प्रीतीचा सुगंध(?)

Submitted by pradyumnasantu on 24 December, 2011 - 19:53

प्रीतीचा सुगंध

कोळीवाडा ते आदर्शघाट
बस नंबर सात
तू चढलीस झोकात
बसलीस शेजारीच येउन
मी बसलेलो नाक धरून
बस कळकट्ट, घामट
पण तुझा वेगळाच थाट
सगळी बस जणू एक मोठी घामोळी
फक्त तू एकटीच महकणारी गंधाली
सर्वांची कापडं जुनाट विटकी
तुझी वस्त्रं तेवढी नीटनेटकी
हळूच तुझ्या अंगावर रेलून
मी घेतला भरगच्च श्वास, गोड सुवास
अहाहा, इंद्रनगरीत असल्याचा झाला भास
*
एका इष्टॊपवर लोक उतरून गेले
एक सफारी भाई दोस्तासंगं आत चढले
लई फ्येकत होता तुझ्याकडं नजर साला
मला भरपूर राग आला
*
पर उतरताना त्यानं रिलीफ दिला
" काय कपडे घातलेत, काय वास मारतोय," तुझ्याकडं बघून पुटपुटला
काय सांगू मला किती आनंद झाला
हळूच तुझ्या अंगावर रेलून
मी पुन्हा भरगच्च श्वास घेतला
*
त्यादिशी तुझ्या टोपलीतून
पडली जी मासोळी निसटून
ती ठेवलीय मी माझ्या ड्रावात अजून जपून
*
तिचा आता पार झालाय बांगडा सुक्का
*
करशील का गं लगीन माझ्याशी
आन देशील का गं येक ओला मुक्का

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

त्यादिशी तुझ्या टोपलीतून
पडली जी मासोळी निसटून
ती ठेवलीय मी माझ्या ड्रावात अजून जपून
*
तिचा आता पार झालाय बांगडा सुक्का>>>>काय भाउ अस तर नाहीना तिने मुद्दाम बांगडा खाली टाकला होता.

करशील का गं लगीन माझ्याशी
आन देशील का गं येक ओला मुक्का>>>करुन टाका, मग वास घेत बसाल्,सुक्या बरोबर ओल्या, म्हावर्‍याचा.

फालकोरना अनुमोदन. फक्त मुक्का मुकाच असेल अशी काळजी घ्या. बॉक्सिंगमधला मुक्का बसू नये म्हणजे झालं.
छान कविता.