की आधुनिक तंत्रज्ञान? नुसती नजर बांधून ठेवते! >>> या वाक्याला प्रथम प्रचंड अनुमोदन.
आता बाकीचं .......
सिनेमा पाहणार होते ते आता अर्थातच होणे नाही. सिनेमाचा खिमा करून पौर्णिमाने खिलवला आहेच तर मूळ 'बोकड' बघायला कोण जाणार?
>>>>> अशी सोय असते का हो?)
कधी अरेंज करतात हे सगळं? मध्येच डॉन वाढलेले केस कुठे कापतो?
मुख्य म्हणजे पॅरिस, झुरिक, मलेशियात, बॅंगकॉक येथे लोक हिंदी बोलतात!!!
>>>>> चक्क, मेंदु घेऊन हिंदी सिनेमाला गेली होतीस की काय? पुन्हा अशी चुक करू नकोस.
********************************************
छ्या!!! ये माबोकरोंको खुश करना मुष्कील ही नही, नामुमकीन हय!
मी २५ रुपयात गावात बघितला..
मी २५ रुपयात गावात बघितला.. त्यामुळे आवडला.

>>> कशाला? २५ रूपयात चांगले अर्धा किलो टमाटे आले असते की. मस्त ज्युस करून प्यायचा. गाजरंही चांगली आलेत बाजारात.
Very bad timing!>>> हे निरीक्षण सगळ्यात भारी >>> अगदी अगदी फारेण्डा!
वाचले पैसे! आभारी आहे हो
वाचले पैसे!
आभारी आहे हो वैनी
don ka intazaar 11 mulko ki
don ka intazaar 11 mulko ki police kya mai bhi kar raha hoon..........
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
mujhe RA1 ke paise jo waapas lene hai.........!!!
(No subject)
मला शाहरुक आवडत नाही हे
मला शाहरुक आवडत नाही हे सुरुवातीलाच स्पष्ट करतो.

मला वरील परिक्षण अजिबात पटले नाही.. तटस्थ न राहता... आपली सगळी आगळीक कशी निघेल यावरच जास्त भर दिलेला आहे...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
ते कारण असतं चित्रपटाला नसलेली कथा आणि चकचकाटाकडे संपूर्ण लक्ष केन्द्रित केल्यानंतर वेळ न मिळाल्यामुळे त्यावर न केलेले काम. >>>>>> चित्रपटाला कथा नाही हे म्हणने अत्यंत चुकीचे आहे......इतकी छान कथा असुन काही लोकांना कळालीच नाही असे कसे
कथा:- डॉन ५ वर्षापासुन आशियात आपला ड्रग्स चा व्यवसाय करत आहे त्याला आता युरोपात व्यवसाय सुरु करायचा आहे पण त्याच्या समोर जिमी कुगर नावाचा युरोपियन ड्रग्स सम्राट उभा ठाकतो..त्याला समोरा समोर टक्कर न देता डॉन आपले लक्ष दुसरी कडे वळवतो..त्याच्या कडे माहीती असते की झुरिक च्या बँकेचा मॅनेजर ने काही घोटाळा करुन पद मिळवले आहे..त्या घोटाळ्याची माहीती असणार्या लॉकर ची चावी वर्धान कडे असते म्हणुन वर्धान ला जेल मधुन बाहेर काढले जाते..त्यासाठी तो आधी स्वतःला पोलिसांच्या हवाले करतो... असिस्टंट मॅनेजर ला ब्लॅकमेल करुन डॉन त्याच्या मार्फत बॅकेच्या नोटा छापण्याच्या ठिकाणचा मागोवा काढतो...वर्धान आणि डॉन मिळुन त्या नोटा छापण्याचे डाय चोरी करतात आणि निघताना डॉन त्याला धोका देतो... परंतु डॉन चे उदिष्टे वेगळे असते म्हणुन तो त्या बँकेत परत जातो...पोलिसांना मदत करुन वर्धान ला खातमा करतो ..त्या बदल्यात स्वतःवरील सगळे चार्जेस माफ करुन घेतो.. आणि सगळ्या गुन्ह्यातुन सुटका करुन घेतो... निघताना नोटांची डाय मॅनेजर ला परत करतो.... परंतु ती खोटी दिली असते..त्याच बरोबर इंटरपोल ला स्वतःच्या सगळ्या व्यवसायाची माहीती सुध्दा देतो युरोप सहीत त्यामुळे त्याचे सगळे प्रतिस्पर्धी पकडले जातात.....आणि शेवटी डॉन नोट छापण्याच्या व्यवसायात सुध्दा शिरतो.......ड्रग्स च्या व्यवसायात तर त्याला कोणीच प्रतिस्पर्धी उरलेले नसतात.............
उदयवन, हे मात्र काहीच्याकाही
उदयवन, हे मात्र काहीच्याकाही मधे मोडतं बरं का.
प्रियंकाचा सुरुवातिचा
प्रियंकाचा सुरुवातिचा प्रसन्ग. अर्जुन तिला विचारतो, " आयेशा, आज का दिन कुछ खास है?"
प्रियंकाचा नाव ऱोमा असताना, हि चुक editing मधे कशी काय राहुन गेली?
डॉन अंडरवर्ल्डचा बेताज बादशाह
डॉन अंडरवर्ल्डचा बेताज बादशाह आहे. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटणे हा त्याच्या हातचा मळ, नव्हे ह्यातच त्याला 'थ्रिल' वाटतं. असा हा डॉन एक साधी ड्रग्जची कन्साईनमेन्ट, जी एका 'ब्रीफकेस'मध्ये मावते, ती घ्यायला स्वत: जाईल का? बरोबर कोणालाही न घेता? >>>>>>>>>>>>. डॉन स्वतः वरच विश्वास असतो..दुसर्यांवर नाही म्हणुन स्वतःची कामे स्वतःच करतो........जुन्या आणि नविन दोन्ही चित्रपटात सेमच आहे

डायलोग्स ऐका...
१ ग्रॅम कोकिन चा भाव किमान १५ ते ५० हजार पर्यंत असतो यावरुन विचार करा त्या ब्रिफ्केस मधे किती किमतीचे ड्रग्स मावतील
-------------------------------------------------------------------------------------------------------------
! त्यावेळेला मलिक रिटायरमेन्टची घोषणा करून बिल्डींगबाहेर निघतच असतो. पण नेमका डॉन शरण आल्यामुळे त्याला बिचार्याला तो प्लॅन पुढे ढकलावा लागतो! >>>>>>>>>>>>>>>>>. मलिक रिटायर होणार असतो झालेला नाही............ वेळ असतो त्याला......त्यासाठी
ती वाढदिवस विसरली.. तो नाव
ती वाढदिवस विसरली.. तो नाव विसरला...
प्रियांका चोप्रा आसावरी जोशी सारखी दिसायला लागली आहे.. ( तीच ती सर्फ एक्सेल ढूंढते रह जाओगे वाली.. आठवते का? )
जागोमोहन (टेक केअर)
(टेक केअर)
इतके सगळे वाचल्यानंतर.. मला
इतके सगळे वाचल्यानंतर.. मला डॉन २ बघाय्य्ची इच्छा होते आहे...
(No subject)
प्रियांका चोप्रा आसावरी जोशी
प्रियांका चोप्रा आसावरी जोशी सारखी दिसायला लागली आहे.>>>>>
नेमके हेच विचारण्यासाठी दिलेला प्रतिसाद एड्टला मी!
आधी कुलकर्णी लिहिले होतेत त्यामुळे मला शंका आली की जोगळेकर तर नसावे ना? 
उदयवन, कालपासून त्याला
उदयवन, कालपासून त्याला 'मॅनेजर' का म्हणताय? मॅनेजरला इतका अधिकार असेल का? व्हाईस प्रेसिडेन्ट असतो तो दीवान. तुम्ही तर सिनेमा नीट पाहता आणि ऐकता ना?

वेगवान आहे, स्लीक आहे, उत्तम ३डी आहे हे मी लिहीले आहेच की. ते नीट वाचले नाही का? बाकी प्रत्येकाची आवड. तुम्हाला आवडला, मला नाही. इथे विषय संपवूया. पर्सनल कमेन्ट्स न करताही तुम्हाला चित्रपट आवडला आणि का आवडला ते तुम्ही लिहू शकता.
Pages